प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, 31 October 2017

*एका आठवड्यात मिळवा पासपोर्ट...जाणून घ्या*
मुंबई : सर्वात पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. पॉवरफुल पासपोर्टमुळे सिंगापूरमधील नागरिकांना सर्वाधिक देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करता येतो. या यादीत भारत ७५व्या स्थानी आहे. देशात दरवर्षी हजारो नागरिक आपला पासपोर्ट काढतात. तुम्ही अजूनही पासपोर्ट काढला नाहीये तर आता काही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने तुम्ही सात दिवसांत पासपोर्ट काढू शकता.
*परराष्ट्र मंत्रालयाने सोपे केले नियम*
२०१६मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्यासाठीचे नियम सोपे केलेत. ऑनलाईन अर्जासह तुम्ही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने एका आठवड्यात पासपोर्ट बनवू शकता.
*ही कागदपत्रे आवश्यक*
ऑनलाईन अर्ज करताना
आधार कार्ड,
मतदान ओळखपत्र,
 पॅनकार्ड आणि
आपल्यावर कोणताही क्रिमिनिल गुन्हा नाही हे सिद्ध करणारे अऍफेडव्हिट सादर करणे गरेजेचे असते.
अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला पुढील तीन दिवसांत अपॉईंटनमेंट मिळेल.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळेल.
नंतर होईल पोलीस व्हेरिफिकेशन
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मते परराष्ट्र मंत्रालयाने अशी व्यवस्था केलीये ज्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळेल. पासपोर्टसाठी सर्वाधिक वेळ हा पोलीस व्हेरिफिकेशनसाठी जातो. मात्र सात दिवसांत तुम्हाला पासपोर्ट मिळेल त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होईल.
ऑनलाईन कसा बनवाल पासपोर्ट
*स्टेप १ : पासपोर्ट सेवा पोर्टलवर स्वत: रजिस्टर करा*
सर्वात आधी
http://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink या लिंकवर जाऊन पेजवर register now क्लिक करा. यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर लॉगिन आयडी मिळेल.
*स्पेट २ : लॉग इन करा*
तुमच्या ई-मेल आयडीवर लिंक क्लिक करुन अकाऊंट अॅक्टिव्हेट करा. त्यात युझर आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टवर क्लिक करा. यात दोन ऑप्शन आहेत. ऑनलाईन पासपोर्ट अर्जासाठी दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करा.
*स्टेप ३ : ऑप्शन निवडा*
पहिल्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करताना अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टवर क्लिक करा. अप्लाय केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्यातील माहिती भरा. लक्षात ठेवा, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. कारण एकदा पासपोर्ट प्रक्रिया रिजेक्ट झाली तर दुसऱ्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करताना वेळ लागतो.
*स्टेप ४ -* प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट अॅप्लिकेशन रिसीटवर क्लिक करा आणि अॅप्लिकेशन प्रिंट घ्या. यात तुम्हाला अॅप्लिकेशन रेफरंस नंबर आणि अपॉईंटमेंट नंबर असतो.
*स्टेप ५ -* अपॉईंटमेंट बुक झाल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रात जाताना खरी कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे असते. केंद्रात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घरी सात दिवसांत पासपोर्ट येईल. 

Thursday, 26 October 2017

वडिलांच्या श्राद्धाऐवजी शाळेला दिली देणगी

ओक्टोबर 26, 2017

रुढी-परंपरांच्या नावाखाली वारेमाप खर्च करणं, ही भारतात राहणाऱ्या माणसासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. व्यक्तीच्या जन्माआधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही सोहळे साजरे करण्याची आपली रीत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली धार्मिक कृत्यांसाठी खर्च करण्याऐवजी त्याला विधायक आकारही देता येऊ शकतो. असेच एक आदर्श उदाहरण म्हणजे लातूर तालुक्यातील मांजरीची जिल्हा परिषद शाळा. या शाळेसाठी तिथे कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकाने सुमारे दोन लाख रुपयांची कामं आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ करुन दिली आहेत. आज ही शाळा लातूरमधली सर्वांगसुंदर आयएसओ जि.प. शाळा म्हणून ओळखली जाते. या शिक्षकाचे नाव आहे रावसाहेब भामरे.

विद्यार्थ्यांना शिकविण्यात रमलेले रावसाहेब भामरे सर


भामरे सर सध्या लातूरमधील मुरुडच्या डीआयईसीपीडीत तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण काही वर्षांपूर्वी ते मांजरीच्या जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे काम करीत होते. या स्वागर्ताह पायंड्याविषयी विचारले असता सरांनी सांगितले, “माझे दिवंगत वडील स्वर्गीय माणिकराव भामरे यांच्या निधनानंतर वर्षभराने वर्षश्राद्ध वगैरे धार्मिक कृत्ये करण्याऐवजी मी शाळेसाठी काही चांगले काम करण्याला पसंती दिली. आमचे दिवंगत वडीलही देवभोळे नव्हते, रुढी-परंपरांसाठी पैसा खर्चण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा सामाजिक कार्याला देणगी देण्याला त्यांचे प्राधान्य असायचे. त्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर असणाऱ्या आमच्या वडिलांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मला हाच मार्ग योग्य वाटला.”

2015 च्या नोव्हेंबर महिन्यात मांजरी शाळेच्या कायापालटाचे सुरु झालेले काम मार्च 2016 मध्ये संपले. यात भामरे सरांनी दिलेल्या 1 लाख 89 हजारातून शाळेची रंगरंगोटी, इमारत दुरुस्तीची काही कामे आणि गणितपेटीसारखे रचनावादी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र शाळेला परिपूर्ण करण्यासाठी इतरही अनेक कामे करणे गरजेचे होते. त्यासाठीचा वाटा शाळेतील इतर सहकारी शिक्षकांनी आणि मांजरी ग्रामपंचायतीने उचलला. शाळेतील सात शिक्षकांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी उभारला तर मांजरी ग्रामपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतून एक लाख रुपयांची देणगी शाळेला जाहीर केली. शाळेच्या शिक्षकांची सुरु असलेली धडपड पाहून ग्रामपंचायतीने स्वेच्छेने ही देणगी दिली.

लातूरमधील अंतर्बाह्य सुंदर अशी मांजरी जिल्हा परिषद शाळा

अशा प्रकारे जमा झालेल्या सुमारे चार लाख रुपयांतून मांजरी जिल्हा परिषद शाळेचा कायापालटच घडला. या शाळेत ज्ञानरचनावादी तळफळे चांगल्या दर्जाच्या ऑईलपेंटने रंगवून घेतलेले आहेत, मुलांना बसायला दर्जेदार बेंचेस, डिजिटल वर्गखोली आणि उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय केलेली आहे. शाळेला आयएसओ नामांकन मिळण्यासाठीचा खर्च तत्कालीन केंद्रप्रमुख गायकवाड आणि विस्ताराधिकारी अलमले सर यांनी उचलला. त्याविषयी बोलताना भामरे सर सांगतात, “शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षक झटत असताना अधिकाऱ्यांनीही आनंदाने आपल्या खिशाला कात्री लावण्याचे कदाचित हे पहिलेच उदाहरण असेल. अधिकारी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहिल्यानेच काम करायला आणखी उत्साह आला.”

लातूरच्या शिक्षकांना प्रशासकीय मदतीसाठी ‘स्टेप’ अॅप


मांजरी शाळेचा कायापालट झाल्यानंतर भामरे सर आता तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ‘एज्युटेक लातूर’ नावाचे यू ट्यूब चॅनेल ते चालवतात. त्यात तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग कसा करुन घ्यावा, याचे छोटे-छोटे मार्गदर्शन पर व्हिडिओ आहेत. याशिवाय स्टेप आणि इ-कॅलेंडर ही दोन नवी अॅप त्यांनी 2017 साली लॉन्च केलेली आहेत. लातूरच्या गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे यांच्या संकल्पनेतून ही अॅप्स विकसित करण्यात आली आहेत.

‘Solutions on Teachers Enquiries & Problem’ नावाचे हे अॅप भन्नाट आहे.
शिक्षकांना प्रशासकीय कामांसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेत यावे लागू नये हा या अॅपचा उद्देश आहे. ‘स्टेप’ या अपअंतर्गत शिक्षकांनी आपले काम/ तक्रार/ शंका या अपवर नोंदवायची. त्याचा इमेल लातूरचे सीईओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती आणि संबंधित विभागाकडे जातो. त्यांच्यामार्फत त्या प्रश्नाचे उत्तर तात्काळ दिले जाते. उत्तर न दिल्यास त्याचे रिमाइंडर पाठवले जाते. शिवाय संबंधित शिक्षकांना त्यांच्या कामाचे काय झाले, याचे अपडेटही वेळोवेळी दिले जाते. काम झाल्यानंतर त्याचे कागदपत्र देणे आवश्यक असेल तर शिक्षकाच्या नोकरीच्या गावच्या पंचायत समितीत ते पाठवले जाते. “या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा वेळ वाचतो आणि प्रशासकीय कामांवर तो वेळ घालवण्यापेक्षा त्याने अध्यापनावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे असा आमचा उद्देश आहे”, भामरे सर सांगत होते.

भामरे सरांनी विकसित केलेले ‘इ- कॅलेंडर’ अॅप


दुसरे अॅप आहे ते इ-कॅलेंडर. लातूर तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीतच केले जाते. गटशिक्षणाधिकारी अंधारे मॅडम आणि सबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचे कॅलेंडर तयार केले जाते आणि ते या ‘इ कॅलेंडर’च्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यात पालकसभा, माता-पालक मेळावे, कन्या सुरक्षा मंचाचे कार्यक्रम, शिक्षकांच्या बैठका, फिल्म क्लबमध्ये दाखवायचे चित्रपट असे तारीखवार नियोजन असते.

ही दोन्ही अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरुन लातूरचे शिक्षक मोफत डाऊनलोड करुन घेऊ शकतात. अशा प्रकारे लातूरचा शिक्षण विभाग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवनवे प्रयोग करतोय.
              साभार:-
ब्लॉग: स्नेहल बनसोडे-शेलुडकर.
छायाचित्रे: रावसाहेब भामरे
                संकलन
जयराज नवनाथराव सोदले
जि.प.प्रा.शाळा, बोथी
ता.चाकूर जि.लातूर

=====================================https://www.blogger.com/blogger.g?blogID=1566480817626881410#editor/target=post;postID=3014676983888124824

Sunday, 15 October 2017

🎇 *"My School,My Activity"* 🎇

    🚸जि.प.प्रा.शाळा,बोथी🚸
           ता.चाकूर जि.लातूर
*[प्रोजेक्टर सॉफ्टवेअरसह-ई लर्निंग]*

        *"आम्ही प्रकाशबीजे*
                   *रूजवीत चाललो,*
          *वाटा नव्या युगाच्या*
                   *रूळवीत चाललो।"*

🚩 *"साधना" बालकुमार दिवाळी अंकाचे विद्यार्थ्यांना मोफत वितरण.*

🚩 *"दिवाळी खाऊ" उपक्रमांतर्गत "माझी सुट्टी-माझा अभ्यास" 1 ली ते 7 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला.*

🚩 *प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा व 1,87,000 ₹ बचतीचा संकल्प करण्यात आला.*

🚩 *म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.*

🚩 *डॉ. ए.पि.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिन"म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*

🚩 *"आम्ही हे करणारच" जिल्हा परिषद लातूरच्या "स्वच्छ भारत मिशन"अंतर्गत उपक्रमाचे वाचन,लेखन व अंमलबजावणी करण्यात आली.*

🚩 *"हाथ धुवा दिन"साजरा करण्यात आला.*

🚩 *अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती तर्फे एक ट्रि गार्ड,एक झाड व फोटो शाळेस भेट.*

🚩 *वाल्मिकी गणेश मंडळातर्फे एक ट्रि गार्ड, एक झाड,दोन फोटो, स्पर्धा परीक्षेचे आयोजन व बक्षीस वितरण करण्यात आले.*

🚩 *कै.कृष्णा गायकवाड यांच्या स्मरणार्थ एक ट्रि गार्ड, फणसाचे झाड व फोटो शाळेस भेट देण्यात आला.*
[देणगीदारांचे शाळेतर्फे मनःपुर्वक आभार🙏🏻]

       🏵  *-:आमचे मार्गदर्शक:-*
मा.डॉ.माणिक गुरसळ,मा.चौरे बळीराम,मा.शेख नजरूद्दीन,मा.संजयजी पंचगल्ले,मा.तृप्ती अंधारे,मा.रविंद्र सोनटक्के,मा.रामराव चव्हाण,मा.हरिश्चंद्र घटकार,मा.इस्माईल पठाण,मा.चंद्रकांत भोजने,मा.प्रमोद हुडगे,मा.रणजित घुमे,मा.प्रकाश भालके,मा.रविराज देशमुख.

      *"ज्ञानज्योतीने ज्योत पेटवु या*
       *बनवु या एक मशाल,*
       *पेटतील सारे ध्यासाने अन्*
       *गुणवत्ता प्रकाश पसरेल विशाल।"*

🎉"बोथी टिम तर्फे दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!"🎉

             *-:बोथी टिम:-⤵*
🌼गणपती जमादार सर
🌸धनाजी दंडीमे सर
🌼गोपाळ जोशी सर
🌸मंगल स्वामी ताई
🌼सुचिता सुर्यवंशी ताई
🌸जगन्नाथ वागलगावे सर
🌼जयराज सोदले सर

           ✍🏻 *शब्दांकन* ✍🏻
         सोदले जयराज नवनाथराव
         स.शि.जि.प.प्रा.शाळा,बोथी    www.jayrajsodle.blogspot.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖










Friday, 13 October 2017

संगणक, कीबोर्ड आणि माउस यांचं अतूट असं नातं आहे. माउस जर बंद पडलं तर आपण परेशान होतो अशावेळी किबोर्डचा वापर फक्त टायपिंगसाठी न करता त्यातील काही शॉर्टकट वापरुन आपण आपला वेळ वाचवू शकतो.

*Alt + Tab :* आपण जर एकाचवेळी अनेक साईट, सॉफ्टवेअर्स वापरत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन आपण एका साईट किंवा सॉफ्टवेअरवरुन दुसरे बॅकग्राऊंडला सुरू असणारी साईट किंवा सॉफ्टवेअर उघडू शकता.

*Ctrl + Shift + Esc :* संगणक हँग झाल्यावर या शॉर्टकटचा वापर करुन आपण टास्क मॅनेजर थेट उघडू शकतो. टास्क मॅनेजरमधून कोणता प्रोग्राम चालत नाही याची माहिती घेऊन तो बंद करु शकतो.

*Shift + Delete :* आपणला जर कोणतीही फाईल कायमची डिलीट कराची असेल तर आपण या शॉर्टकटचा वापर करुन ती कायमची डिलीट करु शकतो.

*Windows logo key + L :* या शॉर्टकटद्वारे आपण संगणक लॉक करु शकतो. जेणेकरुन आपल्या अनुपस्थितीत त्याचा कोणी गैरवापर करणार नाही.

*Ctrl + F4 :* एकाच सॅफ्टवेअरच्या अनेक फाईल ओपन असतील तर त्या बंद करण्यासाठी या शॉर्टकटचा वापर करता येतो.

*Ctrl + Y :* जसे आपण Ctrl + Z याचा वापर करुन Undo करु शकतो तसेच  Ctrl + Y करुन आपण Redo करू शकतो.

*Ctrl + Shift with an arrow key :* संगणकावर लिखीत माहिती वाचण्यासाठी या शॉर्टकचा वापर करता येतो. यामुळे पेज सरकवणे सोपे जाते.

*Windows logo key + D :* या शॉर्टकटचा वापर करुन आपण सगळ्या विंडो एकाचवेळी मिनीमाईज करु शकतो. यामुळे आपला प्रत्येक विंडो मिनीमाईज करण्याचा वेळ वाचतो.

*Windows logo key + I :* या शॉर्टकटचा वापर करुन आपण थेट संगणकाच्या सेटींगमध्ये जातो. यामुळे संगणकाचे सेटिंग कुठे आहे हे शोधत बसावे लागत नाही.

*Windows logo key + number :* जर तुम्ही ॲप पिन करत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन तुम्ही ते ॲप लगेच उघडू शकता. जसे तुम्ही कॅलक्युलेटर चौथ्या क्रमांकावर पिन केले असेल तर विंडो + 4 हा शॉर्टकट वापरल्यास ते ॲप लगेच उघडते.



Thursday, 12 October 2017

प्रगती पत्रक नोंदी यादी

विशेष प्रगती ➡

1 शालेय शिस्त आत्मसात करतो
2 दररोज शाळेत उपस्थित राहतो
3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो
8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9 ऐतिहासिक माहिती मिळवतो
10 चित्रकलेत विशेष प्रगती
11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
12 गणितातील क्रिया अचूक करतो
13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
17 खेळ उत्तम प्रकारे खेळते
18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22 चित्रे छान काढतो व रंगवतो
23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
27 शाळेत नियमित उपस्थित राहतो 
28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
32 वाचन स्पष्ट व अचूक करतो
33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
34 नियमित शुद्धलेखन करते
35 शालेय उपक्रमात सहभाग घेते
36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो
38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42 हिंदीतून पत्र लिहितो
43 परिपाठात सहभाग घेते
44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
47 प्रयोगाची कृती अचूक करते
48 आकृत्या सुबक काढते
49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
53 व्यवहार ज्ञान चांगले आहे
54 अभ्यासात सातत्य आहे
55 वर्गात क्रियाशील असते
56 अभ्यासात नियमितता आहे
57 वर्गात लक्ष देवून ऐकतो
58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
60 अभ्यासात सातत्य आहे
61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63 वर्गात नियमित हजर असतो 
64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
65 खेळण्यात विशेष प्रगती
66 Activity मध्ये सहभाग घेतो
67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
68 विविध प्रकारची चित्रे काढते
69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा

आवड /छंद➡

1 चित्रे काढतो
2 गोष्ट सांगतो
3 गाणी -कविता म्हणतो
4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5 खेळात सहभागी होतो
6 अवांतर वाचन करणे
7 गणिती आकडेमोड करतो
8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
11 वाचन करणे
12 लेखन करणे
13 खेळणे
14 पोहणे
15 सायकल खेळणे
16 चित्रे काढणे
17 गीत गायन
18 संग्रह करणे
19 उपक्रम तयार करणे
20 प्रतिकृती बनवणे
21 प्रयोग करणे
22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23 खो खो खेळणे
24 क्रिकेट खेळणे
25  संगणक हाताळणे
26 गोष्टी ऐकणे
27 गोष्टी वाचणे
28 वाचन करणे
29 रांगोळीकाढणे
30 प्रवास करणे
31 नक्षिकाम
32 व्यायाम करणे
33 संगणक
34 नृत्य
35  संगीत ऐकणे

सुधारणा आवश्यक ➡

1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31 शालेय परिपाठात सहभाग असावा
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे 51शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे .
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा
वरील नोंदी महत्वपुर्ण आहेत संग्रहीत ठेवाव्यात

Monday, 9 October 2017






*वाचन प्रेरणा दिनासाठी घोषवाक्ये*

👉 वाचाल तर वाचाल,
       शिकाल तर टिकाल
👉 जिथे जिथे दिसते पुस्तक,
       तिथे व्हावे नतमस्तक
👉 जिथे पुस्तकांचा साठा,
       समृद्धीचा नाही तोटा
👉 वाचन करता मिळते ज्ञान,
       उंचावते जीवनमान
👉 पुस्तकांशी करता मैत्री,
       ज्ञानाची मिळते खात्री
👉 वाचनाने समृद्ध होते मती,
       मिळते आमच्या विकासाला गती
👉 ग्रंथ हे आपले गुरु,
       वाचनासाठी हाती धरू
👉 वाचन करा वाचन करा,
       हाच खरा ज्ञानाचा झरा
👉 वाचनालयाला देऊ आकार,
       कलामांचे स्वप्न करू साकार
👉 एक एक वाचू पुस्तक,
       गर्वोन्नत होईल मस्तक
👉 वाचनसंस्कृती घरोघरी,
       तिथे फुले ज्ञानपंढरी
👉 वाचनाचा जपा नाद,
       ज्ञानाचा नको उन्माद
👉 वाचता वाचता मिळते ज्ञान,
      अनुभव हाच गुरु महान
👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
      ज्ञानासह समाजाचे भान

🙏🏽
   📚 *वाचन प्रेरणा दिवस*📚

      *१५ आक्टोंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. तो दिवस शासनाने "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून घोषित केला आहे. तरी या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच मुख्य उद्देश असुन तशी आवड निर्माण करण्यासाठी आपण त्या दिवसाचे  महत्त्व पुढीलप्रमाणे सांगू शकतो ...*

       *महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट म्हणजे थॉमस पेन यांनी लिहीलेलं राईटस् अॉफ मॕन नावाचे पुस्तक ....या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली ...*

      *डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न झाले याचे मुळ हे केळुसकर गुरुजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे.*

       *बाबासाहेबांनी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते.त्यात हजारो पुस्तके होती.*

    *भगतसिंग यांनी तुरुंगात असतांना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करुन उपोषण केले होते.*

       *महात्मा गांधीच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती रस्किन या लेखकाच्या अन टू द लास्ट या पुस्तकामुळे त्यातुनच सत्याग्रहाची प्रेरणा त्यांना मिळाली.*

       *नेपोलियन बोनापार्ट यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी आजही पॕरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.*

      *शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी गांधीजींची अनेक पुस्तके वाचली होती.*

         *खास वाचन प्रेरणा दिनानिमित्तानं तुमच्या माहीतीसाठी सादर!*

     *वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा !!!*
      🙏🙏🌹🌹👍🏽👍🏽

*ए.पी.जे. अब्दुल कलाम*


भारताचे एकमेव अद्वितीय व्यक्ती, भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती
डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.


पूर्ण नाव अमीर पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलाम

जन्म :१५ ऑक्टोबर, १९३१
रामेश्वर

मृत्यू :२७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँग

नागरिकत्व :भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय

धर्म :इस्लाम

कार्यसंस्था: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
प्रशिक्षण मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ख्याती: शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपति
पुरस्कार : पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्‍न
वडील जैनुलाबदिन अब्दुल


*शिक्षण*

 त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

*कार्य*

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत

होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..

*कारकिर्द*
डॉ. कलामांची कारकीर्द

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

पुस्तके

कलामांनी लिहिलेली पुस्तके

अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया - माय-ड्रीम
उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक खूप छान आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्याला मत देऊ शकतो हे त्यातून समजते.

कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

१९८१ : पद्मभूषण
१९९० : पद्मविभूषण
१९९७ : भारतरत्‍न
१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
२००० : रामानुजन पुरस्कार
२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनार्‍याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
                     
                      निधन

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.
🔹आपली मापन माहिती.

🎾 1 इंच  = 2.54 सेमी
🎾  1 फूट = 12 इंच ,30 सेमी 
🎾 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल  =  1.6 किलोमीटर

🏓1 गुंठा = 100 चौ. मी 
🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.

🍇1 डझन = 12 वस्तू / नग
🍇12 डझन = 1 ग्रोस.
🍇 1  दस्ता = 24 कागद.
🍇20 दस्ता  = 1रीम, 480 कागद
🍇1तोळा =  10 ग्रॅम.

⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास  = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.

🔹Trick

           💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा

 (१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५

(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+
     १८+१९+२० = १५५

(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+
      २८+२९+३० = २५५

(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
      ३८+३९+४० = ३५५

(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
     ४८+४९+५० = ४५५

(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
      ५८+५९+६० = ५५५

(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
      ६८+६९+७० = ६५५

(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
      ७८+७९+८० = ७५५

(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
      ८८+८९+९० = ८५५

(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
        ९८+९९+१०० = ९५५
    *************************************

          १ ते १० संख्यांची बेरीज =  ५५
        ११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
        २१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
        ३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
        ४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
        ५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
        ६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
        ७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
        ८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
      ९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
        १ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०

Sunday, 8 October 2017

एक अनोखी गोष्ट..
एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची.एक दिवस तिच्या जवळ एक तरून आला साधारण ३० वयाचा असावा..त्याने आजीला विचारले आजी संत्री कसे दिले.आजीने भाव सांगितला.. व त्याने २ कीलो संत्री विकत घेतले..व त्यातली एक संत्री सोलुन एक फोड खाऊन म्हणाला आजी ही संत्री गोड आहे का ? आजीने हात पुढे करत संत्री हातात घेऊन एक फोड खाल्ली.आणी म्हणाली लेकरा गोडच हाय की.. तो हसत हसत आजीच्या हातातील संत्री न घेताच निघून गेला.असच दुसरया दिवशीही तो आपल्या पत्नीलाही बरोबर घेऊन आला.त्या दिवशी ही त्याने संत्री ची एक फोड खात संत्री गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्री देऊन हसत हसत घरी गेला.असे बरेच दिवस निघून गेले. आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्री का देतोस.अन ती ही अर्धी खाऊन.त्या वर तो तरून आपल्या पत्नीला म्हणाला.अग वेडे आजी रोज हे संत्री विकते पन ती कधीच संत्री खात नाही कारण तिला २ रूपये कमी मिळतील.मि तिला रोज एक संत्री खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो.पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.दुसरया दिवशीही तसच घडले तोच शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो समदी संत्री गोड हायीत.आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली अग त्यो पिरमा पायी असा वागतुय.अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते. आजीचे शब्द एकुण त्याला खुप बर वाटल. मनात विचार करत असताना.शेजारी बसलेली भाजी वाली आजी.त्या तरूनाला म्हणाली.बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास.म्हणुन तर तुला न मागता संत्री ही अन आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..

Friday, 6 October 2017

            ‘क्लाउड’वर साठवा मोबाइलचा डेटा...

गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना मोबाइल हरवला तर, हँडसेटपेक्षा जास्त काळजी वाटते ती महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील असणारा डेटा चुकीच्या हातात पडण्याची... अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मोबाइल क्लाउडशी (सिंक) जोडणे आवश्यक आहे. मोबाइल क्लाउडशी कसा जोडावा, याविषयी...
मॅन्युअली सिंक करताना...
मोबाइल क्लाउडशी सिंक करताना (जोडताना) कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर, ते मॅन्युअली जोडण्यास हरकत नाही. त्यासाठी फोनच्या Settingमध्ये जाऊन Accountsचा पर्याय निवडा. Google अकाउंटमध्ये जा. वर दिलेल्या तीन टिंबांवर क्लिक करा. Sync Nowच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक वर्तुळाकार खूण गोल फिरण्यास सुरुवात होईल. याचाच अर्थ सर्व डेटा गुगलवर जाण्यास सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे मोबाइल कंपनीकडून देण्यात आलेल्या क्लाउड स्टोरेजवरही डेटा हस्तांतर करता येईल. मोबाइलमध्ये ड्रॉप डाउन मेन्यूमध्येही Syncचा पर्याय आढळून येतो. त्यावर क्लिक करून Sync On अथवा Sync Off करता येते.
नेटवर्कवर ठेवा नजर
बऱ्याचदा मोबाइल सिंक न होण्याचे कारण चांगली इंटरनेट सेवा न असणे असू शकते. त्यामुळे सिंक करण्यासाठी Only Wifi हा पर्याय निवडावा.
गुगल साइन तपासा
१. सिंक न होण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण क्लाउडच्या अकाउंटमध्ये साइन इन न होणे.
२. फोनमध्ये बऱ्याचदा साइन इन केले असले तरी ते आपोआप साइन आउट होण्याची शक्यता असते. अशावेळी पुन्हा साइन इन करणे आवश्यक आहे.
३. गरज पडल्यास पीसीवरून साइन आउट करून पुन्हा साइन इन करा.
अपडेट तपासा
१. आपल्या फोनमधील अपडेट तपासण्याची आवश्यकता आहे.
२. कधी कधी ऑपरेटिंग सिस्टीम अथवा अॅप अपडेट न झाल्याने अशाप्रकारची समस्या निर्माण होऊ शकते.
३. फोनच्या सेटिंगमध्ये About Phoneमध्ये जाऊन ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट आहे अथवा नाही हे तपासले जाऊ शकते.
४. अॅप अपडेट करण्यासाठी मिळणारे मेसेज तपासा. किंवा गुगल अॅप स्टोअरमध्ये जाऊन गुगल अकाउंट किंवा अन्य क्लाउड अकाउंट तातडीने निवडण्याची आवश्यकता आहे.
अकाउंट काढून टाका
वर नमूद करण्यात आलेल्या सर्व उपायांनंतरही फोन सिंक होण्याची समस्या निर्माण होत असेल, तर एकदा गुगल अकाउंट नाहीसे करून टाका आणि पुन्हा ते डाउनलोड करा.
१. त्यासाठी सर्वप्रथम फोनच्या Settingमध्ये जा.
२. तेथे अकाउंटची निवड करा.
३. त्यानंतर पसंत पडलेल्या क्लाउंट अकाउंट निश्चित करा आणि त्यावर क्लिक करा.
४. जर गुगल अकाउंट सिंक करायचे असेल, तर जीमेल अकाउंट काढा. जीमेल सिंकमध्ये उजव्या बाजूला तीन टिंब दिसतील. तेथे क्लिक करा.
५. तेथे Remove Accountचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर फोनमधून जीमेल नाहीसे होईल.
६. त्यानंतर पुन्हा गुगल अकाउंटची निवड करा. तत्पूर्वी फोन Restart करा.
७. जीमेल आयडी तयार करण्यासाठी पुन्हा तीच प्रक्रिया अवलंबवावी लागेल.
कॅशे नाहीसे करा...
१. फोन सिंक करण्यास अडचणी येत असतील, त्याचे प्रमुख कारण मोठ्या प्रमाणात डेटा भरला जाणे हे देखील असू शकते.
२. त्यासाठी सर्वप्रथम मोबाइलच्या Settingमध्ये जाऊन Storageचा पर्याय निवडा.
३. त्याच्याखाली Cache असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून डेटा स्वच्छ करा.
प्रमुख क्लाउड सेवा
आजपावेतो तुम्ही क्लाउड सेवेसाठी गुगलवरच अवलंबून असाल तर, आता त्याहीपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यांचाही वापर करण्याची आवश्यकता आहे. नव्याने सादर झालेल्या क्लाउड सेवांपैकी काही सेवा चकटफू उपलब्ध आहेतच, शिवाय त्यांचा वापर करण्याचा अनुभवही अतिशय समृद्ध करणारा आहे.
१. MEGA : ५० जीबी मोफत
२. pCloud : १० जीबी मोफत (२० जीबीपर्यंत वाढविण्याची संधी)
३. MediaFire : १० जीबी मोफत (फ्रेंड रेफरलच्या माध्यमातून २० जीबीपर्यंत वाढविण्याचा पर्याय उपलब्ध)
४. BOX : १० जीबी
५. Flipdrive : १० जीबी
६. HiDrive : १० जीबी मोफत (फ्रेंड रेफरलच्या माध्यमातून २० जीबीपर्यंत वाढविण्याचा पर्याय उपलब्ध)
७. hubic : २५ जीबी
८. Dropbox : २ जीबी
९. Jumpshare : २ जीबी
१०. OneDrive : ५ जीबी

Thursday, 5 October 2017



 💎 *आद्यकवी महर्षि वाल्मिकी* 💎

"अद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती च्या हार्दिक शुभेच्छा"
                    -जयराज सोदले.

📝 *"रामायण"* वाल्मिकी ऋषींद्वारे रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मामधे पवित्रग्रंथाचा दर्जा आहे. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. पाचवे शतक ते इ.स.पू. पहिले शतक यादरम्यान निर्धारित केला गेला आहे.

📕महर्षि वाल्मीकिंना काही लोक निम्न जातिचे मानतात. पण वाल्मीकि रामायण तसेच अध्यात्म रामायण येथे त्यांना प्रचेताचे पुत्र मानले गेले आहे. मनुस्मृतिनुसार प्रचेतस यास वसिष्ठ, भृगु आदिंचा बंधु म्हाटले आहे. व्याध जन्मात शंख ऋषिंच्या सत्संगाने रामनामाच्या जपाने ते दुसर्या जन्मात अग्निशर्मा या नावाने होते. सप्तर्षिंच्या सत्संगाने मरा मराचा दीर्घकाळ जप, अंगावर वारूळ वाढेपर्यंत केल्याने ते पुढे वाल्मीकि नामाने प्रसिद्ध झाले आणि त्यांनी वाल्मीकि रामायणाची रचना केली. वाल्मिकी वर्णित राजनीति अत्यंत उच्च कोटीची आहे. तिच्यापुढे सर्व राजनैतिक विचार तुच्छ प्रतीत होतात.

🌴रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणाकरवी अपहरण, आणि तत्पश्चात रामहस्ते रावणाचा संहार अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी लव-कुश प्रचार केला.नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतीकथा, तात्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम , सीता , लक्ष्मण , भरत , हनुमान व कथेचा खलनायक रावण आदि पात्रेभारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातीलकला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो.

🌴सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारत व दक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्या मिळाल्या आहेत. यात रामाच्या जन्मापासून अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सात कांडांत विभाजित केले आहे.

1⃣ *बाल कांड* – रामाचा जन्म, बाल्य, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्यॆतील दिवस, विश्वामित्रांनी राक्षससंहाराकरता वनात नेणे, सीता स्वयंवर- आदि घटनांचा समावेश.

2⃣ *अयोध्या कांड* – या भागात कैकेयी दशरथाद्वारे रामास वनवासात धाडते. दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यु होतो.

3⃣ *अरण्य कांड* – वनवासातील रामाचे जीवन, सीतॆचे अपहरण या भागात चित्रित केली आहे.

4⃣ *किष्किंधा कांड* – सीतॆच्या शोधातील राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतो. तिथे त्यास सुग्रीव, हनुमंत आदि कपिवीर भेटतात. वानरसैन्य सीतॆसहुडकणे प्रारंभ करते.

5⃣ *सुंदर कांड* – या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन येते. हनुमंताचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून या कांडास सुंदर कांड असे नाव आहे. हनुमान सम्रुद्र लंघून लंकॆत प्रवेशितो. लंकादहन घडवितो. सीतॆच्या रावणाच्या राज्यातील अशोकवन येथील उपस्थितीबद्दल रामास कळवितो.

6⃣ *युद्ध कांड* - या भागात राम - रावण यांचे युद्ध, रावण संहार, त्यानंतर रामाचे सपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.

7⃣ *उत्तर कांड* – रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन.

💥वाल्मिकी रामायण हे एकुण २४,००० श्लोकांचे आहे. सात कांडात, एकुण ५०० प्रकरणांचा विस्तार एवढे साहित्य एका रामायणात आहे. विविध राजे, तत्कालिन संस्कृती, एकमेकांसोबतचे राजकारण, समाज, आचार विचार ह्यांचा समग्र समूह म्हणजे रामायण. भारतीय संस्कृती त्यातून पुरेपूर दिसते त्यामुळे रामायण हे वेदकालीन संस्कृती वा इ स पूर्व संस्कृती मधील फार मोठा मैलाचा दगड ठरते. बाल, अयोध्या, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड हे ते सात कांड आहेत. रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहीले व ते ह्यासर्वाचे साक्षीदार होते असे आपण मानतो. पण त्याच बरोबर वाल्याचा वाल्मिकी हे राम नाम उलटे जपल्यामुळे मरा मरा ऋषी झाले अशी कथाही आपल्याला सांगितली गेली.

🔷रामायणाचा प्राचिन भारताच्या प्रमुख साहित्यकृतीवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो.

🎯वाल्मिकी रामायणात सांगतलेला प्रभु श्रीराम हा मर्यादा पुरूषोत्तम आहे.
👉🏻
कवीच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालेले हे महन्मंगल व्यक्तिमत्व आहे.
👉🏻
 त्यानुसार मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र.

✅ *आदर्श राजा,*
✅ *आदर्श पुत्र,*
✅ *आदर्श बंधू,*
✅ *आदर्श सखा,*
✅ *आदर्श पती,*
✅ *आदर्श नेता,*
✅ *आदर्श विराग्रणी,*

✅ *'जननि जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी'*
असा
देशभक्तीचा उत्तुंग आदर्श आचरणात आणणारा मातृभक्त आणि

✅ *'मरणान्तानि वैराणी न मे कृतानिच'*

हा प्रत्यक्ष
वैरी व शत्रूच्याही बाबतीत अंतःकरणाची विशालता दाखवणारा हा मानव आहे.

*"महर्षी वाल्मिकी" नी 'रामायणाच्या' माध्यमातून*
✅ *भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली.*

त्यांचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला.🎯

🌹🙏🏻 *जयराज सोदले*🙏🏻🌹
https://jayrajsodle.blogspot.in


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Sunday, 1 October 2017