प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 26 November 2018

💉 *गोवर,रूबेला लसीकरण मोहीम* 💉

_"काळजी करू नका रुबेला गोवरची,_
_लस द्या आरोग्य विभागाची."_

*बोथी:-आज दिनांक २६/११/२०१८ वार- सोमवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे गोवर-रूबेला जनजागरण मोहीम अंतर्गत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.त्यानंतर परीपाठामध्ये डॉ. साळुंके साहेब यांनी विद्यार्थ्यांना गोवर आणि रूबेला लसीकरणाची आवश्यकता व महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.२६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भाषा संगम कार्यक्रमात बोडो भाषेतील वाक्यांचा सराव घेण्यात आला.*
                  *नंतर प्रत्यक्ष लसीकरणाची रंगीत तालीम डॉ. साळुंके साहेब यांनी सिस्टर,आशा,अंगणवाडी ताई व शिक्षकांची घेतली.लसीकरणाच्या दिवशी प्रत्येकाचे काम व विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दुर करण्यातसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली.*
            *यावेळी बोथी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या ANM श्रीमती बोधगीरे एस.एस.,श्रीमती भोरगीर डी.एस.,आशा कार्यकर्त्या श्रीमती  वाडकर एस.एन.,श्रीमती कारले डी.बी.,अंगणवाडी ताई श्रीमती माने निता,श्रीमती कांबळे सरोजा तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार जी.जी.,भोसले अविनाश,रायफळे बस्वराज,जोशी गोपाळ, मुंढे साधु,सोदले जयराज, स्वामी मंगल उपस्थित होते.*

_"सुजाण आणि कर्तव्यदक्ष व्हा!_
_आपल्या बालकाचे संपूर्ण लसीकरण करून घ्या!!"_

💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠







No comments:

Post a Comment