प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, 21 July 2018

*सात कोड्यांना आई ने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे*



*१. या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??*
  *मुले म्हणाली , तलवार...*
   
*आईने सांगितले.. जीभ..*
    कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो,  दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो.


          💝💝
*२. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??*

    एकजण म्हणाला, *सूर्य, चंद्र, आकाशगंगा...*
   
आई म्हणाली... *भूतकाळ.*

   माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.


             💝💝
    *३. या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???*

     दुसर्याने सांगितले की, *पृथ्वी, पर्वत, सूर्य.*

    आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.. *हाव*
     लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.


         💝💝
 *४. पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???*

    तिसर्या ने उत्तर दिलं... *पोलाद, लोखंड, हत्ती.*

    आई म्हणाली,  सगळ्यात कठिण वस्तू... *वचन.*

    *वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.*


           💝💝
    *५. पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??*

    चौथा म्हणाला .. *कापूस, हवा, धूळ, पाने.*
 
आई म्हणाली, *सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.*
     
पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.


           💝💝
    *६. पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???*

    पाचव्याने सांगितले, *आई, वडिल, मित्र, नातेवाईक.*

    आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे *'मृत्यू'.*

    कारण *कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.*


         💝💝
    *७. शेवटचा प्रश्न..*
    *या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??*

     मुले म्हणाली *खाणे, झोपणे, फिरायला जाणे.*

     आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, *आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*
         💝💝
    *वेळ काढून नक्की वाचा*

No comments:

Post a Comment