प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, 26 August 2018

*‼प्रकृतीचे तीन कडक नियम जे सत्य आहे.‼*

*1 प्रकृतिचा  पहिला  नियम*

सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी बुद्धीत *सकारात्मक* विचार  भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात.

*2 प्रकृतिचा दूसरा  नियम*

*ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.*

सुखी *सुख* वाटतो.
दुःखी *दुःख* वाटतो.
ज्ञानी *ज्ञान* वाटतो.
भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.
घाबरणारा *भय* वाटतो.

 *3 प्रकृतिचा तिसरा नियम*

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण

*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात.
*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो.
*बातचित* पचली नाही तर  *चुगली* वाढते.
*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो.
*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते.
*गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो.
*दुःख* पचले नाहीतर  *निराशा* वाढते.
आणि *सुख* पचले नाही तर  *पाप* वाढते.

No comments:

Post a Comment