प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 9 April 2018

🔮 *My School, My Activity* 🔮
      🚸 जि.प.प्रा.शाळा, बोथी 🚸
             ता.चाकूर जि.लातूर

   💥 *मोफत दंत चिकित्सा शिबिर* 💥

🎈 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी येथे ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त पाटील डेंटल  क्लिनिक, चाकूर च्या वतीने मोफत दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले.*

 🎈 *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोथी च्या सरपंच लताताई राठोड ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी रामराव चव्हाण, केंद्रिय मुख्याध्यापक इस्माईल पठाण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ आवाळे,मुख्याध्यापक गणपती जमादार,बालाजी तोटे,साधनव्यक्ती प्रकाश भालके,रवीराज देशमुख,व्यंकट जाधव,तलाठी एम.के.पाटील,अमोल तत्तापुरे हे होते.*

🎈 *शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.*
   
🎈 *डेन्टल सर्जन डॉ. केदार पाटील यांनी पहिली ते सातवीच्या १८० विद्यार्थ्यांची तपासणी करून सर्व विद्यार्थ्यांना एक टुथब्रश,एक पेस्ट व एक ग्लास दुध दिले.सर्व विद्यार्थ्यांना ब्रश कसा करावा याचे मार्गदर्शन करणारा व्हिडीओ दाखवून दाताची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.*

🎈 *यावेळी डॉ. केदार पाटील, रामराव चव्हाण, नवनाथ आवाळे,बालाजी तोटे,प्रकाश भालके यांनी शिबीराविषयी व शाळेविषयी मनोगत व्यक्त केले.*

🎈 *मोफत दंत चिकित्सा शिबीर जि.प. बोथी शाळेत घेतल्याबद्दल शाळेतर्फे डेन्टल सर्जन डॉ. केदार पाटील यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचे मनस्वी आभार.*

🎈 *तालुकास्तरीय आदर्श शिक्षक मिळाल्याबद्दल शाळेचे माजी विद्यार्थी बालाजी तोटे सर यांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला.*

🎈 *विद्यार्थ्यांपैकी  कु.सोनाली हाके,कु.अंकिता आवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.*

🎈 *कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयराज सोदले सर यांनी तर आभार इयत्ता सातवीची विद्यार्थीनी कु.रूपाली तिकटे हिने मानले.*

            💠 आमचे मार्गदर्शक 💠
          *श्री.संजयजी पंचगल्ले साहेब*
           [गटशिक्षणाधिकारी, चाकूर]
   
🌸 *बोथी टिम:-* ⤵⤵
श्री.गणपती जमादार
श्री.धनाजी दंडीमे
श्री.गोपाळ जोशी
श्री.जगन्नाथ वागलगावे
श्रीमती. सुचिता सुर्यवंशी
श्रीमती. मंगल स्वामी
श्री.जयराज सोदले

               ✍🏻 शब्दांकन ✍🏻
       *श्री.जयराज नवनाथराव सोदले*
           जि.प.प्रा.शाळा, बोथी
     jayrajsodle.blogspot.in





No comments:

Post a Comment