गेली ३२८ वर्षे भिमा इंद्रायणी संथपणे वाहताहेत आणी संपुर्ण जगाला सांगताहेत,
थरारलो होतो आम्ही १४ मे १६८९ रोजी कारण याच दिवशी भारतमातेचा एक सच्चा सुपुत्र धर्मरक्षणाकरिता स्वातंत्र्यवेदीच्या पेटलेल्या धगधगत्या अग्निकुंडात पावन होताना आम्ही माना वळवून पाहत होतो...!!!
"आम्ही पाहत होतो तुम्ही बदनाम केलेला एक सर्जा देव,देश अन धर्मासाठी बलिदान देताना,आम्ही पाहत होतो स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणारा रौद्र शंभुराजा.आम्ही पाहत होतो राष्ट्रासाठी,स्वाभिमानासाठी शहीद होत असणारा एक रांगडा धुरंदर..!!
थरारालो होतो आम्ही दोघी,
अरे.!काय ते शौर्य,काय तो निडरपणा,काय ते राष्ट्रप्रेम,काय ती स्वराज्यावरील निष्ठा,समोर मृत्यु आहे हे दिसत असूनही मृत्युला ही न घाबरता महाराष्ट्र मातीसाठी आपल्याच मातीत रक्ताचा अभिषेक घालणारा एक अनामि विर आम्ही पाहत होतो...!!
अरे.! वेडा होता संभाजी.वेडा..!त्याला वेड होतं शिवरायांच्या स्वराज्याचं,त्याला वेड होतं धर्म रक्षणाचं,त्याला वेड होतं फक्त जिंकण्याचं,त्याला वेड होतं वादळाशि झुंजण्याचं,त्याला वेड होतं रयतेचं,त्याला वेड होतं मातीचं,त्याला वेड होतं स्वाभिमानाचं,त्याला वेड होतं राष्ट्राचं..!!!
अरे.! आम्ही पाहिलं,जिभ कापली शंभुची पण मुखातुन जगदंबेचा जयजयकार थांबला नव्हता..!!!
अरे.! आम्ही पाहीलं डोळे काढले या सर्जाचे पण राष्ट्रोन्नतीचं दिव्य स्वप्न मिटलं नव्हतं...!!!
अरे.! आम्ही पाहिलं बोकडासारखं अंग सोलुन काढलं या नररत्नाचं पण गनिमापुढे झुकला नव्हता कि शिवरायांच्या स्वराज्याशी द्रोह केला नव्हता..!!
अरे.! आम्ही पाहिलं,रक्तबंबाळ झाला हा जिजाऊच्या काळजाचा तुकडा पण त्याने स्वराज्याचा सौदा केला नव्हता...!!
पण दुर्देव,दुर्देव या शिवपुत्राचं,
जो संभाजी आम्ही पाहिला तो खरा संभाजी ३२८ वर्षे झाली तुम्हाला समजलाच नाही..!!
अरे.! कुणाला बदनाम करत राहीला तुम्ही,ज्याच्या नावाने मृत्युला देखील कापरं भरलं त्या मृत्युंजय छाव्याला कलंकित करत राहीला..!!
अरे.! ज्याने "मराठा" ही ओळख दिली त्या बापालाच तुम्ही बदनाम करत राहीला..!!
अरे.! ज्याच्या जिवावर तुम्ही ३२८ वर्षे दुनियेसमोर "मराठा" म्हणुन नुसता माज केला त्या शिवपुत्राची बदनामी उघडया डोळयानी बघत राहीला...!!!
अरे.! ज्याच्या रक्ताचा शेवटचा थेंब देखील या मातीसाठी,धर्मासाठी खर्ची पडला त्या धर्मविराची बदनामी ३२८ वर्षे सहन करत राहीलात...!!
किती कृतघ्न निघालात तुम्ही..??
हा त्याग,हे बलिदान,हि साधना फक्त तुमच्यासाठी केलिरे शिवाच्या या पराक्रमी लेकरानं,पण तुम्ही मात्र खरा संभाजी कधी बघितलाच नाही जो आम्ही बघितला...!!!
अरे.! एकदा विचारा या गडकोट किल्ल्यांना,विचारा या सह्याद्रीला,विचारा कधी भिमा इंद्रायणीला कि,
सांगा आमचा हा सर्जा होता कसा..???
३२८ वर्षे झाली,
या भिमा इंद्रायणी आम्हाला सांगताहेत कि,हा संभाजी आमच्यासारखाच नितळ आणी स्वच्छ चारित्र्याचा होता..!!
अरे..! तो पुरंदर सांगतोय,माझ्या कुशित जन्मलेला संभा हा माझ्यासारखाच बुलंद होता..!!
अरे.! तो प्रतापगड सांगतोय हा सर्जा माझ्यासारखाच प्रतापि होता...!!
अरे.! तो रायगड सांगतोय हा संभाजी माझ्यासारखाच उत्तुंग,आकाशासी स्पर्धा करणारा होता..!!
अरे.! तो राजगड सांगतोय हा रणमर्द माझ्यासारखाच पोलादि मनगटाचा होता..!!
अरे.! तो पन्हाळा सांगतोय कि हा जिजाऊच्या काळजाचा तुकडा माझ्यासारखाच सुंदर आणी अति रूपवान होता..!!
अरे.! तो सिंहगड सांगतोय हा छावा माझ्यासारखाच सिंहाच्या छताडाचा होता..!!
अरे.! तो रामशेज सांगतोय हा मृत्युंजय संभा माझ्यासारखाच अजिंक्य होता..!!
अरे.! तो विशाळगड सांगतोय संभाजी हा माझ्यासारखा विशाल मनाचा होता..!!
अरे.! तो शिवनेरी सांगतोय सईच्या गर्भातुन जन्मलेला हा सूर्य माझ्यासारखाच पवित्र आणी पावन होता..!!
तो सहयाद्री गेली ३२८ वर्षे झाली आम्हाला हेच सांगतोय कि,संभाजी हा माझ्या या द-याखो-यात,घनदाट अरण्यात वादळासारखा झेपावणारा,गनिमावर तुटुन पडणारा,एकही लढाई न हरलेला सच्चा वीर होता...!!!!!!!!!
"मी नेपोलियन वाचला,अलेक्झांडर वाचला,सिझर वाचला,महाराणा वाचला,सम्राट अशोक वाचला जगातील अनेक नामवंत धुरंदर योध्यांचा इतिहास वाचला पण जेव्हा संभाजी राजांचा खरा इतिहास वाचला तेव्हा इतिहासाचं अक्षरश: वेड लागलं"..कारण तेव्हा मला खरा संभाजी समजला..!!!!!
🙏जय भवानी 🙏
🙏 जय शिवाजी🙏
🙏 जय जिजाऊ🙏
🙏 जय शिवराय🙏
🙏जय रौद्र शंभुराजे 🙏

No comments:
Post a Comment