प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, 25 August 2018

पंचायत राज समिती,PRC

_पंचायत राज समिती प्राथम्याच्या पार्श्वभूमीवर_ *लातूर तालुक्यातील मुख्याध्यापकांची पूर्वनियोजनासाठीची बैठक संपन्न*
_गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वाढवले मुख्याध्यापकांचे मनोबल_

🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

*लातूर :* (दि. २५ ऑगस्ट , २०१८)
               पुढील महिन्याच्या १० ते १२ तारखेदरम्यान लातूर जिल्ह्यात येऊ घातलेल्या पंचायत राज समितीला सामोरे जाताना करावयाच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता कशी करावी किंवा काय केली याचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापकांची एक दिवशीय कार्यशाळा येथील कॉक्सीट कॉलेजमध्ये संपन्न झाली. *गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे व शिक्षण विस्तार अधिकारी मा. शिवाजीराव  पन्हाळे* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत खालील बाबींची सखोल चर्चा झाली.

📌पंचायत राज समितीचा लातूर जिल्हा दौरा *१० ,११ , १२ सप्टेंबर २०१८*

📌१० सप्टेंबर जिल्हा परिषद स्तरावर साक्षनोंद

📌 *११ सप्टेंबर प्रत्यक्ष क्षेत्र भेटी ( शाळांसह ).* सायंकाळी विभागप्रमुखांची बैठक

📌१२ सप्टेंबर पुन्हा खातेप्रमुखांची बैठक ( जिल्हास्तर )

*शाळास्तरावर करावयाच्या बाबी ...*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🔮शालेय परिसर स्वच्छता

🔮शालेय रंगरंगोटी , वर्गातील तळफळे रंगवणे , फरशीवरील रंगकाम , शाळेचे नाव दर्शनी भागावर स्पष्ट असावे. नसल्यास  तात्काळ रंगवून घेणे.

🔮सर्व प्रकारची अनुदाने खर्चाच्या विवरणासह दर्शनी भागावर लावावे

🔮शाळा अनुदान , दुरुस्ती अनुदान , शिक्षक अनुदान यांचा विनियोगा बाबतचे सर्व रेकॉर्ड तयार ठेवावेत.

🔮शा. पो. आ. , 4% सादिल व SSA  चे पासबुक , चिकटबुक , कीर्द अद्ययावत ठेवावे.

🔮सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्यांचे रेकॉर्ड तयार ठेवावे.

🔮शा.पो.आ. आठवड्याचा मेन्यू चार्ट शाळेच्या दर्शनी भागावर लावावा. डिजिटल असल्यास उत्तम

🔮हॅण्ड वॉश स्टेशन सुरू असणे अत्यंत महत्त्वाचे. नसल्यास तात्काळ दुरुस्ती करावी. हात धुण्यासाठी लिक्विड , साबण ठेवावे. हात पुसण्यासाठी नॅपकिन ठेवावेत.

🔮पिण्याचे पाणी मेडिक्लोअरसह टाकीमध्ये भरून असावे. ग्लास , ओगराळे स्वच्छ असावे. मिनरल वॉटरचे जार सर्व मुलांसाठी ठेवता आले तर उत्तम

🔮स्वच्छता गृह चालू स्थितीत असावे. कुलूपबंद नसावे. नियमित वापर करावा. आवश्यकता असल्यास किरकोळ दुरुस्ती करावी. ( २७,२८,२९ ऑगस्ट संपूर्ण तालुकाभर शौचालय दुरुस्ती मोहीम)

🔮विद्युत जोडणी व मांडणी सुस्थितीत असावी.

🔮RTE 2009 चे निकष पूर्ण करावेत.

🔮मुख्याध्यापक कक्ष , वर्गखोल्या , किचन शेड , स्वच्छता गृह , पिण्याचे पाणी , ग्रंथालय आदी अद्ययावत स्थितीत असावे.

🔮सर्व समित्या अद्ययावत करून डिजिटल कराव्यात. दर्शनी भागात लावाव्यात.

🔮तंबाखूमुक्त शाळा संचिका तयार ठेवावी. तंबाखूमुक्तीचे बॅनरही लावावे.

🔮मुख्याध्यापकांनी शिक्षकनिहाय लॉग बुक भरावे. शिक्षकांच्या वैयक्तिक संचिकाही तयार ठेवाव्यात.

🔮शिक्षक दैनंदिनी , टाचण वही १५ जून पासून अद्ययावत करावी. आतील सर्व नोंदी कराव्यात.

🔮वर्गशिक्षकांनी विद्यार्थी संचिका , संचयी नोंदपत्र सुस्थितीत ठेवावेत.

🔮वयानुरूप प्रवेशाची मुले असल्यास त्यांचा सर्व दस्तऐवज तयार ठेवावे.

🔮प्रवेशपात्र विद्यार्थी यादी , प्रत्यक्ष झालेले प्रवेश , आलेल्या टी.सी. , गेलेल्या टी.सी. आदींचे रेकॉर्ड तयार ठेवावे.

🔮 प्रत्येक वर्गात आरसा , कंगवा , सुगंधित प्रसाधने , नखाळी (नेल कटर) , नॅपकिन ठेवावे.

🔮शा.पो.आ.चे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे. पूरक पोषण आहार कोणत्याही परिस्थितीत द्यावाच. आहार शिजवताना शासन स्तरावरून निर्धारित प्रमाणानुसार भाजीपाला वापरावा. नमुना दुसऱ्या दिवसाच्या दुपारपर्यंत ठेवावा.

🔮 जिल्हा धूरमुक्त करण्यासाठी १४व्या वित्त आयोगातून शाळेसाठी तात्काळ LPG गॅस कनेक्शन घ्या. ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करा. ग्रामसेवक / सरपंच प्रतिसाद देत नसतील तर गशिअ कार्यालयाशी संपर्क साधा.

🔮 परिपाठ वैविध्यपूर्ण करण्यावर भर द्यावा. *सोम-मंगळ English* , _बुध-गुरू हिंदी_ आणि *शुक्र-शनी मराठी* प्रार्थना , गाणी घ्यावेत.

🔮परिपाठात हात धुण्याच्या सहा पायऱ्या घेण्यात याव्यात.

🔮ड्रेस कोड : - *शिक्षक* -पांढरा शर्ट व काळी पॅन्ट आणि *शिक्षिका* - लाल काठाची पांढरी साडी.(PRC चे तीन दिवस हाच गणवेश परिधान करावा.)

🔮 विद्यार्थी वाचनालयाचे देवघेव रजिस्टर अद्ययावत असावे. विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकांची नोंद त्यात असावी. साठा रजिस्टरही अद्ययावत असावे. उपलब्ध जागेनुसार वाचन बाग , वाचन कुटी , वाचन कट्टा , वाचन दोरी कार्यान्वित करावी.

🔮रचनावादी कृतींचा भरपूर सराव घ्यावा. पारंपरिक पद्धतीने अध्यापन करू नये.

🔮सर्वांनी मुख्यालयी राहात असलेबाबतचे स्वयंघोषणापत्र द्यावे.

🔮प्र. शै. महाराष्ट्र संबंधाने आवश्यक त्या सर्व शासन निर्णयांची माहिती ठेवा.

🔮 विद्यार्थ्यांना दिलेली वृक्षसंवर्धन कार्डे भरून आवश्यक त्या नोंदीसह तयार ठेवावीत.

🔮प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेतलेल्या सर्व चाचण्यांचे पेपर , उत्तरपत्रिका व नोंदवह्या एकत्रित करून ठेवाव्यात.

🔮मोफत पाठ्यपुतके वाटपाच्या सर्व नोंदी ठेवाव्यात. पुस्तकांचे समायोजन तात्काळ केंद्रात द्यावे.  एकही पुस्तक शिल्लक नाही याचे हमीपत्र केंद्रात द्यावे.

🔮शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा यांचे निकाल , शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या संकलित स्वरूपात ठेवावी.
             शा.पो.आहार अधीक्षक वर्ग २ मा. शिंगडे साहेबांनी शालेय पोषण आहार योजनेबाबतच्या अत्यावश्यक बाबींची माहिती दिली. पंचायत राज समितीला सामोरे जाताना काय तयारी करावी याचेही सुंदर विवेचन केले.
              *पंचायत राज समितीचा दौरा आपल्यासाठी आपले काम दाखवण्याची सुवर्णसंधी असल्याचा  सकारात्मक विचार करून सर्व मुख्याध्यापकांनी वरील सर्व बाबींची शाळास्तरावर पूर्तता करून लातूर तालुक्याच्या शैक्षणिक लौकिकाबरोबर नेटक्या कार्यालयीन कामकाजाचाही लातूर पॅटर्न बनवावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे यांनी केले.*
              दरम्यान *काRवां* ग्रुपच्या वतीने सीड बॉल बनवण्याचे प्रात्यक्षिक घेतले गेले. शिक्षक व अधिकारी यांनी प्रत्यक्ष सीड बॉल निर्मितीचा आनंदही घेतला. ही मोहीम आपल्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
               याच कार्यक्रमात *जि.प.प्रा.शा. पारूनगर मुरुडचे कल्पक मुख्याध्यापक दिलीपराव जाधव* संपादित *पंख नवे गगन नवे* हा विद्यार्थ्यांच्या साहित्याविष्काराचा पुस्तकरूपी ठेवा तालुक्यातील सर्व शाळांना सस्नेह भेट देण्यात आला.
          या बैठकीच्या यशस्वीतेसाठी *मा. शिवाजीराव पन्हाळे , मा. पोतदार साहेब , मा. डी. सी. गायकवाड , मा. जी. आर. घाडगे , मा. बालाजी कोळी , मा. मेनगुले साहेब , सर्व विषय साधन व्यक्ती , विशेष शिक्षक व शिक्षण विभागातील कर्मचारी* आदींनी मेहनत घेतली.

_*सारांश ,*_
       _*पंचायत राज समितीच्या अनामिक दडपणाखाली असलेल्या मुख्याध्यापकांसाठी आजची बैठक नवचेतना देणारी ठरली.....*_

                 
                               ✒             
               *- विद्यासागर काळे*

No comments:

Post a Comment