प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, 21 April 2017

🎯 *My School,My Activity* 🎯
    🚸 *जि.प.प्रा.शाळा,बोथी*  🚸
            *ता.चाकूर जि.लातूर*

🗓 *माहे फेब्रुवारी 2017 चे उपक्रम* ⤵⤵

    1⃣💥💧🌳 *क्षेत्रभेट* 🌍🌷💥

    { _*निसर्गसहल व वनभोजन*_}

दिनांक १३/०२/२०१७ वार सोमवार रोजी *क्षेत्रभेट* अंतर्गत *बोथी येथील आधुनिक शेतकरी श्री त्र्यंबकराव पाटील* व *लघुउदयोजक श्री नारायण दारफळे यांच्या विटभट्टिस* क्षेत्रभेट देण्यात आली तसेच त्यांची *मुलाखत* घेण्यात आली.
     भेटीमध्ये शेतीच्या कामासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,शेतीची कामे,नदीचे उपयोग,पर्यावरणाचे रक्षण,पाण्याचे उपयोग,पाण्याचे प्रदुषण,सिंचनाच्या अधुनिक पद्धती,वाहतुकिचे नियम,फुलशेती,रब्बीची पिके,खरीपाची पिके,मोलाचे अन्न,भाजीपाला इत्यादि विषयी माहिती घेण्यात आली.
        *क्षेत्रभेटिचा लेखी अहवाल* विद्यार्थ्यांनी सादर केला व त्यांना शाळेच्या वतीने *बक्षिस* देण्यात आले.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

     2⃣  💥⛳ *शिवजयंती*⛳💥

दिनांक १९/०२/२०१७ वार रविवार रोजी *छत्रपती शिवाजी महाराजांची ३८७ वी जयंती मोठ्या उत्साहात* साजरी करण्यात आली.जयंती निमित्त शाळेत *भाषण स्पर्धा* आयोजित करण्यात आल्या व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.विद्यार्थ्यांनी केलेल्या संपूर्ण भाषणाचे मोबाईल द्वारे *व्हिडीओ रेकॉर्डिंग करून शाळेतील संगणकात जतन करून ठेवण्यात आले.*

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

   3⃣💥🍩🍿 *आनंदनगरी* 🍉🥕💥

{ _*विद्यार्थ्यांनी भरवलेला बाजार /FunFair*_}

दिनांक २०/०२/२०१७ वार सोमवार रोजी आनंदनगरी घेण्यात आली.स्वनिर्मित खादय पदार्थांची विक्री, स्वकमाईचा आनंद,प्रत्यक्ष व्यवहारी ज्ञान,व्यापार कसा करावा?,गणिती क्रियांचे दृढिकरण,नफा-तोटा,संभाषण कौशल्य,वेळेचे नियोजन,मालाची जाहिरात इत्यादी माहिती विद्यार्थ्यांनी *प्रत्यक्ष अनुभवातून* घेतली.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

4⃣💥🎓 *स्वयंशासन दिन* 🖊💥

   { _*बोथीचे विद्यार्थी बनले गुरूजी*_ }

दिनांक २७/०२/२०१७ वार सोमवार रोजी स्वयंशासन दिन घेण्यात आला. संपूर्ण दिवसाचे परीपाठ ते वंदेमातरम् १०.०० ते ०४.३० पर्यंतचे नियोजन व अंमलबजावणी इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरीत्या पार पडले. *मु.अ.म्हणून गायकवाड प्रतिक्षा,उप.मु.अ.अर्चना धायगुडे,सेवक पिटले गोविंद तर उर्वरीत विद्यार्थ्यांनी सह शिक्षक म्हणून प्रत्यक्ष वर्गावर जाऊन अध्यापन केले.*
     शेवटी दिवसभरातील कामकाजासंदर्भात सर्वांनी मनोगत व्यक्त केले.इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी *शुभेच्छा* देण्यात आल्या. 💐💐

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

👉🏻👉🏻
*श्री दंडीमे सर,श्री गुरमे सर,श्री जोशी सर,श्री वागलगावे सर,श्रीमती सूर्यवंशी मॅडम,श्रीमती स्वामी मॅडम,श्री सोदले सर.*

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄












No comments:

Post a Comment