प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 4 September 2017

*Youtubeचे व्हिडिओ पाहताना वापरा हे की-बोर्डचे शाॅर्टकट*

युट्युब व्हिडिओच्या वेगवेगळ्या फीचर्ससाठी की-बोर्डवर विविध शॅार्टकटस् बनवले आहेत. ज्यात 'अल्फाबेट की'पासून 'न्यूमेरिक की' समाविष्ट केल्या गेल्यात.

 इंटरनेटवर युट्युबची क्रेज वाढतीये. आकडेवारीनुसार दर महिन्याला एका बिलियनहून जास्त लोक हे युट्युबवर व्हिडिओ पहातात. पण आपल्यापैकी कमी लोकांना माहीत असेल की की-बोर्ड शॅार्टकटच्या सहाय्यानं आपण युट्युबवर व्हिडिओ सोप्या पद्धतीनं पाहता येतील.

युट्युब व्हिडिओच्या वेगवेगळ्या फीचर्ससाठी की-बोर्डवर विविध शॅार्टकटस् बनवले आहेत. ज्यात 'अल्फाबेट की'पासून 'न्यूमेरिक की' समाविष्ट केल्या गेल्यात.

🎾अल्फाबेट की (A-Z)

🎾'K' किंवा 'Spacebar' चा वापर करून व्हिडिओ केव्हाही प्ले किंवा पॅाज करू शकतो.

🎾' J ' चा वापर करून चालू असलेल्या व्हिडिओला आपण दहा सेकंद मागे घेऊ  शकतो.

🎾' L ' चा वापर करून व्हिडिओ दहा सेकंद पुढे करू शकतो.

🎾'Left Arrow' आणि ' Right Arrow' च्या सहाय्याने  व्हिडिओ पाच सेकंद पुढे किंवा मागे घेऊ  शकतो.

🎾'Up Arrow' आणि  'Down  Arrow' च्या साह्याने  आवाज कमी-जास्त करु शकतो.

🎾'M' चा वापर करून व्हिडिओ म्युट, चालू, बंद करता येऊ शकतो.

🎾'F'चा वापर करून व्हिडिओ फुलस्क्रीन मोडवर पाहू शकतो.

🎾'Shift >' चा वापर करून व्हिडिओचा स्पीड वाढवू शकतो.

🎾'Shift <' चा वापर करून व्हिडिओचा स्पीड कमी करता येऊ शकतो.

🎾न्यूमेरिक की (01 - 09)

🎾1 दाबल्यानंतर व्हिडिओ 10% पुढे घेऊ शकतो, 
या प्रमाणे 🎾2 दाबल्यानंतर 20%  पुढे घेऊ शकतो. याप्रमाणे  1 ते 9 'न्यूमेरिक की'चा वापर करून व्हिडिओ फाॅरवर्ड करत पाहू शकतो

No comments:

Post a Comment