प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, 21 April 2017



🌞* *llश्रीll*🌞
                  दि. 8/4/2017

*II एक अविस्मरणीय गट शिक्षणाधिकारी II*
🌹🌹* *मा तृप्ती अंधारे*🌹🌹
            *पं स लातूर*
          ता.जि.लातूर
मी *श्री सोनाजी काशिराम भंडारे*
मुख्याध्यापक जि. प . कें . प्रा . शा . नांदगाव ता . जि . लातूर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मला एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याविषयी काहीतरी लिहावे आसे विचार माझ्या मनात आले . हे मी माझे भाग्य समजतो  .
    एका महान विभूतीविषयी लिखान करण्या एवढा मी लायक नाही . पण मनात विचार आला . आणि मी लिखानास बसलो .
माझ्या लिखानात शब्दात जर चुक झाली तर आपण मोठ्या मनाने मला क्षमा कराल आशी अपेक्षा करतो .👏
  माझी सेवा 32 वर्ष झाली . मुअ म्हणून संस्थेमध्ये 2 वर्ष . आणि जिप मध्ये 25 वर्ष मुअ आसे 27 वर्ष मुअ म्हणून काम करत असताना अनेक अधिकारी , कर्मचारी .पालक . माझे दैवत 🌹🌹🌹🌹🌹 फुला सारखे माझे .विद्यार्थी , मित्रमंडळ यांचा सतत संपर्क येत गेला  . मला प्रत्येक अधिकारी यानी जवळ केलं , कौतूक पण केलं .
      मी मुअ या नात्यान  प्रथम माझ्या शिक्षकांशी प्रिय असणं अवश्यक आहे .नंतर विद्यार्थी प्रिय .नंतर पालक प्रिय .नंतर तरुण मित्र मंडळ प्रिय .नंतर अधिकारी प्रिय असावं . अस मला वाटत , मी तसा प्रयत्न करत आहे .
   मी सन 2012 मध्ये लातूर तालुक्यामध्ये आलो . हां हां म्हणता 2 वर्ष गेली .2014 मध्ये एका नविन महिला गट शिक्षणाधिकारी पं सलातूरला येत आहेत असं समजलं. त्यांचे नाव मा तृप्ती अंधारे ....
     नाव ऐकलं आणि त्यांच्या मागील जिल्हाच्या कामाचा इतिहास कानावर येऊ लागला . तेव्हापासून मनामध्ये
एक आनंदाचे वारे वाहू लागले .
     मा तृप्ती अंधारे मॅम पंस लातूर येथे उपस्थित झाल्या  , आणि त्यांच्या कामाचा व त्यांचा  थोडा थोडा परिचय होत गेला. मला एक म्हण आठवू लागली . ( बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ) कारण मॅम मध्ये कामाची एक वेगळी धमक . उर्जा दिसून आली , मी माझ्या शाळेत
म्हणालो सुद्धा मॅम खुप वेगळ्या आहेत , म्हणूनच अविस्मरणीय गट शिक्षणाधिकारी हे शिर्षक दिले  आहे .
 मी कें मुअ असल्यामुळे सतत संपर्कात होतो . त्यांची इच्छा प्रत्येक कर्मचारी ओळख झाली पाहिजे हीच तळमळ . तरी पण त्या स्वतः होऊन म्हणाल्या  ,, भारती सर आणि भंडारे सर कोणते आहेत हो ,, मला थोडस कन्फर्म होत नाही.   कारण नाव काळू  बाळू सारखे आहे .
          लातूर नगरी मध्ये मॅमचे स्वागत झाले.पं स चा पदभार स्वीकारला आणि एका वेगळ्या ऊमेदीने , जोमाने कामाला लागल्या , त्यात त्यानी फक्त फक्त विद्यार्थी हित पाहिले .
     हे इश्वरास कळले , आणि मग परमेश्वराने मॅमचा दिल्ली येथे मा श्रीम स्मृती इराणी
शिक्षण मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते , त्यांच्या कामाचा गौरव करुन स्वत : मैमना उर्जा निर्मिती केंद्र बनवल .
   मोफत शिक्षण कायदयाचा अभ्यास करून काटेकोर पणे अमलबजावणी करणे  .
   तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्
याचा पूर्ण अभ्यास करून त्यानी पुढिल कामास सुरुवात केली .
     1) प्रथम व्यक्ति ओळख २ ) कर्मचारी ओळख
3 ) त्यांचे कामाची पध्दत
 4 ) सर्वाना घेऊन नियोजन 5) कामकरून घेण्याचेकौशल्य
6 ) चांगल्या . 'कामाचे तंतोतंत मूल्यमापन
7 ) मानसन्मान देणे
8 ) तोंडभरून कौतूक करणे 9 )कृतीला वाव देणे
10 ) कामाचे अचूक नियोजन 11 ) ध्येय ठरवणे
12 ) उदिष्ठ ठरवणे
13) वेळेला महत्व देणे
14 ) कार्यात किती वेळ गेला हे न  बघणे
15 ) चोविस तासातले कमीत कमी दोन तास , आणि जास्तीत जास्त चार तास झोपणे ,
  16) शिक्षक बंधु भगिनिना नावाने ओळखणे
 17) प्रतेक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणे
18) आढावा घेणे , पाठपुरावा करणे, उर्जा देणे,
19) ज्ञानाचा खजिना शिक्षकापुढे ठेवणे
20 ) विविध उपक्रम राबवणे
    उदा - कॉफी विथ क्रियेटर, कन्या सुरक्षाकवच , फन अॅन्डलर्न , शिक्षण परिषद , प्रेरणा सभा , बालसभा ज्ञानरचनावादी अध्यापन , पानफुल सजावट , अपूर्व विज्ञान मेळावा , smc सदस्य प्रशिक्षण अभ्यास दौरा .. कुमठे बीट भेट , महान व्यक्तीचे व्याख्यान मार्गदशन , पहिली फोकस , डीजिटल शाळा , रंगरगोटी , तंञ स्नेही शिक्षकप्रशिक्षण,  एक मार्चपहिली प्रवेश , मार्च ते एप्रिल नियोजन पूर्वक अध्यापन ,
    100% शाळा प्रगत करणे,  तंबाखू मुक्त शाळा , स्नेह संमेलन , दररोज विज्ञान प्रयोग . शैक्षणिक साहित्य निमिर्ती , अध्यापनात वापर .असे अनेक भन्नाट उपक्रम राबवून
   मुल टिकलं पाहिजे , मुल शिकलं पाहिजे . मुल100% प्रगत झालं पाहिजे , ही मनाशी खूणगाठ बांधून . ध्येय गाठण्यासाठी  आहोराञ झटणारे  , जेवणाकडे दुर्लक्ष करणारे , गरिब मुलांचे कल्याण करणारे  , गटशिक्षणाधिकारी कोण ?
:
:
:
    🌹🌹 *मा आदरणीय तृप्ती अंधारे*🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
  लातूर तालुक्यातील एकशे चौसष्ठ शाळेला भेट देणारे
ग शिअ कोण ?
तृप्ती मॅम
मुलामध्ये जमिनीवर बसुन मुलाना कुरवाळणारे
ग शिअ कोण ?
   तृप्ती मॅम
शिक्षक बंधु भगिनिंना , मुलाना आपलसं वाटणारे
ग शिअ कोण ?
मा तृप्ती मॅम
मुलांना काखेत घेणारे
ग शि अ कोण?
    मा तृप्ती मॅम
चटनी , भाकरी शिक्षका सोबत शाळेत खाणारे
ग शिअ कोण ?
   मा तृप्ती मॅम
विद्यार्थासाठी २४ तास मोबाईलवर उपलब्ध असणारे  ग शिअ कोण ?
  मा तृप्ती मॅम
  मानपान सत्कार नको म्हणणारे ग शिअ कोण ?
  मा तृप्ती मॅम
शिक्षकाचे एकही काम प्रलंबित न ठेवणारे
ग शिअ कोण कोण .. कोण ?

👏👏🌹🌹
*मा.तृप्ती मॅम*
👏👏🌹🌹

मॅम,
नौकरीच्या शेवटी तुमच्यासारख्या परमेश्वरी आवताराच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली
   मी भाग्यवान आहे .
चांगले कर्म . चांगले व्यक्ती , चांगले मार्गदर्शन , चांगले सोबती , चांगले संस्कार , चांगले,मार्गदर्शक , आई वडिलांच्या पोटी चांगली मुल मिळणं
  हे भाग्य असतं.
🌹 मॅम माझच भाग्य नाही , तर लातूर तालुक्यातील एकशे चौसष्ट शाळेतील सर्व विद्यार्थी . शिक्षक , पालक यांचे भाग्य आहे मॅम
   मॅम मी परवा एक पोष्ट टाकली आहे ,
     ती म्हणजे आपण आमच्या शाळेत  लावलेल रोपटं
वृक्षात रूपांतर होत आहे त्याचे काही दिवसानी वटवृक्षात रूपांतर  होईल.
ही एक अविस्मरणीय आठवण  आहे .
    👏👏🌹🌹
 तसेच मॅम आपण ज्या शाळेवर जाल तेथिल सर्व बाबींचे मुल्यमापन करून परत येता , तेव्हा शिक्षक म्हणतात मॅम नी उर्जा दिली
दिलेली उर्जा पुरत नाही . हे तुम्हाला माहिती आहे म्हणूनच आपण स्वतः उर्जा निमिर्ती केंद्र असल्यामुळे आपण
   त्या त्या शाळेवर छोटासा  कधीही  न संपणारा ऊर्जेचा डेपो बसवत अहात .
आम्ही त्याचा सतत उपयोग करू आपले गरिबांच्या मुलांना शिकवण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू ,
    मॅम तुम्ही तुमच्या कार्यकाळात 164 शाळेमध्ये गुणवान , बुद्धीमान , तंञज्ञान सक्षम  बनण्याचे विद्यार्थी रोपटे लावलात .
   येत्या दहा वर्षात विद्यार्था रोपट्याचे वृटवृक्ष झाल्या शिवाय रहाणार नाही ,
 बरेच विद्यार्थी सुपर क्लास वन पदावर असतील मॅम,
  हाच आपल्या कार्याचा वटवृक्ष होऊन
आपण एक अविस्मरणीय गट शिक्षणाधिकारी म्हणून आमच्या , विधार्थाच्या , पालकाच्या स्मरणात असाल यात शंका नाही ,
   आताच्या मुलाना आपला कायमचा मो नं द्यावा दहा वर्षानी मुले आपनास फोन करुन सांगतील, मॅम मी या पदावर आहे ,
मॅम आपली सेवा खुप आहे . आपण याहीपेक्षा मोठ्या पदावर जाल , नक्कीच आपले नाव कमवलात त्यात भर नक्कीच पडणार
या कार्याला , बुद्धीला , आविष्काराला  ईश्वर बळ देवो
हीच सदिच्छा
    माझा मानाचा मुजरा स्वीकारावा👏👏👏👏👏👏👏👏👏

लेखनी थांबत नाही , मी थांबवतो ,
      आपला अज्ञाधारक शिक्षक
* *श्री सोनाजी काशिराम भंडारे*
              मु अ
जि. प .केंप्राशा नांदगाव
        ता जि  लातूर
            महाराष्ट्र
👏👏👏👏👏👏👏👏🌹🌹

No comments:

Post a Comment