प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 31 December 2018

*•••••••••••○ कृतज्ञता ○••••••••••*
                      *२०१८*
                        🙏🏻
*•••••••••••○ स्वागतम् ○••••••••••*
                      *२०१९*
                        🙏🏻
           *माणसं भेटत गेली,*
         *मला आवडली आणि* 
          *मी ती जोडत गेलो !!*
                    *चला ..*
    *या वर्षाचा हा अखेरचा दिवस* 
    *माझ्याकडून वर्षभरात काही चुक*
     *झाली असेल तर मोठ्या मनाने*
     *मला माफ करा !!*
*क्षमा करा !!!!*
         *आणि तुमच्या या प्रेमळ*
     *मैत्री व आशिर्वादाबद्दल आपणांस खुप सारे*
          *🙏🏼धन्यवाद.. !!!!*

   *तुमच्या या मैत्रीची व आशिर्वादाची साथ यापुढे ही*
        *अशीच कायम असू द्यावी.*
*हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.*

                  *आपला*
            *जयराज सोदले*
              *तालुकाध्यक्ष*
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस,चाकूर
               *सह शिक्षक*
       जि.प.प्रा.शाळा, बोथी
       ☎ ९४२१९६९३७३
   jayrajsodle.blogspot.in

💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠

Sunday, 2 December 2018

काही दिवसांपूर्वी *नाणे* विषयक चर्चा चाललेली , त्या संदर्भाने कॉपी पेस्ट पोस्ट...
👇🏼👇🏼👇🏼
शिवकाळाआधी, शिवकाळी आणि शिवकालोत्तर व्यवहारात असलेल्या चलनाचा शब्दकोष -
* अटका,अडका- सुपारी
* अधेला- अर्धा पैसा
* अधेली- अर्धा रुपया
* अर्दी- एक पै
* आगुदान- देवगिरिच्या यादवांचे सुवर्णाचे नाणे
* आसु- देवगिरीच्या यादवांचे एक चांदीचे नाणे
* उदानका- पैसा
* कपर्दक,कपर्दिका-कवडि
* कलदार- इंग्रजी शिक्क्याचा सूरत येथील रुपया
* कार्षापण- जुन्या काळातिल नाणे
* गबर- एक सोन्याचे नाणे
* गिनी- इंग्लंडमधील एक सोन्याचे नाणे
* गिन्नी- हिन्दूस्थानातील एक आणा किमतीचे नाणे
* घुला- पिवळसर रंगाची मोठी कवडि
* चकार, चकारा, चकारी- चवला, दोन आण्याचे नाणे
* चक्रम- दक्षिणेतिल एक सुवर्ण नाणे
* चवल,चवली- दोन आण्याचे नाणे
* चाम- सुवर्ण नाणे
* चाल- एक नाणे
* चौली-चवली
* दुणेली- एक आणे किमतीचे नाणे
* छदाम- पैश्याचा एक चारुर्थांश, दोन दमड्या,सहा दाम
* टाक- चांदीचा रुपया
* टाली- आठ आणे,अधेली
* टोली- पैश्याचा आठवा हिस्सा
* तांग- सोळा पयांचे एक चलन, आणेली
* ताट- पुतळी, अजमासे पांच रूपये किमतीचे सुवर्ण नाणे
* तांबली-तांब्याचे एक शुद्र नाणे
* तिवल- दीड आणा
* दुवल- एक आणा
* दुवली- आणेली
* तिरकी- एक पै, रुका
* तुरु- एक प्रकारचे नाणे
* दमडी- पैश्याच्या चौथ्या हिस्याचे किंवा दहा बारा कवड्यांच्या किमतीचे नाणे
* दाभोळीलारी- दाभोळ बंदर टांकसाळीत पडलेले आदिलशाही चांदीचे नाणे. याचा आकार स्त्रियांच्या हेअर पिनसारखा होता
* दाम- तांब्याचे नाणे
* दिडकी- एक पैसा, दीड दुगाणी नाणे
* दिरम, दिरिम- दोन आणे किमतीचे चांदीचे नाणे
* दुकंडा- दोन कवड्यांचे चलन
* दुगनी- तांब्याचे जुने नाणे
* दुगाणी- अर्धा पैसा
* दुदांडी- दोन समांतर रेषा असलेली पेशवाहि शिवराई
* दुकार- एक आणा
* दुडु- पैशाच्या एक चतुर्थांश किमतीचे नाणे
* दुवल- रुपयाचा सोळावा भाग
* दुवली- आणेली
* दोकडा- गुजराथमधील नाणे परिमाण
* धरण- सम्मुचयाने नऊ आणे, पाव होन
* नासरी- अर्धी दमडी
* निमति- अधेली, आठ आणे
* निष्क- एक सोन्याचे नाणे, चार रूपये कीमतीचे एक परिमाण
* पचकी- दमडीच्या किमतीचे एक तांब्याचे नाणे
* पताक- एक रुप्याचे नाणे
* पाई- पै
* पागोडा- मद्रासमधील सोन्याचे नाणे
* पाची- पांच रूपये किमतीचे सोन्याचे नाणे
* पार्दाव- पोर्तुगीज नाणे
* पावणा- पाव आणा
* पावला, पावली- रुपयाचा एक चतुर्थांश, चार आणे कीमतीचे नाणे
* पै- आण्याचा बारावा भाग
* पैसा- आण्याचा चौथा भाग, तांब्याचे एक नाणे
* पोवन- सावरिन नावाचे सोन्याचे नाणे
* पुतळी- हिन्दुस्ताणात चलनात असलेले प्राचीन ग्रीक रोमन नाणे
* फनम- दक्षिणेतिल चांदी किंवा सोने याचे एक लहान नाणे
* फसकी- फांसा असलेलि पुतळी
* फाटा, फांटा- रुपयाचा सोळावा भाग, आणा
* बेल- अर्धा आणा
* बोडी- वीस कवड्यांचे एक नाणे
* ब्याळ- अर्धा आणा
* मुयेद- अट्ठावीस रूपये किमतीचे एक नाणे
* मोहर- सोन्याचे एक तोळा वजनाचे नाणे
* म्वार- मोहर
* रयाल- एक चांदीचे नाणे
* रुका, रुक्का- आण्याचा बारावा भाग
* रुपया- सोळा आणे किमतिचे चांदीचे नाणे
* रुब- चार पै,
* रूबल- रूस देशातील दीड रुपया किमतिचे एक नाणे
* रेवती- अधेली, अर्धा रुपया
* रेस- आण्याच्या 25 वा व रुपयाचा 400 वा भाग, एक पोर्तुगीज नाणे
* लहारि, लारी, लाहरि, लाहारि- तिन आणे किमतिचे एक आदिलशाही चांदीचे स्त्रियांच्या हेयर अहमदी पीन सदृश्य नाणे
* लोही- मोहर, सोन्याचे नाणे
* शाईपैसा- शाही पैसा
* शिवराई- शिवरायांनी पाडलेली सोन्याची व तांब्याची नाणी
* शिवाई- शिवरायी होन
* शेटवाई, मोहर- सावकाराने पाडलेली मोहर
* शेणी- दूंडा, धबू पैसा
* सणी- सजगनी, ढबू पैसा, दोन पैसे
* सन्या- अर्धा आणा
* सप्तगनि, सप्तगाणी- दुंडा पैसा
* सकरीन- आठ आणे किमतिचे आणे
* ससगणी, ससगाणी- सजगनी
* सापिका- दीड रुका किमतिचे तांब्याचे नाणे
* होन- सोन्याचे साधारण 3 1/2 किमतीचे नाणे
* अलिबागी- आंग्रे यांचा रुपया
* अश्रफी- एक सोन्याचे नाणे, मोहर, झेराफिन या पोर्तुगीज शब्दाचा अपभ्रंश
* अहमदी- टीपुचा सोन्याचा होन
* इभ्रामी- इब्राहीम आदिलशहाचा होन
* एकेरी- दक्षिणेकडील होन
* कची ठेली- तडे गेलेला, तुटका , पुसट रुपया
* कंठीरुपया- नीळकंठी रुपया
* कलेकरी- कलदार रुपया
* कामील- एक होन प्रकार
* कावेरीपाक- एक होन प्रकार
* खुर्दा- मोड
* खुळा पैसा- दक्षिनेतील तांब्याचे नाणे, 700=1 रुपया
* गंजीकोट- गंजीकोट येथील चलन
* गंभार, गंभर- एक सोन्याचे नाणे
* चतरसिंगी रुपया- पुणे येथील चतुश्रुंगी रुपया
* अटीचा रुपया- आटविन्यास योग्य खराब झालेला रुपया
* अदवानी- होन प्रकार
* इटावप्रत- इटावा येथील रुपया
* जडमोल- होन प्रकार
* जमसिरि, जमसेरी, जमखंडि- होन प्रकार
* जहाजानी पंचमेळ रूपये- रूपयाचा प्रकार
* जुनथर- जुने चलनातील नाणे
* जुल्फकारी, झुल्पकारी- हैद्राबादचा रुपया. यावर तरवार चिन्ह असते
* जैफ- पुसट, गुळगुळीत झालेली किंवा कातरलेली नाणी. ही पोत्यास किंवा सरकारी तिजोरित भरण्यास अयोग्य
संकलन- आप्पा परब
संदर्भ- हुजूरबाजार
*मराठा आरक्षण मिळाले . आता मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  प्रगतीसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे* . त्यासाठीची प्रक्रिया पुढिलप्रमाणे -
पायरी १)  जातीचा पुरावा काढा.
१) तुमचा जातीचा पुरावा -
● सर्वप्रथम तुमच्या नावापुढे "मराठा" असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी  पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा.पुर्वीच काढलेला असेल तर त्यापैकी एकाची सत्यप्रत(True Copy) घ्या.
● जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा.परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा,याची काळजी घ्या.
२) १३ ऑक्टोबर १९६७ चा जातीचा पुरावा -
● तुमच्या वडिलांचा १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या.
ब) जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.
● काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर,
तुमच्या घरात १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ,बहीण,चुलते,आत्या,आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल तर त्याच्यी "मराठा" अशी जात नमुद असणारा खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.
अ) पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या.
ब) जन्म-मृत्यु नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र
अशा प्रकारे "मराठा" जातीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.
● तुमचा जातीचा दाखला
● १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वीचा मराठा जातीचा पुरावा.
या पुराव्यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.
=======================
पायरी २) रहिवासी व ओळखीचा पुरावा घेणे.
१) रेशनकार्ड
२) आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा.आपले रेशनकार्ड दाखवुन तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहीवासी दाखला घ्या.
किंवा
३) लाईट बिल किंवा कर आकारणी पावती
४) मतदान ओळखपत्र/पैन कार्ड/ड्राइविंग लाइसेंस/कॉलेज ओळ्खपत्र/आधारकार्ड
अशा प्रकारे रहिवासी व ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.
● रेशनकार्ड
● रहिवासी दाखला किंवा लाईट बिल
● कोणतेही एक ओळखपत्र
या पुराव्यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.
=======================
पायरी ३) तहसीलदार कार्यालयातुन जातीचा दाखला काढणे.
१) तुमच्या जातीचे,रहिवासी व ओळखीचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.
२) तेथुन जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या.अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा.अर्जावर १०रु. किंमतीची तिकीटे/कोर्ट फी स्टँप लावा.
३) पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा -
● पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज
● रेशनकार्डची सत्यप्रत
● रहिवासी दाखला
● तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
● १३ ऑक्टोबर १९६७ च्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
● साध्या कोऱ्या कागदावर जातीबाबत व वंशावळीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर ५ रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र.
( प्रतिज्ञापत्राचा नमुना पाहण्यासाठी
http://esbc-maratha.blogspot.com/2014/08/blog-post_20.html
किंवा
इथे क्लिक करा )
४) कार्यालयीन प्रक्रिया -
● हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.
● सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या.माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.
● शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.
● सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.
● अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे.
● जातीचा दाखला मिळेपर्यंत शालेय कामांसाठी हे टोकन दाखवले तरी चालते.
● टोकनवर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपला जातीचा दाखला घ्यावा व सर्व माहिती अचुक आहे का ते तपासुन पहावे.
जातीचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.
=======================
******** सुचना ********
सुचना क्रं. १ - जर १३ ऑक्टोबर १९६७ पुर्वी जन्म झालेल्या तुमच्या वडिलांचा जातीचा पुरावा उपलब्ध असेल तर वडिलांशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहुन द्यावी.
सुचना क्रं. २ - वडीलांचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्त नाते संबंधितांचे पुरावे द्यावे लागत असल्यास तुमचे आणि त्या संबंधित व्यक्तीचे नाते स्पष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आणि तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहुन द्यावी आणि त्याबद्दल काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते ही द्यावेत.
वंशावळ कशी लिहावी ?
मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नाते संबंधातील व्यक्तीशी तुमचे नाते दर्शवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वंशावळीचे उदाहरण..
                       आजोबा
                           |
              """""""""""""""""
             |             |            |
          वडील       चुलते        आत्या
            |
   """""""""""
  |         |       |
तुम्ही    भाऊ   बहीण
सुचना क्रं.३ - महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातुन/पर जिल्हातुन/परराज्यातुन स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास,अर्जदार ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक राहत होते,त्या संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज करील.
सुचना क्रं.४ - १३ ऑक्टोबर १९६७ च्या पुराव्यासाठी ज्या व्यक्तीचा जातीचा पुरावा देणार आहात त्या व्यक्तीचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण ज्या तालुक्यात/ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येते त्याकडेच तुम्हाला जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल.
सुचना क्रं. ५ - विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे
अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला
क) राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला