💠 *My School,My Activity* 💠
🚸 जि.प.प्रा. शाळा, बोथी 🚸
ता.चाकूर जि.लातूर
🎈 *विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी साजरा केला मुख्याध्यापकांचा वाढदिवस* 🎈
नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचाच एक भाग म्हणून *आज दिनांक ०७ जुलै शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार जी.जी.यांचा वाढदिवस* मोठ्या उत्साहात शाळेत विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी साजरा केला व सरांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली.सरांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते *विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप* केले.यावेळी *नवनाथाप्पा आवाळे,कोंडीबा शेवाळे, मधुकर कोईलवाड, शेषराव कांबळे, निता माने,सरोजा कांबळे* उपस्थित होत्या.
यावेळी *सर्व विद्यार्थी, अविनाश भोसले, साधुभाऊ मुंढे,बस्वराज रायफळे, गोपाळ जोशी ,मंगल स्वामी, जयराज सोदले* यांनी *जमादार सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.*
_"तुमचा मनमोकळा स्वभाव_
_आणि सगळ्यांशी अगदी_
_नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत.._
_या दोन्ही गोष्टींमुळे,_
_तुमचा सहवास नेहमीच_
_हवाहवासा वाटतो!_
_कुणाशीही, अगदी विचारांचे_
_मतभेद असणाऱ्या माणसांशीही,_
_तुमची अगदी जिवलग मैत्री असते.._
_म्हणून तर, लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही_
_सगळ्यांचेच लाडके असता.._
_परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं…_
_हेच त्याच्याकडे मागणं!"_
_-जयराज सोदले._
🎈🎂🎈🎂🎈🎂🎈🎂🎈🎂🎈
No comments:
Post a Comment