प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 9 October 2017






*वाचन प्रेरणा दिनासाठी घोषवाक्ये*

👉 वाचाल तर वाचाल,
       शिकाल तर टिकाल
👉 जिथे जिथे दिसते पुस्तक,
       तिथे व्हावे नतमस्तक
👉 जिथे पुस्तकांचा साठा,
       समृद्धीचा नाही तोटा
👉 वाचन करता मिळते ज्ञान,
       उंचावते जीवनमान
👉 पुस्तकांशी करता मैत्री,
       ज्ञानाची मिळते खात्री
👉 वाचनाने समृद्ध होते मती,
       मिळते आमच्या विकासाला गती
👉 ग्रंथ हे आपले गुरु,
       वाचनासाठी हाती धरू
👉 वाचन करा वाचन करा,
       हाच खरा ज्ञानाचा झरा
👉 वाचनालयाला देऊ आकार,
       कलामांचे स्वप्न करू साकार
👉 एक एक वाचू पुस्तक,
       गर्वोन्नत होईल मस्तक
👉 वाचनसंस्कृती घरोघरी,
       तिथे फुले ज्ञानपंढरी
👉 वाचनाचा जपा नाद,
       ज्ञानाचा नको उन्माद
👉 वाचता वाचता मिळते ज्ञान,
      अनुभव हाच गुरु महान
👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
      ज्ञानासह समाजाचे भान

🙏🏽
   📚 *वाचन प्रेरणा दिवस*📚

      *१५ आक्टोंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. तो दिवस शासनाने "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून घोषित केला आहे. तरी या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच मुख्य उद्देश असुन तशी आवड निर्माण करण्यासाठी आपण त्या दिवसाचे  महत्त्व पुढीलप्रमाणे सांगू शकतो ...*

       *महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट म्हणजे थॉमस पेन यांनी लिहीलेलं राईटस् अॉफ मॕन नावाचे पुस्तक ....या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली ...*

      *डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न झाले याचे मुळ हे केळुसकर गुरुजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे.*

       *बाबासाहेबांनी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते.त्यात हजारो पुस्तके होती.*

    *भगतसिंग यांनी तुरुंगात असतांना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करुन उपोषण केले होते.*

       *महात्मा गांधीच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती रस्किन या लेखकाच्या अन टू द लास्ट या पुस्तकामुळे त्यातुनच सत्याग्रहाची प्रेरणा त्यांना मिळाली.*

       *नेपोलियन बोनापार्ट यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी आजही पॕरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.*

      *शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी गांधीजींची अनेक पुस्तके वाचली होती.*

         *खास वाचन प्रेरणा दिनानिमित्तानं तुमच्या माहीतीसाठी सादर!*

     *वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा !!!*
      🙏🙏🌹🌹👍🏽👍🏽

*ए.पी.जे. अब्दुल कलाम*


भारताचे एकमेव अद्वितीय व्यक्ती, भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती
डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.


पूर्ण नाव अमीर पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलाम

जन्म :१५ ऑक्टोबर, १९३१
रामेश्वर

मृत्यू :२७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँग

नागरिकत्व :भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय

धर्म :इस्लाम

कार्यसंस्था: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
प्रशिक्षण मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ख्याती: शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपति
पुरस्कार : पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्‍न
वडील जैनुलाबदिन अब्दुल


*शिक्षण*

 त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

*कार्य*

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत

होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..

*कारकिर्द*
डॉ. कलामांची कारकीर्द

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

पुस्तके

कलामांनी लिहिलेली पुस्तके

अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया - माय-ड्रीम
उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक खूप छान आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्याला मत देऊ शकतो हे त्यातून समजते.

कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

१९८१ : पद्मभूषण
१९९० : पद्मविभूषण
१९९७ : भारतरत्‍न
१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
२००० : रामानुजन पुरस्कार
२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनार्‍याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
                     
                      निधन

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.

No comments:

Post a Comment