प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, 21 August 2018



💥🇮🇳 *"भाई-भाई ग्रुप,चाकूर" तर्फे जिल्हा परिषद,बोथी शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊचे वाटप.* 🇮🇳 💥

_बोथी:-७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सकाळी  गावातून प्रभातफेरी काढण्यात आली व मुख्याध्यापक श्री.जमादार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमास विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,केशवराव पाटील विद्यालय संपूर्ण स्टाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता १ ली ते ७ वी च्या ५३ विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण स्पर्धेत सहभाग नोंदवला.यावेळी तंबाखुमुक्तिची शपथ घेण्यात आली.SMC अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली तर भाई भाई ग्रुप, चाकूर तर्फे अंगणवाडी क्रमांक १ व २ चे विद्यार्थी व जि.प.बोथी शाळेतील सर्व विद्यार्थी अशा एकूण २३५ विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी भाई भाई ग्रुप चाकूर चे अध्यक्ष शेख आसिफ, उपाध्यक्ष कुरेशी दाऊत,सचिव समाधान गायकवाड, किशोर भालेराव, प्रासाद कसबे,देवा कसबे,विजय मस्के,नय्युम कुरेशी, शेख सादिक,आलिम कुरेशी, एजाज कुरेशी,कृष्णा कांबळे इ.पदाधिकारी उपस्थित होते.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी Happy Clap ने सर्व मान्यवरांचे व भाई-भाई ग्रुपचे आभार मानले._

🤝🏻 *बोथी टिम:-*

🔸श्री.जमादार गणपती
🔹श्री.भोसले अविनाश
🔸श्री.जोशी  गोपाळ
🔹श्री.रायफळे बस्वराज
🔸श्री.मुंढे साधु
🔹श्रीमती स्वामी मंगल
🔸श्री.सोदले जयराज

🚸🎈🚸🎈🚸🎈🚸🎈🚸🎈🚸

No comments:

Post a Comment