प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, 16 September 2017

🌸 *My School,My Activity* 🌸
    🚸 जि.प.प्रा.शाळा,बोथी 🚸
           ता.चाकूर जि.लातूर

⚽ *महाराष्ट्र मिशन फुटबॉल 1 मिलियन* ⚽

           *"प्रत्येक पाऊल*
         *इतिहास घडवेल......*
                   *फुटबॉल वेड*
           *नसानसात ठसेल!"*

⚽ *आज दिनांक:- 15 सप्टेंबर 2017 वार शुक्रवार रोजी जि.प.प्रा.शाळा बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन चाकूर/शेळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हरीश्चंद्र घटकार साहेब व बोथी शाळेचे मु.अ.श्री जमादार जी.जी.यांच्या हस्ते करण्यात आले.*

⚽ *फुटबॉल स्पर्धेत इ.1 ली ते 7 वी च्या एकुण 186 विद्यार्थींनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला.*

⚽ *बोथी गावातील पालक व नवयुवकांनीही फुटबॉल सामना खेळला व विद्यार्थींचे सामने आनंदाने व उत्साहाने पाहिले.*

⚽ *बोथी येथे फुटबॉल चे सामने हे लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नीलिमा अडसूळ मॅडम व चाकूर चे गटशिक्षणाधिकारी श्री संजयजी पंचगल्ले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.*

⚽भारतामध्ये *फिफा अंडर 17* या  जागतिक फुटबॉल स्पर्धा दिनांक 06 ऑक्टोबर 2017 पासून सुरू होणार आहेत.भारतामध्ये हे सामने *मुंबई, दिल्ली, पणजी, गुवाहटी,कोलकत्ता* येथे होणार आहेत.त्या अनुषंगाने *फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी,जास्तीत जास्त मुलांनी मैदानावर खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ* होण्यास मदत होईल.या दृष्टीने *बोथी* शाळेत *फुटबॉल मिशन 1 मिलियन* अंतर्गत फुटबॉल फेस्टिवल घेण्यात आला.

⚽ *फुटबॉल स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक दंडीमे सर,जोशी सर,वागलगावे सर,स्वामी ताई,सोदले सर यांनी परीश्रम घेतले.*

 ✔ *"आरोग्य अन् आनंदासाठी फुटबॉल."*

            शब्दांकन
   जयराज नवनाथराव सोदले
जि.प.प्रा.शाळा,बोथी ता.चाकूर
jayrajsodle.blogspot.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖











No comments:

Post a Comment