प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, 23 September 2017

🌹 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती* 🌹
      *जिल्हा शाखा लातूर/चाकूर/नळेगाव*
          *{ विज्ञान,निर्भयता व निती }*

*प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाके विरोधी अभियान..2017.*
      विनम्र आवाहन
प्रिय पालक,शिक्षक व विद्यार्थी,सप्रेम नमस्कार🙏🏻
गेल्या पाच वर्षापासून नळेगाव अंनिस शाखेच्या वतीने संपूर्ण चाकूर तालुका व जिल्ह्यातील शाळांत प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाके विरोधी अभियान राबविण्यात येत आहे.या अभिनव आणि विधायक उपक्रमाला विद्यार्थी,शिक्षक,मु.अ.आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद!!!
         आणखी काही दिवसातच दीपावली येईल. *ही दीपावली सर्वांना सुखासमधनाची,आनंदाची ठरावी ही सदिच्छा.*दिपावलीतील फटाके व शोभेच्या दारूची खरेदी आणि नंतर वापर हा आनंदाचा भाग मानला जातो.परंतु आता सुजाण माणसे याबाबत विचार करू लागली आहेत.असे लक्षात येते की,या क्षणिक आनंदासाठी अनेक अन्याय घडतात. ते पुढीलप्रमाणे:
*1.प्रचंड ध्वनी प्रदूषण.*
*2.प्रचंड वायू प्रदूषण.*
*3.अपघाताने भाजणे.*
*4.आग लागणे.*
*5.वृद्ध,आजारी,परीक्षार्थी या सर्वांना त्रास.*
*6.फटाके बाल कामगार तयार करतात.फटाके खरेदीतून या चुकीच्या प्रथेला मान्यता व स्थिरता येते.*
*7.फटाके व शोभेची दारू उडवणे हे 100% अनुत्पादक आहे.*
 *"पैशाचा धूर काढणे"* असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
वरील सर्व लक्षात घेता कळकळीची विनंती आहे की या वर्षी मागील वर्षीपेक्षा फटाके, शोभेची दारू याची खरेदी कमीत कमी/अजिबात न करण्याचा निश्चय करू या!!! या वाचलेल्या पैशांतून *छान छान पुस्तके, खेळणी, किल्ल्यासाठीची साधनसामग्री घेण्याचा संकल्प करू या !!*
               सोबत संकल्प पत्र दिले आहे.ते भरून पालक व विध्यार्थी यांच्या सहीने शाळेत परत द्यावे असे आवाहन आम्ही करत आहोत.
तसेच ज्या शाळा या अभिनव उपक्रमात सहभागी होतील त्या शाळेतील अध्यापकाना मा.जयंत नारळीकर,मा.नरेंद्र जाधव, मा.एन.डी.पाटील,मा. सचिन तेंडुलकर,मा. डॉ. प्रकाश आमटे, मा. डॉ. जब्बार पटेल,मा. नाना पाटेकर यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

〰〰〰〰〰〰〰~
🥇🥇यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेले *श्री गोपाळ सूर्यवंशी* यांनीही या अभियानात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही राष्ट्र विधायक कार्यातूनच प्रबळ होते.🥇🥇🙏🏻
🎯 *फटाके 💥की पुस्तके 📚* 🎯

🔸फटाके मोठा आवाज ⚡करतात
*पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात*

🔹फटाके हवेचं प्रदूषण 🙊करतात
*पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात*

🔸फटाके अक्षरशः पैसे 💵जाळतात
*पुस्तके मात्र पैसे 💰उभे करतात*

🔹फटाके लहानग्यांना इजा 🤕करतात
*पुस्तके बाळांना 👶🏻छान रमवतात*

🔸फटाके पक्षीप्राण्यांना 🐥घाबरवतात
*पुस्तके 📖सर्व माहिती पोहोचवतात*

🔹फटाके आवाजाचं प्रदूषण🌪करतात
*पुस्तके शांततेचाही आवाज ऐकवतात*

🔸फटाके कान किर्रर करुन सोडतात
*पुस्तके मानसिक समाधान 💆🏻‍♂देतात*

🔸फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात
*पुस्तके माणसाला जमिनीवर ठेवतात*

🔸🔹 *आता काय निवडायचं तुम्ही ठरवा✅*
*विवेकाचा आवाज बुलंद करुया* ✊🏻

{ _शालेय परीपाठामध्ये *"प्रदुषणमुक्त दिवाळीसाठी फटाके विरोधी अभियानाची"* माहिती सांगावी.विद्यार्थ्यांना घरोघरी गावामध्ये सदरील माहिती सांगण्यास सांगावे व फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करावा._}

   🙏🏻 *आपलॆ विनित*🙏🏻

🌹 *"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाखा:-चाकूर."*
🌹 *"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाखा:-नळॆगाव."*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄


          🌹 *संयोजन समिती* 🌹
प्राचार्य संजय वाघमारे,प्राचार्य धनंजय चाटे,प्रा.श्रीहरी वेपाठक,मा.बालाजी येरोळे,के. आर. वाघमारे,राहुल गायकवाड,चेतन चव्हाण,दिगांबर बुरसापट्टे,चन्नप्पा मुदगडे,वहाब जागिरदार,शरद हुडगे,बाळासाहेब येळापूरे,चंद्रशेखर शिरूरे,राजकुमार भुसणीकर, नीलकंठ भालेकर,संगम ढगे,चंद्रशेखर भालेराव,राजू कोंपले,सोपान भालेकर,सचिन मुदगडे,जनार्धन घंटेवाड,विलास कस्तुरे,अंगद सावंत,दिलीप सांगवे,भगीरथ रेड्डी,दयानंद मठपती,शिवदत्त पांचाळ,मधुकर कांबळे,सुधाकर हेमनर,नारायण हेंबडे,रवीराज देशमुख,मुजीब शेख,सुरेश केंद्रे,अलाबक्ष शेख,तात्याराव भोसले,देविदास सांगवे,गोविंद हंद्राळे,संजयकुमार राठोड, बी.एम.चौधरी,विरभद्र बावगे, गणराज अंतुरे,नागेश माने,परमेश्वर बालकुंदे,नागेश लोहारे,ज्ञानोबा येणगे,वसंत गाडेकर,अंतेश्वर होणराव,प्रविण काळे,प्रभावती डोंगरे,प्रभावती मोतीपवळे,प्रभावती पोतणे,अनुराधा मोरे,रंजना तेलंगे,कविता सूर्यवंशी,जयश्री जगताप,जयश्री कोळसुरे,सुरेखा मुर्गे, राजू नरहारे,भरत कोरे, मोहन स्वामी,मारोती वागलगावे ,माधव कानुरे,दत्ता शिरूरे,अशोक नाब्दे,रामकीशन चिंचोळे, सतीश कदम, अजित शिरूरे,प्रमोद हुडगे, माधव पारशेट्टे व *आपण सर्व*.
     
                🙏🏻आपले स्नेही🙏🏻

*चंद्रकांत भोजने,प्रदीप ढेंकरे,धनंजय गुडसुरकर,तानाजी रोंगे,उमाकांत चलवदे, चंद्रशेखर भालेराव, अण्णा नरसिंगे ,डी. बी. नकुरे,शंभुदेव केंद्रे,हरीश आयतनबोने,सुशेन पाटील, सुशील पांचाळ,जयराज सोदले,डी. एम. शेख,रणजीत घुमे,रामचंद्र चामे,शरद सोमवंशी,*

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸













No comments:

Post a Comment