प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, 17 October 2018

🚸 *जि.प.कें.प्रा.शाळा, चाकूर* 🚸
           
      ┎════════════┒
       ▌ *✺शिक्षण परीषद✺*  ▌
      ┗════════════┛

➡ *आज दिनांक १७/१०/२०१८ वार बुधवार रोजी शिक्षण परीषद केंद्रीय मु.अ.पठाण सर,बोथी मु.अ.जमादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात संपन्न झाली.*

➡ *परीषदेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.सुत्रसंचलन वाल्मिक पंदे सर यांनी केले.*

➡ *प्रेरणा गीत व स्वागत गीत मेकले मॅडम यांनी अतिशय सुरेल आवाजात गायीले.*

➡ *अध्ययनस्तर आढावा शाळेनुसार विश्लेषण PPT च्या माध्यमातून गटसाधन केंद्रतील साधनव्यक्ती श्री.प्रकाश  भालके सर यांनी सांगून विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगती विषयी चर्चा व उपाययोजना सांगितली.*

➡ *दिक्षा अँप व अध्ययन आध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी जयराज  सोदले सर यांनी प्रोजेक्टर च्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.*

➡ *मित्रा अँप बद्दल विशेष शिक्षक रविराज देशमुख सर यांनी माहिती सांगून तंत्रज्ञाना संदर्भात काहीही अडचण आली तर संपर्क साधावा असे सांगितले.*

➡ *भाषा व गणित पेटी विषयी रामराव हावडे सर यांनी माहिती सांगून प्रत्येक शाळेमध्ये पेटीतील साहित्याचा वापर कशाप्रकारे केला जातो याविषयी केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षकांनी माहिती सांगून चर्चा केली.*

➡ *इंग्रजी अध्यापनात BCPT चा वापर 4 स्टेपमध्ये कशा प्रकारे करावा याविषयी प्रोजेक्टरवर प्रत्यक्ष व्हिडीओ दाखवून दत्ता मद्रेवार सर यांनी खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.*

➡ *बालरक्षक बद्दल वाल्मिक पंदे सर यांनी सविस्तर माहिती सांगितली.*

➡ *परीपत्रकाचे वाचन व प्रशासकीय सुचना श्री पठाण सर यांनी सांगितल्या.*

➡ *शेवटी वंदेमातरम घेऊन शिक्षण परीषदेची सांगता झाली.*

[ _BCPT व इतर इंग्रजी व्हिडीओ संदर्भात पेन ड्राईव्ह सह संपर्क साधावा 9421969373._]

💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠








No comments:

Post a Comment