प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 31 August 2017

🚑🚨 *रोटरी क्लब,चाकूर च्या रुग्णवाहिकेसाठी अजित घंटेवाड यांची २१,००० ₹ ची मदत* 🚑🚨
----------------------------------------------------------
आज दिनांक:-३१/०८/२०१७ रोजी *रोटरी चाकूर चे अध्यक्ष रो.युवराज पाटील,सचिव रो.शिवदर्शन स्वामी व रो.संचालक मंडळाच्या* हाकेला ओ देऊन *मनसे तालुकाध्यक्ष अजित घंटेवाड यांनी रूग्णवाहिकेसाठी २१,००० ₹ ची मदत देऊन खारीचा वाटा उचलला.*
              उद्योगधंद्यांत प्रसिद्धी मिळविलेल्या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत,समाजाची सेवा करावी व अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून स्थापिलेली एक आंतरराष्ट्रीय नागरी संस्था. *भूतदया, मानवतावादी व शैक्षणिक प्रकल्प* यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांतील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्री यांची जोपासना वृद्धिंगत व्हावी, हा रोटरी संस्थेचा मुख्य उद्देश मानला जातो.
        चाकूर हून बनसावरगावला मधल्या रस्त्याने जात असताना *पवण सतिश झांबरे* या मुलाला शेतात साप चावल्यामुळे अजित घंटेवाड यांनी स्वतःच्या बुलेटवर घेऊन जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र चाकूर येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय लातूर येथे रूग्णवाहीकेमध्ये पाठवले व तेथे *रूग्णवाहिकेमुळे* योग्य वेळी  पोहचल्यामुळे पवण झांबरे या मुलावर वेळीच उपचार झाला व *प्राण वाचले.*
        *रोटरी चाकूरचा* हा स्तुत्य  व सर्वसामान्य जनतेसाठी *लोकोपयोगी* उपक्रम आहे. या  रूग्णवाहिकेचा वापर हा *अपघात झालेल्या व्यक्तींसाठी, ह्रदयरोगी,गरोदर माता भगीनीं,तातडीची वैद्यकीय सेवा* इत्यादी साठी होणार आहे.
         यावेळी सोबत *मनसे कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,मनसे शहर अध्यक्ष अजय धनेश्ववर,सौदागर शेडुळे,विष्णू फरकांडे,विठ्ठलप्रसाद झांबरे,अविनाश झांबरे,बालाजी माळी,गणेश चव्हाण,गणेश बिरादार ,मनविसे तालुकाध्यक्ष दत्ता सूर्यवंशी,हरीश्चंद्र जिंकलवाड,वर्धमान कांबळे* उपस्थित होते.

          🙏🏻   *"सेवा स्व से उपर"*  🙏🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment