प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 27 April 2017

जागतिक महिला दिनानिमित्त...
स्त्री जन्मा तुझी कहाणी...
तू होऊ नकोस सीता त्या रामाची
लोक तुला अबला म्हणतील...
तू होऊ नकोस द्रौपदी त्या पांडवांची
लोक तुझे वस्त्रहरण करतील...
तू होऊ नकोस अहल्या त्या ऋषी गौतमाची
लोक तुझा दगड करतील...
तू होऊ नकोस होलिका त्या प्रल्हादाची
लोक तुझी होळी करतील...
.
तू हो यशोधरा त्या तथागताची
लोक तुझा "आदर्श" ठेवतील...
तू हो जिजाऊ त्या शिवबाची
लोक तुला "राजमाता" म्हणतील...
तू हो अहिल्या त्या होळकरांची
जन तुला "लोकमाता" म्हणतील...
तू हो सावित्री त्या ज्योतिबाची
जन तुला "क्रांतिज्योती" म्हणतील...
तू हो माता त्या पिडितांची
लोक तुला "माता रमाई" म्हणतील...
💐जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐

No comments:

Post a Comment