#Im_becoz_We_Are.
लातूर गटशिक्षणाधिकारी म्हणून आज तीन वर्ष बघता बघता पूर्ण झाली. लातूरच्या मातीने आणि माणसांनी लावलेला असीम जीव..! कधी इथल्या चराचराशी एकरूप-एकरंग झाले कळलेही नाही.
लातूरच्या शैक्षणिक पटलावर मी जे काही थोडेफार चांगले काम करू शकलेय ते तुम्हा सर्वांची उत्कट आणि तितकीच सक्षम साथ मला होती म्हणून..!
कोणत्याही स्वार्थाविना केवळ लेकरांच्या हितास्तव तुम्ही सगळ्यांनी अहोरात्र धडपड केली म्हणून लातूर हे नाव ठळकपणे महाराष्ट्रभर पोहचले.त्यात मी फक्त निमीत्तमात्र..!
लातूरची माझी सर्व टिम जी अत्यंत तडफेने या सर्व कामात माझ्या सोबत आहे.माझे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व साधनवक्ती माझा सर्व कार्यालयीन स्टाफ तुम्ही सगळे या तीन वर्षात माझी खरी ताकत वाढवलीत. आणि प्रत्येक काम मनस्वीपणे पूर्ण केलेत.
माझा हा तीन वर्षाचा कार्यकाळ अधिक समृध्द करणारे माझे सर्व वरिष्ठ अधिकारी सीईओ मा.दिनकर जगदाळे सर, मा.माणिक गुरसळ सर,डॉ.विपीन सर, मा. नजिरूद्दीन शेख सर, ज्ञानेश्वर मोरे सर,माझे सहकारी अधिकारी आपण सर्वानी नेहमीच माझ्या कामाची योग्य दखल घेवून नेहमी कौतुक केलंत,अनेक प्रसंगात माझ्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभे राहून मला प्रचंड बळ दिलंत..विश्वास दिलात.तुम्हां सर्वांच्या मी कायम ऋणात आहे.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनीधींनी या तीन वर्षात माझ्या सर्व कामात प्रचंड विश्वास दाखवून मला सदैव मोलाचे सहकार्य करून सदैव प्रेरणा दिली आहे.या सर्वांची मी मनस्वी कृतज्ञ आहे.
या तीन वर्षात ख-या अर्थानी ज्यांनी रंग भरले ते शाळांशाळांतील माझी सर्व लेकरं..! कित्ती जीव लावलाय..निस्वार्थ..निर्मळ आणि तितकेच निरागस प्रेम या सा-या लेकरांनी दिले.यांच्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही.. तुम्हा सर्व लेकरांचे निखळ प्रेम माझ्या कामामागची सर्वात मोठी प्रेरणा आहे.
अतिशय उर्जादायी हा तीन वर्षाचा कार्यकाळ..खूप खूप समृध्द होता आलं. कौतुक..संघर्ष..यश-अपयश हे सारेच रंग या तीन वर्षात मनमुराद अनुभवले.
आपल्या सर्वांचे खूप खूप आभार माझ्या या तीन वर्षाचे साथीदार झाल्याबद्दल, हे तीन वर्ष अधिक संस्मरणीय केल्याबद्दल, या तीन वर्षात माझ्या बरोबरीने अपार मेहनत घेवून शै.गुणवत्तेचं चिरंतन काम करत असलेबाबत तुम्हा सर्वांचे आभार..!
ज़िन्दगी की असली उड़ान अभी बाकी है
ज़िन्दगी के कई इम्तेहान अभी बाकी है,
अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीं हमने,
अभी तो सारा आसमान बाकी है..!

No comments:
Post a Comment