बेशक ईद है ।
लेकिन
इंसान, इंसान को देखकर मुस्कुराये तो रोज ईद है ।
#ईदमुबारक
*ईदुलफित्र अर्थात रमजान ईद*
गेले महिनाभर अत्यंत भक्तिभावाने पालन केल्या गेलेल्या रमजान महिन्याची सांगता आज शव्वाल महिन्याच्या एक तारखेस रमजान ईद साजरी करून होत आहे .जगभरातील मुस्लीम बांधव त्यांचा सर्वात मोठा सण ईदुल फित्र किंवा रमजान ईद आज साजरी करीत आहेत.भौगोलिक कारणामुळे जगाच्या काही भागात ती कालही साजरी करण्यात आली .
रमजान महिन्यात अल्लाहच्या आदेशाने व प्रेषित हजरत पैगंबर यांच्या सांगण्यानुसार महिनाभर प्रार्थना , रोजा , नमाज , तरावीह, जकात, सदका आदिचं पालन करुन सर्वांनी अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला . त्या सर्व आदेशांची पूर्ति म्हणून अल्लाह कडून मिळणाऱ्या ईनाम प्राप्तीचा दिवस म्हणून ईद साजरी केली जाते . ईद म्हणजे आनंद किंवा खुशी . आजच्या दिवशी सर्वजण सकाळी नवे कपडे परिधान करून ईदगाह मध्ये जातात . तेथे खुल्या आकाशात प्रार्थना करून अल्लाह तआला चे आभार व्यक्त करतात . मोठया शहरातून मशिदीमध्ये ईदची नमाज आदा केली जाते .समस्त मानवांच्या कल्याणासाठी दुआ मागतात . नमाज आदा केल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देतात .घरी येऊन क्षिरखुर्मा खातात . लहान मुलांचा आनंद तर विचारायला नको .. ईदी च्या मिळालेल्या रकमेतून त्यांचा आनंद ओसंडत असतो .
ईदचा सण हा आनंदाचा असल्याने सर्व धर्मिय बांधव शुभेच्छा देऊन या आनंदात सहभागी होतात.
आज ईदचा आनंद साजरा करतांना परमेश्वराकडे एवढेच मागणे आहे कि-
*या अल्लाह* आमच्या देशात व राज्यात सुख , समृद्धी , शांतता ' प्रगती व एकता नांदू दे , सर्वांची प्रगती होऊ दे अन्याय , अत्याचार , जुलूम जबरदस्तीचा खातमा होऊ दे .न्याय, समता 'बंधुता यांची भरभराट होऊ दे . बेकारी , बेरोजगारी नष्ट करून रोजी रोटीचे प्रश्न सुटू दे . आमीन
ईदचा आनंद घेत असतांना सर्वांना मनःपासून ईदच्या शुभेच्छा .
*ईद मुबारक !*
"आसमान पे नया चाँद है आया,
सारा आलम ख़ुशी से जगमगाया,
हो रही है Saher-O-Aftar की तय्यारी,
सज रही हैं दुआओं की सवारी,
पूरे हों आपके हर दिलके अरमान,
मुबारक हो आप सब को प्यारा रमजान…!"
No comments:
Post a Comment