प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, 27 September 2017

*निवडणुक ,मतदान व कर्तव्य*

निवडणुक ,मतदान व कर्तव्य
# ग्रामपंचायत निवडणुक #

==============
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 मतदान अधिकारी कर्तव्य:
———————–

👤 मतदान केंद्राध्यक्ष:-

-पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.

-कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.

-आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.

-सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

-माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.

-सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.

-मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 *मतदान अधिकारी:- १*

-नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.

– ओळख पटवीणे.

-मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

 👤 *मतदान अधिकारी:- २*

– मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.

-डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.

-मतदार चिठ्ठी तयार करणे.


⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤  *मतदान अधिकारी:- ३*

-पक्की शाई तपासणे.

-मतदार चिठ्ठी जमा करणे.

-कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 *शिपाई :-*
मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

📩 *हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-*

————————-
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.

2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.

3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.

4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.

5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)

6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

📩 संविधानिक पाकिटे: (sealed):
(हिरव्या रंगाचे)

1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.

2) मतदार नोंद वही.

3) व्होटर स्लिप.

4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.

5) न वापरलेल्या मत पत्रिका.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

 📩 *असांविधानिक पाकिटे:-*
(पिवळया रंगाचे)

1) शिल्लक मतदार यादीची प्रत.

2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.

3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.

4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.

5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.

6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.

7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.

8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

*इतर साहित्याचे पाकिटे:-*
( खाकी रंगाचे)*
————————
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.

टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा……..

* प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

*प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.

       राष्ट्रीय कर्त्यव्यात सहभागी सर्व कर्मचारी ,अधिकारी वर्गास शुभेच्छा।।।।।।

जयराज नवनाथराव सोदले
BLO बोथी 286

No comments:

Post a Comment