प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, 25 July 2018

कसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट PDF स्वरूपात ?

मचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) चं  प्रगतीपुस्तक गहाळ झालाय काय? तुमच्या सर्टिफ़िकेटवर डाग पडलेत का? सं असेल तर आता बोर्डाने तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आणली आहे एक खास सुविधा ई-मार्क्सशीटची. तुम्ही तुमच्या मार्कशीटचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तपासू शकता आणि एक प्रत PDF स्वरूपात साठवून ठेवू शकता.

यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स…
१. http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp  ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा.

२. या साईटवर नाव, फोन नंबर, इमेल आय डी, पासवर्ड टाकून तुमचे खाते बनवा.

३. तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून तुमचे मार्कशीट मिळवु शकता.

१९९० सालापासूनच्या मार्कशीट्स या साईटवर उपलब्ध आहेत. आपल्या बोर्डाने ही एक चांगली सोय आपल्यासाठी केलेली आहे.

No comments:

Post a Comment