प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 28 September 2017

*जानिए अशोक चक्र की 24 तीलियों का अर्थ*

   महान बौद्ध सम्राट अशोक के बहुत से शिलालेखों पर एक चक्र (पहिया) बना हुआ है इसे अशोक चक्र कहते हैं. यह चक्र *"धम्म चक्र"* का प्रतीक है। सारनाथ स्थित सिंह-चतुर्मुख (लॉयन कपिटल) एवं अशोक स्तम्भ पर अशोक चक्र विद्यमान है । भारत के राष्ट्रीय ध्वज में अशोक चक्र को स्थान दिया गया है ।

*अशोक चक्र को कर्तव्य का पहिया भी कहा जाता है ।* ये 24 तीलियाँ मनुष्य के 24 गुणों को दर्शाती हैं । दूसरे शब्दों में इन्हें मनुष्य के लिए बनाए गए 24 धर्म मार्ग भी कहा जा सकता है, जो किसी भी देश को उन्नति के पथ पर पहुंचा सकते हैं। इसी कारण हमारे राष्ट्र ध्वज के निर्माताओं ने जब इसका अंतिम रूप फाइनल किया तो उन्होंने झंडे के बीच से चरखे को हटाकर इस अशोक चक्र को रखा था ।

  आइए, अब अशोक चक्र में दी गयी सभी तीलियों का अर्थ (चक्र के क्रमानुसार) जानते हैं -

1. पहली तीली :- *संयम* (संयमित जीवन जीने की प्रेरणा देती है)
2. दूसरी तीली :- *आरोग्य* (निरोगी जीवन जीने के लिए प्रेरित करती है)
3. तीसरी तीली :- *शांति* (देश में शांति व्यवस्था कायम रखने की सलाह)
4. चौथी तीली :- *त्याग* (देश एवं समाज के लिए त्याग की भावना का विकास)
5. पांचवीं तीली :- *शील* (व्यक्तिगत स्वभाव में शीलता की शिक्षा)
6. छठवीं तीली :- *सेवा* (देश एवं समाज की सेवा की शिक्षा)
7. सातवीं तीली :- *क्षमा* (मनुष्य एवं प्राणियों के प्रति क्षमा की भावना)
8. आठवीं तीली :- *प्रेम* (देश एवं समाज के प्रति प्रेम की भावना)
9. नौवीं तीली :- *मैत्री* (समाज में मैत्री की भावना)
10. दसवीं तीली :- *बन्धुत्व* (देश प्रेम एवं बंधुत्व को बढ़ावा देना)
11. ग्यारहवीं तीली :-  *संगठन* (राष्ट्र की एकता और अखंडता को मजबूत रखना)
12. बारहवीं तीली :- *कल्याण* (देश व समाज के लिये कल्याणकारी कार्यों में भाग लेना)
13. तेरहवीं तीली :- *समृद्धि* (देश एवं समाज की समृद्धि में योगदान देना)
14. चौदहवीं तीली :- *उद्योग* (देश की औद्योगिक प्रगति में सहायता करना)
15. पंद्रहवीं तीली :- *सुरक्षा* (देश की सुरक्षा के लिए सदैव तैयार रहना)
16. सौलहवीं तीली :- *नियम* (निजी जिंदगी में नियम संयम से बर्ताव करना)
17. सत्रहवीं तीली :- *समता* (समता मूलक समाज की स्थापना करना)
18. अठारहवी तीली :- *अर्थ* (धन का सदुपयोग करना)
19. उन्नीसवीं तीली :- *नीति* (देश की नीति के प्रति निष्ठा रखना)
20. बीसवीं तीली :- *न्याय* (सभी के लिए न्याय की बात करना)
21. इक्कीसवीं तीली :-  *सहयोग* (आपस में मिलजुल कार्य करना)
22. बाईसवीं तीली :- *कर्तव्य* (अपने कर्तव्यों का ईमानदारी से पालन करना)
23. तेईसवी तीली :- *अधिकार* (अधिकारों का दुरूपयोग न करना)
24. चौबीसवीं तीली :- *बुद्धिमत्ता* (देश की समृधि के लिए स्वयं का बौद्धिक विकास करना)

   इस प्रकार अशोक चक्र में दी गई हर एक तीली का अपना अर्थ है, सभी तीलियाँ सम्मिलित रूप से देश और समाज के चहुमुखी विकास की बात करती हैं। ये तीलियाँ सभी देशवासियों को उनके अधिकारों और कर्तव्यों के बारे में स्पष्ट सन्देश देने के साथ साथ यह भी बतातीं हैं कि हमें रंग, रूप, जाति और धर्म के अंतरों को भुलाकर पूरे देश को एकता के धागे में पिरोकर समृद्धि के शिखर तक ले जाने के लिए सतत प्रयास करते रहना चाहिए ।

                जयराज नवनाथराव सोदले

=====================================

Wednesday, 27 September 2017

*निवडणुक ,मतदान व कर्तव्य*

निवडणुक ,मतदान व कर्तव्य
# ग्रामपंचायत निवडणुक #

==============
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 मतदान अधिकारी कर्तव्य:
———————–

👤 मतदान केंद्राध्यक्ष:-

-पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.

-कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.

-आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.

-सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

-माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.

-सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.

-मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 *मतदान अधिकारी:- १*

-नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.

– ओळख पटवीणे.

-मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

 👤 *मतदान अधिकारी:- २*

– मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.

-डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.

-मतदार चिठ्ठी तयार करणे.


⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤  *मतदान अधिकारी:- ३*

-पक्की शाई तपासणे.

-मतदार चिठ्ठी जमा करणे.

-कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

👤 *शिपाई :-*
मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

📩 *हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-*

————————-
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.

2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.

3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.

4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.

5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)

6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

📩 संविधानिक पाकिटे: (sealed):
(हिरव्या रंगाचे)

1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.

2) मतदार नोंद वही.

3) व्होटर स्लिप.

4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.

5) न वापरलेल्या मत पत्रिका.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

 📩 *असांविधानिक पाकिटे:-*
(पिवळया रंगाचे)

1) शिल्लक मतदार यादीची प्रत.

2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.

3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.

4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.

5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.

6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.

7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.

8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.

⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙⚙

*इतर साहित्याचे पाकिटे:-*
( खाकी रंगाचे)*
————————
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.

टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा……..

* प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

*प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.

       राष्ट्रीय कर्त्यव्यात सहभागी सर्व कर्मचारी ,अधिकारी वर्गास शुभेच्छा।।।।।।

जयराज नवनाथराव सोदले
BLO बोथी 286

Monday, 25 September 2017

🌸 *सरल:-आधार कार्ड* 🌸

*विद्यार्थी आधार कार्ड माहिती अपलोड करता वेळी विद्यार्थी जन्मतारखेचा  येणारा एरर कसा घालवावा व UID एक्सेल फाईल यशस्वीरित्या कशी अपलोड करावी*


📌 *विद्यार्थी आधार कार्ड माहिती अपलोड करता वेळी विद्यार्थी जन्मतारखेचा format चुकीचा आहे असा एरर आल्याने आधार कार्ड माहिती अपलोड होत नाही हा एरर कसा घालवावा हे पाहूया*



*ज्या वेळी UID फाईल मध्ये आपण तारीख टाईप करतो तेव्हा तिचा format बदलतो उदा. 11-05-2011 ही जन्मतारीख असेल तर तो format 11/5/2011 असा होतो*



⚙ *हा format बदलण्यासाठी आपल्याला आपल्या PC मधील तारखेच्या format मधील सेटिंग बदलून योग्य format करावा लागेल*



*आपल्या PC मध्ये mm-dd-yyyy हा तारखेचा format असतो , तो बदलून जर dd-mm-yyyy असा केला तर विद्यार्थी आधार कार्ड माहिती अपलोड होणार आहे*



*UID एक्सेल फाईल मध्ये माहिती भरण्यापूर्वी खालील सेटिंग करून घ्या*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*सर्वप्रथम आपल्या PC मध्ये उजव्या बाजूस सर्वात खाली कोपऱ्यात वेळ व तारीख डिस्प्ले होत असते त्याचावर क्लिक करा*



*आता एक पॉप अप विंडो वर खाली Change date and Time setting असे निळ्या रंगात असेल त्याच्यावर क्लिक करा*



*आता Date and Time ची एक पॉप अप विंडो दिसेल त्याच्यातील change date and time असा उजव्या बाजूस मध्यभागी एक पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा*



*एक नवीन विंडो ओपन होईल ती विंडो Date and Time Settings ची असेल त्यात डाव्या बाजूस खाली change calendar settings असे असेल त्याच्यावर क्लिक करा*





*आता जर customize format ही विंडो आली तर तिला क्लोज करा*



*आपल्याला Region and Language या विंडो मध्ये सेटिंग करायची आहे* ⚙



*format या पर्यायात जी भाषा असेल उदा. English ( US ) असेल ती बदलून English ( India ) हे दिलेल्या पर्यायातून निवडायचे आहे*



*खाली Date and time formats मध्ये Short date मध्ये dd-mm-yyyy असे निवडायचे आहे*



*खाली ok वर क्लिक करा*



*वरील सेटिंग जर आपण केली आपल्या PC मधील तारखेचा format mm-dd-yyyy असा बदलून dd-mm-yyyy असा झाला असेल उदा. जर तारीख ११ सप्टेंबर २०१७ असेल तर ती PC वर 09-11-2017 असे न दिसता 11-09-2017 अशी दिसेल*

📌 *वरील सेटिंग करून जर आपण विद्यार्थी आधार कार्ड मध्ये जन्मतारीख नोंदवली तर आधार कार्ड माहिती अपलोड होण्यासाठी काहीही समस्या येणार नाही*

📌 *जर कोणी UID ची एक्सेल फाईल मध्ये अगोदर माहिती भरली असेल त्यांनी वरील सेटिंग करून नवीन फाईल डाऊनलोड करून घ्या त्यात J कॉलम मध्ये सेटिंग करून पहिल्या file मधील माहिती दुसऱ्या file मध्ये पेस्ट करा, गरज भासल्यास फक्त जन्मतारखा बदला व dropdown मेनू मधील gender निवडा*

 📌 *आपण जेव्हा एकाच वर्गाची file दोन वेळा डाऊनलोड करतो तेव्हा दुसऱ्या file चे नाव बदलत असते त्याच्या शेवटी (2) असे येते ते rename करून delete करा*


📌 *काही आधार कार्ड ची माहिती all ready exits अशी दिसते त्याचे आधार माहिती पोर्टल वर पहिल्यांदाच save आहे असे समजावे*


📌 *बरेच जण J कॉलम मध्ये सेटिंग करत नाही त्यामुळे file डाऊनलोड होत नाही ती सेटिंग करून घ्या*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Sunday, 24 September 2017










महत्वाचे शैक्षणिक  ब्लॉग

१)  bmcschools.blogspot.in


२)  https://shikshankranti.blogspot.in/search


३)   https://deshmukhravi.blogspot.in/


ई-लर्निंग ........
























===========================================================
आमचे  गुणवंत  विद्यार्थी ..........



















=======================================================================


शालेय  क्रीडा  स्पर्धा





















=================================================================


अभ्यास   दौरा ...............


















=================================================================
वाचन  प्रेरणा दिन ..
















==========================================================================


स्कॉलरशिप परीक्षा  तयारी






















==================================================================
नवोदय  तयारी



















=======================================================================

शाळा भेट (मान्यवरांच्या आमच्या शाळेस भेटी )





















===============================================================


दुर्गुणांची  होळी

हा  उपक्रम  आमच्या शाळेत  घेतला  जातो.


























==============================================================
बालसभा  ५


















=================================================================
बालसभा  ४























====================================================================
बालसभा  ३











=======================================================================
बालसभा   ३












===================================================================


बालसभा   २  


















=============================================================
बालसभा  १ 



==========================================================
बालसभा     (खाली क्लिक करा..)


बालसभा  १


बालसभा   २  


बालसभा   ३


बालसभा   ४  


बालसभा   ५
























===================================================================


परिपाठ ..........





















====================================================================
माझी  डिजिटल  शाळा














=================================================================


महिला  मेळावा .....




















==================================================================
पूरक  आहार ...














=======================================================================

ध्वजसंहिता

ध्वजसंहिता 26 जानेवारी 2002 ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.

ध्वजसंहितेत झालेले बदल-

1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)

4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.


ध्वजप्रतिज्ञा :-

 "मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."

ध्वजारोहन क्रम :-

1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे
2) राष्ट्रीय सलामी
3) राष्ट्रगीत
4) ध्वजप्रतिज्ञा
5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.

 *****!!!!!*****‬: राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.

ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

 संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.

मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.

शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.

प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

 ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.

 अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.

कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.

 ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.

जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.

 कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.

इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.

केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये.

तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.

ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.

त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.

ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.

कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.

तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.

राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.

ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.

जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.

सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.


==============================================================================

Saturday, 23 September 2017





📚📖 *साधना वाचन संस्कृती अभियान 2017* 📖📚
मा.प्रिय,
नमस्कार 🙏🏻
भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापन दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी,साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले.
           *साने गुरूजींचे विचार व संस्कार विद्यार्थ्यान पर्यंत पोहोचविणे आणि आधुनिक भारताचे सुजाण नागरीक घडविणे हे उद्दीष्टये डोळ्यासमोर ठेऊन हा वाचन संस्कृती च्या प्रसाराचा व प्रचाराचा उपक्रम राबविला जातो.*अनेक व्यक्ती,संस्था व संघटना यांच्या सहभागातून हे कार्य होत आले आहे.
                      गतवर्षी आपण *चाकूर तालुका,लातूर जिल्हा व महाराष्ट्रातील सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी बळ दिले आहे व यापुढेही देत रहाल याबद्दल आपणां सर्वांचे आभार व अभिनंदन.*💐
        या वर्षीचा *अंक नोंदणी मोहिम आजपासूनच सुरू करत आहोत.त्यात आपण स्वतः सहभागी व्हावे आंणि आपल्या परीचयाच्या शाळा,संस्था वा शासकीय पातळीवर प्रयत्न करावेत आणि वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी या उपक्रमाला हातभार लावावा,अशी विनंती आहे.🙏🏻*

         साधना साप्ताहिकाचा
✔📕 *बाल-कुमार दिवाळी अंक 2017*
           संपूर्ण *बहुरंगी*
      किंमत 30₹ *सवलतीत 15₹.*

यावर्षीच्या अंकात काय आहे ❓
        *"सहा देशातील,*
        *सहा मुले-मुली"*

[ _ज्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली......._]

1⃣ *टिली स्मिथ (ब्रिटन)*

2⃣ *रायल हर्लजॅक (कॅनडा)*

3⃣ *ककान्या नटाया (केनिया)*

4⃣ *विल्यम कामक्वांबा (मलावी)*

5⃣ *शिझा शाहीद (पाकिस्तान)*

6⃣ *किशन श्रीकांत (भारत)*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

        साधना साप्ताहिकाचा
✔📙 *युवा दिवाळी अंक 2017*
             संपूर्ण *बहुरंगी*
    किंमत 40₹ *सवलतीत 20₹*

या वर्षीच्या अंकात काय आहे ❓❓
युवा शक्तिच्या जाणिवांच्या कक्षा रूंदावणारे आणि दृष्टीकोनाला वेगळे आयाम बहाल करु शकणारे...  *नऊ लेख*

*१."भयानक वास्तव अंगावर आदळते तेंव्हा"*--मनिषा कोईराला

*२.एक मस्ट रीड भाषण, "लेट्स बी रॅशनल विथ सोशल मिडीया"*--विनायक पाचलग.

*३."इतिहासकाराने ज्योतिषी व्हावे काय?"*--रामचंद्र गुहा.

*४."नृत्यकलेचा प्रवास"*--झेलम परांजपे.

*५."एक रोमहर्षक प्रकरण"*--निखिल वागळे.

*६."कुतूहल शमवणारी मुलाखत"*--गिरीश कुबेर.

*७."आपण सर्वांनी फेमिनिस्ट असले पाहिजे"*--चिमामांडा एन्गोझी.

*८."निर्भयता व शांतता"*--बॉनिफेस वांगी.

*९."जीवनाचा खरा अर्थ काय?"*--विल डयुरांटने.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

          🌹 *संयोजन समिती* 🌹
प्राचार्य संजय वाघमारे, प्राचार्य धनंजय चाटे,प्रा.श्रीहरी वेपाठक,मा.बालाजी येरोळे, चेतन    चव्हाण, दिगांबर बुरसापट्टे,चन्नप्पा मुदगडे,वहाब जागिरदा,रशरद हुडगे,बाळासाहेब येळापूरे,चंद्रशेखर शिरूरे,संगम ढगे,चंद्रशेखर भालेराव,राजू कोंपले,सोपान भालेकर,सचिन मुदगडे,जनार्धन घंटेवाड,विलास कस्तुरे,अंगद सावंत,दिलीप सांगवे,भगीरथ रेड्डी,दयानंद मठपती,शिवदत्त पांचाळ,मधुकर कांबळे,सुधाकर हेमनर,नारायण हेंबडे,रवीराज देशमुख,मुजीब शेख,सुरेश केंद्रे,अलाबक्ष शेख,गोपाळ सूर्यवंशी,तात्याराव भोसले,देविदास सांगवे,गोविंद इंद्राळे,संजयकुमार राठोड, बी.एम.चौधरी,विरभद्र बावगे, गणराज अंतुरे,नागेश माने,परमेश्वर बालकुंदे,नागेश लोहारे,ज्ञानोबा येणगे,वसंत गाडेकर,अंतेश्वर होणराव,प्रविण काळे,प्रभावती डोंगरे,प्रभावती पोतणे,अनुराधा मोरे,रंजना तेलंगे,प्रभावती मोतीपवळे,कविता सूर्यवंशी,जयश्री जगताप,जयश्री कोळसुरे,दत्ता शिरूरे,प्रमोद हुडगे,अशोक नाब्दे,देविदास सांगवे,माधव पारशेट्टे व आपण सर्व.
     
                🙏🏻आपले स्नेही🙏🏻

*चंद्रकांत भोजने,प्रदीप ढेंकरे, सुशेन पाटील, सुशील पांचाळ,जयराज सोदले,डी. एम. शेख,रणजीत घुमे,रामचंद्र चामे.*

📚📚📖📙📗📘📕📒📖📚📚
🌹 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती* 🌹
      *जिल्हा शाखा लातूर/चाकूर/नळेगाव*
          *{ विज्ञान,निर्भयता व निती }*

*प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाके विरोधी अभियान..2017.*
      विनम्र आवाहन
प्रिय पालक,शिक्षक व विद्यार्थी,सप्रेम नमस्कार🙏🏻
गेल्या पाच वर्षापासून नळेगाव अंनिस शाखेच्या वतीने संपूर्ण चाकूर तालुका व जिल्ह्यातील शाळांत प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाके विरोधी अभियान राबविण्यात येत आहे.या अभिनव आणि विधायक उपक्रमाला विद्यार्थी,शिक्षक,मु.अ.आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद!!!
         आणखी काही दिवसातच दीपावली येईल. *ही दीपावली सर्वांना सुखासमधनाची,आनंदाची ठरावी ही सदिच्छा.*दिपावलीतील फटाके व शोभेच्या दारूची खरेदी आणि नंतर वापर हा आनंदाचा भाग मानला जातो.परंतु आता सुजाण माणसे याबाबत विचार करू लागली आहेत.असे लक्षात येते की,या क्षणिक आनंदासाठी अनेक अन्याय घडतात. ते पुढीलप्रमाणे:
*1.प्रचंड ध्वनी प्रदूषण.*
*2.प्रचंड वायू प्रदूषण.*
*3.अपघाताने भाजणे.*
*4.आग लागणे.*
*5.वृद्ध,आजारी,परीक्षार्थी या सर्वांना त्रास.*
*6.फटाके बाल कामगार तयार करतात.फटाके खरेदीतून या चुकीच्या प्रथेला मान्यता व स्थिरता येते.*
*7.फटाके व शोभेची दारू उडवणे हे 100% अनुत्पादक आहे.*
 *"पैशाचा धूर काढणे"* असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
वरील सर्व लक्षात घेता कळकळीची विनंती आहे की या वर्षी मागील वर्षीपेक्षा फटाके, शोभेची दारू याची खरेदी कमीत कमी/अजिबात न करण्याचा निश्चय करू या!!! या वाचलेल्या पैशांतून *छान छान पुस्तके, खेळणी, किल्ल्यासाठीची साधनसामग्री घेण्याचा संकल्प करू या !!*
               सोबत संकल्प पत्र दिले आहे.ते भरून पालक व विध्यार्थी यांच्या सहीने शाळेत परत द्यावे असे आवाहन आम्ही करत आहोत.
तसेच ज्या शाळा या अभिनव उपक्रमात सहभागी होतील त्या शाळेतील अध्यापकाना मा.जयंत नारळीकर,मा.नरेंद्र जाधव, मा.एन.डी.पाटील,मा. सचिन तेंडुलकर,मा. डॉ. प्रकाश आमटे, मा. डॉ. जब्बार पटेल,मा. नाना पाटेकर यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

〰〰〰〰〰〰〰~
🥇🥇यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेले *श्री गोपाळ सूर्यवंशी* यांनीही या अभियानात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही राष्ट्र विधायक कार्यातूनच प्रबळ होते.🥇🥇🙏🏻
🎯 *फटाके 💥की पुस्तके 📚* 🎯

🔸फटाके मोठा आवाज ⚡करतात
*पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात*

🔹फटाके हवेचं प्रदूषण 🙊करतात
*पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात*

🔸फटाके अक्षरशः पैसे 💵जाळतात
*पुस्तके मात्र पैसे 💰उभे करतात*

🔹फटाके लहानग्यांना इजा 🤕करतात
*पुस्तके बाळांना 👶🏻छान रमवतात*

🔸फटाके पक्षीप्राण्यांना 🐥घाबरवतात
*पुस्तके 📖सर्व माहिती पोहोचवतात*

🔹फटाके आवाजाचं प्रदूषण🌪करतात
*पुस्तके शांततेचाही आवाज ऐकवतात*

🔸फटाके कान किर्रर करुन सोडतात
*पुस्तके मानसिक समाधान 💆🏻‍♂देतात*

🔸फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात
*पुस्तके माणसाला जमिनीवर ठेवतात*

🔸🔹 *आता काय निवडायचं तुम्ही ठरवा✅*
*विवेकाचा आवाज बुलंद करुया* ✊🏻

{ _शालेय परीपाठामध्ये *"प्रदुषणमुक्त दिवाळीसाठी फटाके विरोधी अभियानाची"* माहिती सांगावी.विद्यार्थ्यांना घरोघरी गावामध्ये सदरील माहिती सांगण्यास सांगावे व फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करावा._}

   🙏🏻 *आपलॆ विनित*🙏🏻

🌹 *"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाखा:-चाकूर."*
🌹 *"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाखा:-नळॆगाव."*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄


          🌹 *संयोजन समिती* 🌹
प्राचार्य संजय वाघमारे,प्राचार्य धनंजय चाटे,प्रा.श्रीहरी वेपाठक,मा.बालाजी येरोळे,के. आर. वाघमारे,राहुल गायकवाड,चेतन चव्हाण,दिगांबर बुरसापट्टे,चन्नप्पा मुदगडे,वहाब जागिरदार,शरद हुडगे,बाळासाहेब येळापूरे,चंद्रशेखर शिरूरे,राजकुमार भुसणीकर, नीलकंठ भालेकर,संगम ढगे,चंद्रशेखर भालेराव,राजू कोंपले,सोपान भालेकर,सचिन मुदगडे,जनार्धन घंटेवाड,विलास कस्तुरे,अंगद सावंत,दिलीप सांगवे,भगीरथ रेड्डी,दयानंद मठपती,शिवदत्त पांचाळ,मधुकर कांबळे,सुधाकर हेमनर,नारायण हेंबडे,रवीराज देशमुख,मुजीब शेख,सुरेश केंद्रे,अलाबक्ष शेख,तात्याराव भोसले,देविदास सांगवे,गोविंद हंद्राळे,संजयकुमार राठोड, बी.एम.चौधरी,विरभद्र बावगे, गणराज अंतुरे,नागेश माने,परमेश्वर बालकुंदे,नागेश लोहारे,ज्ञानोबा येणगे,वसंत गाडेकर,अंतेश्वर होणराव,प्रविण काळे,प्रभावती डोंगरे,प्रभावती मोतीपवळे,प्रभावती पोतणे,अनुराधा मोरे,रंजना तेलंगे,कविता सूर्यवंशी,जयश्री जगताप,जयश्री कोळसुरे,सुरेखा मुर्गे, राजू नरहारे,भरत कोरे, मोहन स्वामी,मारोती वागलगावे ,माधव कानुरे,दत्ता शिरूरे,अशोक नाब्दे,रामकीशन चिंचोळे, सतीश कदम, अजित शिरूरे,प्रमोद हुडगे, माधव पारशेट्टे व *आपण सर्व*.
     
                🙏🏻आपले स्नेही🙏🏻

*चंद्रकांत भोजने,प्रदीप ढेंकरे,धनंजय गुडसुरकर,तानाजी रोंगे,उमाकांत चलवदे, चंद्रशेखर भालेराव, अण्णा नरसिंगे ,डी. बी. नकुरे,शंभुदेव केंद्रे,हरीश आयतनबोने,सुशेन पाटील, सुशील पांचाळ,जयराज सोदले,डी. एम. शेख,रणजीत घुमे,रामचंद्र चामे,शरद सोमवंशी,*

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸













Tuesday, 19 September 2017

जयराज नवनाथराव सोदले
Jayraj Navnathrao Sodle




















Sunday, 17 September 2017

मैत्रीणीनो आता नवरात्र येईल, आपल्या पैकी अनेक जणांनी कोणता रंग कधी याची वार,तरिख आणि रंग याची यदि आपल्याला दिली देखील असेल, आणि आपण त्या तयरीला लागला देखील असाल,*

 हो ना ?

*चला मित्र मैत्रीणीनो  या वर्षी आपण सगळे नावरंगाची अशी उधळण करू या*

*नवरात्र....नवरंग*

🌺 एक रंग
स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

🌺 दुसरा रंग
मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

🌺 तिसरा रंग
आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

🌺 चौथा रंग
मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

🌺 पाचवा रंग
बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

🌺 सहावा रंग
पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

🌺 सातवा रंग
स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

,🌺 आठवा रंग
विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

🌺 नववा रंग
"स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.

आपण हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होइल.!!
               संकलन
   जयराज नवनाथराव सोदले
    jayrajsodle.blogspot.com

=====================================

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
मराठवाडा मुक्ती संग्राम -
           "संत महंताची भूमी
             माही मराठवाड्याची
             भोळी भाबडी माणसं
             लई पुण्यवान माती."
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
-----------------------------------------------------------------------------------
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या १७ सप्टेंबर रोजी तब्बल ६० वर्षे पूर्ण होत आहेत. ६० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. निजामाचा धूर्त डाव होता की, १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला ‘पोलीस ऍक्शन’ असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे मराठवाड्यात राहणारा तेलंगण प्रांत आता आंध्र प्रदेशपासून वेगळे होण्याची भाषा करीत आहे. मराठवाडा, विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? ( डॉ. राजीव भोसेकर)
१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....६८व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्या.........!
----------------------------------------------------------
🌹हैदराबाद मुक्तिसंग्राम का घडला?🌹
आजचा मराठवाडा, आंध्र प्रदेशातील तेलंगणा प्रांतातील हैदराबाद, वरंगल, नलगोंडा, निजामाबाद, करीमनगर, मेदक, आदिलाबाद आणि उत्तर कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, रायचूर आदी 14 जिल्ह्यांचे मिळून हैदराबाद संस्थान झाले. पोलिस अॅक्शनपूर्वी शेवटच्या निझामाचे युनोत जाण्याचे मनसुबे सरदार पटेल यांनी उधळून लावले. हैदराबादने इंग्रजाचे मांडलिकत्व पत्करले होते. निजामाने त्यांची तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली होती. त्यामुळे निजामाच्या विशाल राज्याचे संरक्षण हे ब्रिटिशांचे कर्तव्य होते. म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या सैन्याच्या तुकड्या हैदराबादेत व काही तुकड्या औरंगाबादच्या छावणीत ठेवल्या होत्या. सहावे निझाम मीर महबूब अली हे फार गुणग्राहक, सर्वांना घेऊन चालणारे होते.
त्यांच्या काळात अनेक हिंदू दिवाण होऊन गेले. मात्र, सातवे निझाम मीर उस्मान अली हा पदावर आला मात्र तो कपटी, संधिसाधू, महत्त्वाकांक्षी, व विश्वासघातकी म्हणजे उपकाराची फेड अपकाराने करणारा असा होता. त्यामुळे त्याची राजवट हळूहळू मलीन होत गेली. शेवटच्या टप्प्यात 1945 नंतर रझाकारांमुळे हैदराबाद संस्थान व जुलमी राजवटीला घरघर लागली व 1948 च्या पोलिस अॅक्शननंतर निझामी राजवट संपुष्टात आली. यानंतर जे रझाकार कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली खास निझामसाठी हैदराबाद संस्थान हे आपले संस्थान म्हणून लढले, कित्येक मेले, जिवाची बाजी लावली त्यांनाच निझाम मीर उस्मानअलीने नाकारले.
सहावे निझाम मीर महबूब अलीचा मृत्यू होताच 1 सप्टेंबर 1911 रोजी रेसिडेंट सर अलेक्झांडर पिन्हे याने औपचारिकरीत्या मीर उस्मानअलीला गादीवर बसवले. मीर उस्मानअलीच्या काळातच निझामाचे राज्य (आसाफजाही) संपुष्टात आली. राज्यावर येताच उस्मानअलीने आपणास राजपद मिळवून देणाºया तिघांनाही कामावरून दूर केले. निझामाची भावनिकदृष्ट्या कोणाशीही जवळीक नव्हती. विलक्षण कोरड्या स्वभावाच्या, एकलकोंड्या अशा या मीर उस्मानअलीच्या (1911 ते 1948) स्वभावातच हैदराबाद मुक्तिसंग्राम घडण्याची बीजे होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून गणला गेलेला निझाम लोभी आणि कंजूष होता. कायदेशीर मार्गाने दर वर्षी पावणेदोन कोटीपेक्षा जास्त मिळकत असतानाही अप्रत्यक्ष सक्ती असलेले नजराणे, राज्याभिषेक व वाढदिवसाच्या प्रसंगी निझाम पैसे घेत असे. राजधानीबाहेर एखाद्या ठिकाणाला भेट दिली तर एक सोन्याचे नाणे निझामाला द्यावे लागे. निझामाच्या अंकित असलेल्या संस्थानिकांकडे तो येणार असला तर दोन लाख रुपये नजर करावे लागत. त्या संस्थानाचे तेवढे वार्षिक उत्पन्नही नसे. हैदराबाद मुक्तिसंग्राम हा फक्त राजकीय लढा नव्हता तर त्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्वातंत्र्याचाही भाग होता. नागरिकांवर नाना प्रकारची बंधने त्याने लादली होती. कसल्याच प्रकारचे नागरी स्वातंत्र्य संस्थानात उरले नव्हते. निझामाने स्वतंत्र हैदराबादची घोषणा करून टाकली. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाकडे आपला वकील पाठवण्यापर्यंत त्याची मजल गेली. भारतातील चळवळींचा प्रभाव हैदराबाद संस्थानातील सुशिक्षित वर्गावर पडू लागला होता. या चळवळींची धास्ती निझाम सरकारने घेतली. स्वदेशीच्या चळवळीने जोर पकडल्यावर या पुढाºयांवर निझाम सरकारकडून हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या गेल्या. 1923 मध्ये राघवेंद्रराव शर्मा यांनी कर्नाटकातील एका परिषदेत निझाम सरकारवर कडक टीका केल्याने निझाम सरकारने त्यांची वकिलीची सनद जप्त केली. 1921 मध्ये निझामाने फर्मान काढून सभा, संमेलने, बैठका, प्रवचन आणि मिरवणुकींवर कडक निर्बंध घातले. मंत्रिमंडळाची परवानगी घेतल्याशिवाय सभा घेता येत नव्हती तसेच व्यायामशाळा आखाडे, खासगी शाळा, ग्र्रंथालये सरकारच्या परवानगीशिवाय काढू नयेत अशी सक्ती केली होती. सरकारचे उस्मानिया विद्यापीठ हे मध्ययुगीन संकल्पनांना चिकटून बसणारे होते. आर्थिक पिळवणूक हैदराबाद संस्थानात शेतीखाली असलेल्या एकूण जमिनीचा 1/3 भाग हा सर्फेखास म्हणजे निझामाच्या स्वत:च्या खर्चासाठी असलेल्या जहागिरी पायगा, जहागीरदार, जमीनदार, मक्तेदार, इनामदार यांच्या अमलाखाली होता. निझामाने सर्फेखास जहागिरीची व्यवस्था मुलकी खात्याकडे दिली होती. या सर्फेखासचा जास्तीत जास्त भाग मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात होता. तेथील प्रशासन फारच अकार्यक्षम होते. पायगा आणि इतर जहागीरदार यांचे स्वत:चे मुलकी, महसूल व न्याय खाते होते. जहागिरीतील जमिनीवर व रयतेवर अनेक जाचक कर होते. शेतसारा दुप्पट तर काही ठिकाणी त्याहूनही जास्त होता. जमीन कामगारांना संरक्षण नव्हते. जहागीरदार, जमीनदार त्यांना कधीही काढून टाकत असत. जहागीरदाराचा हुकूम म्हणजेच कायदा. तो जास्त पैसे दिले तरच जमीन कसण्यास देई. याशिवाय नदी उतार कर, बभूल फली कर असे कर जहगिरीत वसूल केले जात. जहागीरदाराच्या घरी लग्नकार्य असल्यास रयतेला मोठा नजराणा द्यावा लागे. संस्थानात बाहेरून येणाºया मालावर कर लादण्यात येत होता. त्याला करोडगिरी म्हणत असत. अबकारी खाते व इतर सर्व कचेºयांमध्ये मोठ्या प्रमाणात लाचलुचपत आणि वशिलेबाजी होती. मामूल दिल्याशिवाय कोणत्याही कचेरीत फाइल हलत नसे.
हैदराबाद स्टेट काँग्रेसचा लढा जसजसा उग्र होत गेला तसतसे निझामी पोलिसांचे व रझाकाराचे अत्याचार वाढतच गेले. मात्र, निझामी सरकार त्याविरुद्ध काहीही करत नव्हते रझाकारांनी केकरजवळा येथील पन्नालालजी चांडक यांचे घर लुटले दहेगाव येथील नारायणराव खारकर व बलभीमराव खारकर यांच्या घरांवर हल्ला करून त्यांना ठार मारले व त्यांचे घर लुटले. सेलू येथे या हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. रझाकारांनी सेलूतील सिनेमागृहात उत्तमचंद यांचा खून केला. सेलूचा रोहिला अब्दुल रज्जाक याने रझाकारांच्या साह्याने मोंढा लुटला. पैसे उकळले. रामपुरीत रंगनाथराव माली पाटील यांचा भरदिवसा खून केला; पण पोलिसांनी कारवाई केली नाही. उलट गावकºयांजवळची शस्त्रे निझामी पोलिसांनी आधीच काढून घेतली होती. त्यामुळे माली पाटलाची निर्घृण हत्या लोकांना निमूट पाहावी लागली.
भारत सरकारने हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी सप्टेंबरात पोलिस अॅक्शन करण्याचे निश्चित केले. 40 वर्षांचे सोसलेपण व शेकडो कारणे, निर्वासितांची रीघ यामुळे भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. भारत सरकारने हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पत्र घेतले. जनतेचा कौल यावरून हा प्रश्न युनोत नेला व इकडे 13 सप्टेंबर रोजी पोलिस अॅक्शन सुरू केली. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निझाम मीर उस्मानअली भारत सरकारला शरण आला. सामीलनाम्यावर संस्थान भारतात विलीन झाले. हैदराबादचा प्रश्न निझामाने युनोत नेला होता. त्यास पाकिस्तान व फ्रान्स पाठिंबा देणार होते. तो प्रश्न मोठा होण्याच्या आत सरदार पटेलांच्या आदेशाने जनरल जयंत चौधरीच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने कारवाई केली. हैदराबाद मुक्त नसते झाले तर ते स्वतंत्र राष्टÑ झाले असते व भारताच्या नाभिस्थळात दक्षिण पाकिस्तान निर्माण झाला असता. भारताच्या अंतर्गत संरक्षणासाठी ते कायम वाद व डोकेदुखी होऊन बसले असते. यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम घडला.

=====================================
भाषण:-

मराठवाडा मुक्ति संग्राम दिन


"समोर होता एकच तारा
अन पायतळी अंगार !"



अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसेनानी ,वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....



'स्वप्ने पडली उष:काळाची
हाती मात्र अंध:कार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात'



दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नवते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल?. हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कानड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. जामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे  पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.



'रण  पेटले पेटले रण
अग्निज्वाला सर्वदूर
अंगार मनामनात
झुगारु हा अंकुश'



जनमताचा प्रक्षोभ उसळला . खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.१९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट कोग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या .आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक र्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली अंतर्गत निजाम सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.



'मुक्तीचा आक्रोश आमुचा
स्वातंत्र्य आम्हा पाहिजे
ध्यास एक श्वास एक
हेच आमुचे ध्येय असे'



भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या सगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८   रोजी भारत सरकारने हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली .इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. 17 सप्टेंबर १९४८  ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.

                  संकलन
    जयराज नवनाथराव सोदले
    jayrajsodleblogspot.com

--------–----------------------------------------------------------

Saturday, 16 September 2017

*English उच्चारसाधर्म्य शब्द •●--- Homophones*

1) fair - यात्रा, गोरा,
fare - भाडे

2) week - आठवडा,
wick - बत्ती , काकडा ,
weak - अशक्त

3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी
sell - विकणे
sail - तरंगत जाणे

4) celler - तळघर
seller -विक्रेता

5) once - एकदा
one's - एखाद्याचा

6) sit - बसणे
seat - आसन

7) wet - ओला
weight - वजन
wait - वाट पाहणे

8) test - चाचणी
taste - चव

9) roe - मृगी , हरिणी ( मादी)
row - रांग , ओळ।, वल्हवणे
raw - कच्चा

10) feet - पाऊले
fit - योग्य
feat - पराक्रम , योग्यता

11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप)
throne - सिंहासन

12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप)
hailed - जयजयकार केला

13) career - व्यवसाय
carrier - वाहून नेणे

14) our - आमचा, आमची , आमचे
hour ( अवर) तास

15) bare - उघडा
bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट
bear - अस्वल , सहन करणे

16) road - रस्ता
rod - गज, दांडा
rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)

17)meat - मटण
meet - भेटणे

18)leave - सोडणे
live - राहणे

19)piece - तुकडा
peace - शांतता

20)hail - गारा, अभिवादन
hale - तगडा, स्वस्थ
hell - नरक

21) principle - तत्त्व
principal - प्राचार्य

22) manager - व्यवस्थापक
manger - गव्हाण , गोठा

23) letter - पत्र, अक्षर
later - नंतर

24) dip -बुडविणे, बुडणे
deep - खोल

25) quite - अगदी, जोरदार
quiet - शांत
quiot - लोखंडी कडी

26) deed - कृत्य
did - केले

27) expect - अपेक्षा करणे
aspect - पैलू, स्वरूप

28) feel - वाटणे, स्पर्श करणे
fill - भरणे

29) floor - जमीन
flour- पीठ
flower - फूल

30)waste - रद्दी, वाया गेलेले
waist - कमर , कंबर
west - पश्चिम
vest - बनियन

31) fell - पडणे
fail - नापास

32) story - गोष्ट
storey- मजला

33) slip - घसरणे
sleep - झोपणे

34)in - आत, मध्ये
inn - खानावळ
yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे

35) whole - संपूर्ण
hole - छिद्र
vole - उंदराच्या जातीचा प्राणी

36)hit - टोला मारणे
heat - उष्णता

37) of - चा, ची चे
off - बंद करणे

38) self - स्वत:चा
shelf - मांडणी , फडताळ

39) sheep - मेंढी
ship - जहाज
sheaf - गवताची पेंढी

40) beat - मारणे , पराभूत होणे
bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप)
beet - चुकंदर
a bit - थोडेसे

41) wander - भटकणे
wonder - आश्चर्य

42) rich - श्रीमंत
reach - पोहचणे

43) deed - कृत्य
did - केले

44) so - म्हणून, इतका, तर,
sow - पेरणे
saw - पाहिला, करवत

45) rain - पाऊस
reign - शासन , राज्य
rein - लगाम
wren - रेन पक्षी ( युरोप)

46) lives - राहतो
leaves - पाने, सोडून जातो

47) liver - यकृत
lever - तरफ

48) tent - तंबू
taint - कलंक , दोष

49) wedge - पाचर,
wage -पगार, वेतन, खंड

50 ) neat - व्यवस्थित
nit - लीख
knit - विणणे

51) list - यादी
least - कमीत कमी, किमान

52) horde - भटकी जमात
hoard - साठा करणे ,

53) jealous - मत्सरी
zealous - उत्साही

54) metal - धातू , रूळ
mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती

55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने
too - सुद्धा
two- दोन

56) lip - ओठ
leap - उडी मारणे

57) sun - सूर्य
son - पुत्र, मुलगा

58) pray - प्रार्थना
prey - भक्ष्य

59) dear - आदरणीय, प्रिय
deer - हरिण

60) root - मूळ
route - मार्ग

61)full - पूर्ण भरलेला
fool - मूर्ख

62) sum - रक्कम , बेरीज
some - काही , थोडे

63) lesson - धडा , पाठ
lessen - कमी करणे

64) night - रात्र
knight - सरदार

65) sin - पाप
seen - पाहीले
scene - दृश्य, देखावा

66) gate - फाटक
get - मिळणे, मिळवणे
gait - चाल ( चालण्याची पद्धत)

67) male - पुरूष
mail - टपाल, कवच

68) higher - अधिक उंच
hire - हप्ता , भाड्याने घेणे

69) let - परवानगी देणे
late - उशीर

70) tell - सांगणे
tale - गोष्ट
tail - शेपूट

71) new - नवा
knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप)

72) bore - छिद्र करणे
boar - रानडुक्कर

73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष
voice - आवाज , प्रयोग

74) thirst - तहान
thrust - खुपसणे

75) steel - पोलाद
steal - चोरणे
still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध

76) addition - वाढ, बेरीज
edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप

77) chick - पक्ष्याचे पिल्लू
cheek - गाल

78) it - तो, ती ते
eat - खाणे

79) stationery - लेखन साहित्य
stationary - स्थिर , न हलणारा

80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक,
घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत
teak - सागवाणी लाकूड, साग
tic - स्नायू आखडणे

81) forth - पुढे, बाहेर
fourth - चौथा

82) ear - कान , धान्याचे कणीस
year - वर्ष

83) air - हवा
heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी

84) yes - होय
ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात

85) red - लाल
read - वाचले ( read चे भूतकाळी रूप)
raid - अचानक केलेला हल्ला

86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे
abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे

87) ball - चेंडू
bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे

88) team - संघ
teem - मुसळधार पाऊस कोसळणे

89) check - तपासणे, ताबा, अडथळा
cheque - धनादेश, चेक

90) pen - लेखणी , खुराडे
pain - दु:ख, वेदना
pane - काचेचे तावदान

91) not - नाही
knot - गाठ

92) naughty - खोडकर
knotty - अवघड, गहन

93) miner - खाणकामगार
minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा

94) vacation - सुट्टी
vocation - व्यवसाय

95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख
plain - मैदान, सपाट पृष्ठभाग

96) date - तारीख , खजूर
debt - (डेट) - कर्ज,ॠण

97) wine - दारू, मद्य
vine - द्राक्षांचे वेल

98) site - खुली जागा, स्थळ
sight - दृष्टी

99)mill - चक्की, गिरणी
meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण

100 ) well - विहीर
wail - आक्रोश
wale - चाबकाचा, छडीचा वळ

101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त  दिलेली  मेजवाणी, विवाहोत्सव
   bridle - ब्राईडल - घोड्याचा  लगाम

102) price - प्राईस - किंमत
     prize - प्राईझ - बक्षिस

103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या  टोकाचा  भाग
    tow - टो - साखळीने  ओढणे

104)rest - रेस्ट - आराम
   wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे

105)men - मेन - माणसे
   main - मेन - मुख्य
   mane - मेन - आयाळ, मानेवरील  केस

106) desert - वाळवंट, ओसाड  प्रदेश
    dessert - जेवणानंतरचा  फलाहार, मिष्टान्न

107) counsel - उपदेश, सल्ला
     council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ

108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका
    coarse - जाडेभरडे

109) duel - द्वंद्वयुद्ध
    dual - दुहेरी, संयुक्त

110) bell - बेल, घंटा
    belle  - सुंदर तरूणी
    bale - गठ्ठा
    bail - जामीन, क्रिकेट खेळातील  स्टंपवरील  बेल

111) grin - दात  काढून  हसणे, दात  विचकणे
  green - हिरवा

112) shed - छप्पर
     shade - सावली, छाया

113) illegible - वाचण्यास  अवघड
    eligible - पात्र, लायक

114) canon - चर्चने केलेला  कायदा
    cannon - तोफ (जुन्या  प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे

115) corps - लष्करी  तुकडी
     corpse - प्रेत

116) hart - हार्ट - हरण( नर)
    heart - हार्ट - हृदय
    hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा

117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी
    personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा  कारखान्यातील  कर्मचारी वर्ग

118) fever -  फिव्हर - ताप, ज्वर
    favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव

119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद
    deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान

120)physic - फिझिक - औषध
   physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी

121)umpire - अम्पायर - पंच
    empire - एम्पायर - साम्राज्य

122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी
    voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी

123) am - आहे
    yam - रताळे
   
124) don - सभ्य  गृहस्थ
    dawn - पहाट

125) role - रोल - भूमिका
    roll  - रोल - गुंडाळणे

126) pip - पिप - संत्री मौसंबी  सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची  ठिपका, फाशांवरील  ठिपका
  peep - पीप - डोकावून  पाहणे

127) nice - नाईस - छान
    niece - नीस - भाची , पुतणी

128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील  केस
    fir - फर - देवदार  वृक्ष

129) hill - हिल - टेकडी
    heel - हील -  टाच
    heal - हील - जखम  भरून  आणणे, रोगमुक्त करणे

130) be - बी  - असणे , होणे, घडणे
    bee - बी - मधमाशी

131) eight - एट - आठ
    ate - एट- खाल्ले ( eat चे  भूतकाळी रूप)
    yet - येट - अद्यापपर्यंत

132) each - ईच - प्रत्येक
     itch - इच - खाज, खरूज
     etch - एच - कोरणे

133) fist - फिस्ट - मूठ
    feast - फीस्ट - मेजवाणी

134) pull - पुल - ओढणे, खेचणे
    pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह

135) sick - सिक - आजारी
     seek - सीक - शोधणे, सापडविणे
 

136) which - विच - कोणता?  कोणती?  कोणते?
    witch - विच - चेटकीण, जादुगारीण

137) met - मेट - भेटला
     mate - मेट - मित्र, सोबती, मात  करणे

138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज
    deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे

139) skim - स्किम - मलम  लावणे,*English उच्चारसाधर्म्य शब्द •●--- Homophones*

1) fair - यात्रा, गोरा,
fare - भाडे

2) week - आठवडा,
wick - बत्ती , काकडा ,
weak - अशक्त

3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी
sell - विकणे
sail - तरंगत जाणे

4) celler - तळघर
seller -विक्रेता

5) once - एकदा
one's - एखाद्याचा

6) sit - बसणे
seat - आसन

7) wet - ओला
weight - वजन
wait - वाट पाहणे

8) test - चाचणी
taste - चव

9) roe - मृगी , हरिणी ( मादी)
row - रांग , ओळ।, वल्हवणे
raw - कच्चा

10) feet - पाऊले
fit - योग्य
feat - पराक्रम , योग्यता

11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप)
throne - सिंहासन

12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप)
hailed - जयजयकार केला

13) career - व्यवसाय
carrier - वाहून नेणे

14) our - आमचा, आमची , आमचे
hour ( अवर) तास

15) bare - उघडा
bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट
bear - अस्वल , सहन करणे

16) road - रस्ता
rod - गज, दांडा
rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)

17)meat - मटण
meet - भेटणे

18)leave - सोडणे
live - राहणे

19)piece - तुकडा
peace - शांतता

20)hail - गारा, अभिवादन
hale - तगडा, स्वस्थ
hell - नरक

21) principle - तत्त्व
principal - प्राचार्य

22) manager - व्यवस्थापक
manger - गव्हाण , गोठा

23) letter - पत्र, अक्षर
later - नंतर

24) dip -बुडविणे, बुडणे
deep - खोल

25) quite - अगदी, जोरदार
quiet - शांत
quiot - लोखंडी कडी

26) deed - कृत्य
did - केले

27) expect - अपेक्षा करणे
aspect - पैलू, स्वरूप

28) feel - वाटणे, स्पर्श करणे
fill - भरणे

29) floor - जमीन
flour- पीठ
flower - फूल

30)waste - रद्दी, वाया गेलेले
waist - कमर , कंबर
west - पश्चिम
vest - बनियन

31) fell - पडणे
fail - नापास

32) story - गोष्ट
storey- मजला

33) slip - घसरणे
sleep - झोपणे

34)in - आत, मध्ये
inn - खानावळ
yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे

35) whole - संपूर्ण
hole - छिद्र
vole - उंदराच्या जातीचा प्राणी

36)hit - टोला मारणे
heat - उष्णता

37) of - चा, ची चे
off - बंद करणे

38) self - स्वत:चा
shelf - मांडणी , फडताळ

39) sheep - मेंढी
ship - जहाज
sheaf - गवताची पेंढी

40) beat - मारणे , पराभूत होणे
bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप)
beet - चुकंदर
a bit - थोडेसे

41) wander - भटकणे
wonder - आश्चर्य

42) rich - श्रीमंत
reach - पोहचणे

43) deed - कृत्य
did - केले

44) so - म्हणून, इतका, तर,
sow - पेरणे
saw - पाहिला, करवत

45) rain - पाऊस
reign - शासन , राज्य
rein - लगाम
wren - रेन पक्षी ( युरोप)

46) lives - राहतो
leaves - पाने, सोडून जातो

47) liver - यकृत
lever - तरफ

48) tent - तंबू
taint - कलंक , दोष

49) wedge - पाचर,
wage -पगार, वेतन, खंड

50 ) neat - व्यवस्थित
nit - लीख
knit - विणणे

51) list - यादी
least - कमीत कमी, किमान

52) horde - भटकी जमात
hoard - साठा करणे ,

53) jealous - मत्सरी
zealous - उत्साही

54) metal - धातू , रूळ
mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती

55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने
too - सुद्धा
two- दोन

56) lip - ओठ
leap - उडी मारणे

57) sun - सूर्य
son - पुत्र, मुलगा

58) pray - प्रार्थना
prey - भक्ष्य

59) dear - आदरणीय, प्रिय
deer - हरिण

60) root - मूळ
route - मार्ग

61)full - पूर्ण भरलेला
fool - मूर्ख

62) sum - रक्कम , बेरीज
some - काही , थोडे

63) lesson - धडा , पाठ
lessen - कमी करणे

64) night - रात्र
knight - सरदार

65) sin - पाप
seen - पाहीले
scene - दृश्य, देखावा

66) gate - फाटक
get - मिळणे, मिळवणे
gait - चाल ( चालण्याची पद्धत)

67) male - पुरूष
mail - टपाल, कवच

68) higher - अधिक उंच
hire - हप्ता , भाड्याने घेणे

69) let - परवानगी देणे
late - उशीर

70) tell - सांगणे
tale - गोष्ट
tail - शेपूट

71) new - नवा
knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप)

72) bore - छिद्र करणे
boar - रानडुक्कर

73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष
voice - आवाज , प्रयोग

74) thirst - तहान
thrust - खुपसणे

75) steel - पोलाद
steal - चोरणे
still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध

76) addition - वाढ, बेरीज
edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप

77) chick - पक्ष्याचे पिल्लू
cheek - गाल

78) it - तो, ती ते
eat - खाणे

79) stationery - लेखन साहित्य
stationary - स्थिर , न हलणारा

80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक,
घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत
teak - सागवाणी लाकूड, साग
tic - स्नायू आखडणे

81) forth - पुढे, बाहेर
fourth - चौथा

82) ear - कान , धान्याचे कणीस
year - वर्ष

83) air - हवा
heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी

84) yes - होय
ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात

85) red - लाल
read - वाचले ( read चे भूतकाळी रूप)
raid - अचानक केलेला हल्ला

86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे
abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे

87) ball - चेंडू
bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे

88) team - संघ
teem - मुसळधार पाऊस कोसळणे

89) check - तपासणे, ताबा, अडथळा
cheque - धनादेश, चेक

90) pen - लेखणी , खुराडे
pain - दु:ख, वेदना
pane - काचेचे तावदान

91) not - नाही
knot - गाठ

92) naughty - खोडकर
knotty - अवघड, गहन

93) miner - खाणकामगार
minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा

94) vacation - सुट्टी
vocation - व्यवसाय

95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख
plain - मैदान, सपाट पृष्ठभाग

96) date - तारीख , खजूर
debt - (डेट) - कर्ज,ॠण

97) wine - दारू, मद्य
vine - द्राक्षांचे वेल

98) site - खुली जागा, स्थळ
sight - दृष्टी

99)mill - चक्की, गिरणी
meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण

100 ) well - विहीर
wail - आक्रोश
wale - चाबकाचा, छडीचा वळ

101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त  दिलेली  मेजवाणी, विवाहोत्सव
   bridle - ब्राईडल - घोड्याचा  लगाम

102) price - प्राईस - किंमत
     prize - प्राईझ - बक्षिस

103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या  टोकाचा  भाग
    tow - टो - साखळीने  ओढणे

104)rest - रेस्ट - आराम
   wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे

105)men - मेन - माणसे
   main - मेन - मुख्य
   mane - मेन - आयाळ, मानेवरील  केस

106) desert - वाळवंट, ओसाड  प्रदेश
    dessert - जेवणानंतरचा  फलाहार, मिष्टान्न

107) counsel - उपदेश, सल्ला
     council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ

108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका
    coarse - जाडेभरडे

109) duel - द्वंद्वयुद्ध
    dual - दुहेरी, संयुक्त

110) bell - बेल, घंटा
    belle  - सुंदर तरूणी
    bale - गठ्ठा
    bail - जामीन, क्रिकेट खेळातील  स्टंपवरील  बेल

111) grin - दात  काढून  हसणे, दात  विचकणे
  green - हिरवा

112) shed - छप्पर
     shade - सावली, छाया

113) illegible - वाचण्यास  अवघड
    eligible - पात्र, लायक

114) canon - चर्चने केलेला  कायदा
    cannon - तोफ (जुन्या  प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे

115) corps - लष्करी  तुकडी
     corpse - प्रेत

116) hart - हार्ट - हरण( नर)
    heart - हार्ट - हृदय
    hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा

117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी
    personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा  कारखान्यातील  कर्मचारी वर्ग

118) fever -  फिव्हर - ताप, ज्वर
    favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव

119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद
    deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान

120)physic - फिझिक - औषध
   physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी

121)umpire - अम्पायर - पंच
    empire - एम्पायर - साम्राज्य

122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी
    voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी

123) am - आहे
    yam - रताळे
   
124) don - सभ्य  गृहस्थ
    dawn - पहाट

125) role - रोल - भूमिका
    roll  - रोल - गुंडाळणे

126) pip - पिप - संत्री मौसंबी  सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची  ठिपका, फाशांवरील  ठिपका
  peep - पीप - डोकावून  पाहणे

127) nice - नाईस - छान
    niece - नीस - भाची , पुतणी

128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील  केस
    fir - फर - देवदार  वृक्ष

129) hill - हिल - टेकडी
    heel - हील -  टाच
    heal - हील - जखम  भरून  आणणे, रोगमुक्त करणे

130) be - बी  - असणे , होणे, घडणे
    bee - बी - मधमाशी

131) eight - एट - आठ
    ate - एट- खाल्ले ( eat चे  भूतकाळी रूप)
    yet - येट - अद्यापपर्यंत

132) each - ईच - प्रत्येक
     itch - इच - खाज, खरूज
     etch - एच - कोरणे

133) fist - फिस्ट - मूठ
    feast - फीस्ट - मेजवाणी

134) pull - पुल - ओढणे, खेचणे
    pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह

135) sick - सिक - आजारी
     seek - सीक - शोधणे, सापडविणे
 

136) which - विच - कोणता?  कोणती?  कोणते?
    witch - विच - चेटकीण, जादुगारीण

137) met - मेट - भेटला
     mate - मेट - मित्र, सोबती, मात  करणे

138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज
    deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे

139) skim - स्किम - मलम  लावणे,