🎈 *बोथी येथे हाळदी कुंकू कार्यक्रम व माता पालक मेळावा संपन्न* 🎈
[ _जिल्हा परिषद शाळा, आंगणवाडी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बोथी यांच्या संयुक्त विद्यमाने_ ]
🔹 *आज दिनांक 09/02/2019 वार शनिवार रोजी माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लताताई राठोड या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी.के.सावंत, एस.डी.कांबळे,मु.अ.जमादार जी.जी., अंगणवाडी सुपरवायजर शोभा माने,विष्णू तिकटे,आर्चना तिकटे,किनगावकर संतोष, लिंबोटे राजकुमार, आकाश कांबळे, कोईलवाड मधुकर हे होते.*
🔸 *कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुंदर असे स्वागत गीत गाईले.*
🔹 *यावेळी डॉ.डी.के.सावंत यांनी आपल्या भाषणातून महिलांचे आरोग्य, बालकांचे कुपोषण, साथरोग, बेटी बचाव-बेटी पढाव इ.विषयावर मार्गदर्शन केले.*
🔸 *एस.डी.कांबळे यांनी बालकांची स्वच्छता व घ्यावयाची काळजी याविषयी हसत खेळत माहिती दिली.*
🔹 *आंगणवाडी सुपरवायझर शोभा माने यांनी आंगणवाडीतील बालकांसाठी, किशोरवयीन मुली,गरोदर माता व वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण याविषयी माहिती सांगितली.*
🔸 *आंगणवाडी ताई अनिता माने यांनी तिळगुळाचे महत्त्व व कुंकवाचे महत्त्व याविषयी उपस्थित मातांना माहिती सांगितली.*
🔹 *गोपाळ जोशी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती, ई लर्निंग, लोकवाटा, मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व,संक्रांतीचे भौगोलिक महत्त्व, बालविवाहाचे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगितली.*
🔸 *कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साधु मुंढे यांनी तर आभार प्रदर्शन सरोजा कांबळे यांनी केले.*
🔹 *कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगल स्वामी,ANM दिपाली भोरगीर,ANM सुषमा बोधगीरे,आशा वाडकर सुनिता, आशा कारले,आलट छाया,गिरी सुलोचना,अविनाश भोसले,बस्वराज रायफळे,जयराज सोदले यांनी प्रयत्न केले.*
_"आठवण सूर्याची,साठवण स्नेहाची_
_कणभर तीळ,मनभर प्रेम_
_गुळाचा गोडवा,स्नेह वाढवा"_
*"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
आमचे मार्गदर्शक:-
🌹 *श्रीमती वंदनाताई फुटाणे मॅडम*
[गटशिक्षणाधिकारी,चाकूर]
🌹 *श्री बालाजी बावचे साहेब*
[शिक्षण विस्तार अधिकारी,चाकूर]
🌹 *श्री हरिश्चंद्र घटकार साहेब*
[केंद्र प्रमुख,चाकूर]
🌹 *श्री पठाण आय.एस.सर*
[केंद्रिय मुख्याध्यापक,चाकूर]
🚸 *प्रा.शा.बोथी टिम* 🚸
jayrajsodle.blogspot.in
💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠
No comments:
Post a Comment