प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, 5 November 2017

सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यावर काय होते : तुम्ही पण थक्क व्हाल फायदा पाहून
गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर ह्याचे बाकीचे फायदे पाहून तुम्ही पण थक्क व्हाल. गरम पाणी पिताना जरी चवीला चांगलं वाटत नसेल, पण ह्याचे शरीरासाठी असलेले फायदे पाहून तुम्ही सुद्धा गरम पाणी प्यायचे सुरु कराल. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली तर शरीराच्या आजारापासून वाचू शकतात.

१. वजन कमी करतं :
जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि तुमच्या खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्या. तुम्हांला निश्चितच फरक पडेल. जर तुम्ही हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक काप गरम पाणी प्यायला सुरु करा.

२. सर्दी खोकल्यांपासून सुटका :
कोणत्याहि मोसमात तुम्हाला छातीत दुखणं आणि खोकला सारखे आजार होत असतील तर गरम पाणी ह्यावर रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे गळा पण ठीक राहतो. ह्याच्या सेवनाने आराम मिळतो.

३. पिरियड्स सोपे बनवते :
पिरियड्सचे दुखण्यामुळे महिलांना सर्वच कामांमध्ये ब्रेक लागतो. गरम पाणी ह्या दुखण्यावर आराम मिळण्याचे काम करते. ह्या दरम्यान गरम पाण्याने पोटावर सेक करण्याने सुद्धा खूप फायदा होतो.

४. शरीर डिटॉक्स करते :
गरम पाण्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. आणि हे शरीरातील सर्व अशुद्ध गोष्टी खूप सहज स्वच्छ करते. गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. ज्यामुळे घाम येतो आणि ह्याद्वारे शरीरातील सर्व अशुद्धता दूर होतात.

५. वाढते वय थांबवते :
चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या जर तुमची चिंता वाढवत असेल तर काळजी करायचे काही कारण नाही. आजपासूनच गरम पाणी प्यायला सुरुवात करा आणि काही आठवड्यातच ह्याच काम बघा. त्वचेमध्ये तरतरी येऊ लागेल आणि त्वचा चमकदार सुद्धा होईल.

६. केसांसाठी फायदेशीर :
ह्याशिवाय गरम पाणीचे सेवन केसं आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्यामुळे केसं चमकदार बनतात आणि हे केसांची वाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.

७. पोटाला ठेवते दुरुस्त :
गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली राहते आणि हे ऍसिडिटीच्या समस्यांपासून आराम देते. जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पिण्याची सवय लावा. असं करण्याने जेवण लवकर पचतं आणि पॉट हलकं ठेवतं.

८. रक्तप्रवाह (ब्लड सर्क्युलेशन) सुरळीत ठेवते :
शरीराला योग्य पद्धतीने चालण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत चालणे खूप आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.

९. शरीराची ऊर्जा वाढवते :
सॉफ्ट ड्रिंक्स च्या ऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराची एनर्जी लेव्हल वाढते आणि डायजेस्टिव्ह सिस्टम पण नीट राहते.

१०. गुडघ्याचे दुखणे दूर करते :
गरम पाणी गुडघ्याचे दुखणे कमी करते. आपल्या मांसपेशींमध्ये ८०% भाग पाण्याने बनलेले आहे आणि पाण्यानेच मांसपेशींच्या गाठी दूर होतात.

No comments:

Post a Comment