प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, 16 October 2018

🎈 *My School,My Activity*  🎈
     🚸 *जि.प.प्रा.शाळा, बोथी* 🚸
            *ता.चाकूर जि.लातूर*

      💥  *पालकसभा* 💥

              आज दिनांक १६/१०/२०१८ वार मंगळवार रोजी जि.प.प्रा.शाळा, बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे पालकसभा घेण्यात आली. *पालकसभेच्या आध्यक्षस्थानी श्री.कोंडीबा शेवाळे होते.प्रमुख पाहुणे नवनाथ आवाळे,धनराज गिरी,राजाराम महात्मे,मु.अ.जमादार सर हे होते.*
          अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
          प्रास्ताविकामध्ये जयराज सोदले यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती सांगीतली. पालक विकास भोसले व नवनाथ आवाळे यांनी शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
          या पालकसभेत पुढील विषयावर चर्चा करण्यात आली :-
*१)विद्यार्थी गुणवत्ता वाढविणे.*
*२)विद्यार्थी उपस्थिती वाढविणे.*
*३)लोकवाटा जमा करणे.*
*४)नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात चर्चा.*
*५)गोवर,रुबेला लसीसंदर्भात माहिती देण्यात आली.*
*६)शालेय पोषण आहार.*
*७)शालेय गणवेश व स्वच्छता.*
*८)अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.*
*९)शाळा प्रगत करण्यासंदर्भात चर्चा.*
*१०)प्रथम सत्र परीक्षा व दिवाळी आभ्यास.*
             _पालक सभेस मोतीवार निवृत्ती, महात्मे राम,विलास गिरी,शेवाळे वैजनाथ, जयश्री केंद्रे,रूक्मिण पिंपळे,अभंग हाके,दारफळे भिमराव,माने संदिप, गायकवाड पद्माकर, तिकटे पंढरी, डोंगरे भरत,आवाळे सरोजा,माने अनिता,पंढरी इर्ले,अरूण दारफळे, आवाळे ईश्वर,रमेश दुधाळे,महात्मे बंडोपंत,देगणुरे सोपान,महात्मे लक्ष्मण,सिद्धेश्वर शेवाळे,माने संदिप, गायकवाड आकाश,पिटले त्र्यंबक,शेवाळे दैवशाला इ.पालक उपस्थित होते. उपस्थित सर्व पालकांनी *शाळेबद्दल समाधान* व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले._
          कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुंढे साधु यांनी तर आभार जोशी गोपाळ यांनी मानले.पालकसभेच्या यशस्वीतेसाठी अविनाश भोसले, बस्वराज रायफळे,मंगल स्वामी यांनी प्रयत्न केले.

💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠










No comments:

Post a Comment