प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 27 April 2017

बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनक्रम
"महामानवास विनम्र अभिवादन."
- (जयराज सॊदलॆ)
१.
१४ एप्रिल इ.स.१८९१
*मध्यप्रदेशातील 'महू' गावी जन्म.*
२.
इ.स.१८९६
*आई, भिमाईचे निधन*
३.
७ नोव्हेंबर इ.स.१९००
*साताऱ्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) प्रवेश.*
४.
नोव्हेंबर इ.स.१९०४
*इयत्ता ४ थी उतीर्ण.*
डिसेंबर इ.स. १९०४
*एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश*
५.
एप्रिल इ.स.१९०६
*९ वर्षीय रमाबाई यांच्याशी विवाह.*
६.
इ.स.१९०७
*मॅट्रिक परीक्षा, ७५० पैकी ३८२ गुणांनी पास केली. (तेव्हाचे हे प्रचंड गुण होते) केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" हे पुस्तक भेट.*
७.
३ जानेवारी इ.स.१९०८
*एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेश*
इ.स. १९०८
*‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत*
८.
८ एप्रिल इ.स.१९०८
*रमाबाईंशी विवाह.*
९.
१२ डिसेंबर इ.स.१९१२
*मुलगा यशवंत यांचा जन्म झाला.*
१०.
जानेवारी इ.स.१९१३
*बी.ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. (पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)*
२ फेब्रुवारी इ.स. १९१३
*वडील रामजी आंबेडकर यांचे निधन*
११.
एप्रिल इ.स.१९१३
*बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांची निवड केली*
२० जुलै इ.स. १९१३
*न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश*
इ.स. १९१४
*अमेरीकेत लाला लजपतराय यांचेशी भेट*
१२.
२ जून इ.स.१९१५
*“प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय*
१३.
जून इ.स.१९१६
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया –अ हिस्टॉरिकल अँन्ड ॲनॅलिटिकल स्टडी “ हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठ ने स्वीकारून पीएच.डी. पदवी प्रदान केली व पुढे ते लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.*
९ मे इ.स. १९१९
*प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये कास्ट इन इंडिया हा वैचारिक प्रबंध वाचला*
१४.
ऑक्टोबर इ.स.१९१६
*अर्थशास्त्रच्या अभ्यासासाठी डॉ. आंबेडकरांना “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स” या संस्थेत प्रवेश मिळाला.*
११ नोव्हेंबर इ.स. १९१६
*कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश.*
१५.
जून इ.स.१९१७
*लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.*
१६.
सप्टेंबर इ.स.१९१७
*बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार त्या राज्याची सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले.*
१७.
इ.स.१९१८
*साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष*
१८.
१० नोव्हेंबर इ.स.१९१८
*मुंबईतील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).*
१६ जानेवारी इ.स. १९१९
*‘महार’ या टोपन नावाने दि टाईम्स ऑफ इंडिया मध्ये लिखान, “स्वराज्य जेवढा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध हक्क आहे तेवढाच दलितांचा ही आहे”*
१९.
३१ जानेवारी इ.स. १९२०
*साप्ताहिक मूकनायक सुरू केले*
२०.
मार्च २१ इ.स.१९२०
*माणगाव, कोल्हापूर राज्य येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण*
२१.
मे इ.स.१९२०
*शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले.*
५ जुलै इ.स. १९२०
*उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण*
इ.स. १९२०
*बर्टाड रसेल यांनी “प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन” या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले.*
एप्रिल १९२१
*“भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व” या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.*
२२.
जून इ.स.१९२१
*लंडन विद्यापीठाने त्यांना “प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया” या प्रबंधाला एम.एस्सी. (अर्थशास्त्र) ही पदवी प्रदान केली.*
एप्रिल इ.स. १९२२
*उच्च शिक्षणासाठी जर्मनीतीलबॉन विद्यापीठामध्ये गेले.*
२८ जून इ.स. १९२२
*ग्रेज इन विद्यापीठाने बार-ॲट-लॉ (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली.*
२३.
ऑक्टोंबर इ.स.१९२२
*लंडन विद्यापीठात “दी प्रोब्लेम ऑफ रुपी” हा डी.एससी प्रबंध सादर केला .*
२४.
एप्रिल इ.स.१९२३
*जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले.*
२५.
ऑगस्ट ४ इ.स.१९२३
*बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस. के.बोले यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.*
नोव्हेंबर इ.स. १९२३
*लंडन विद्यापीठाने डी.एससी. प्रदान केली.*
२६.
जुलै २० इ.स.१९२४
*मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.*
४ जानेवारी इ.स. १९२५
*उच्च शाळांत शिकणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापुरमध्ये वसतिगृह सुरु केले.*
१५ डिसेंबर इ.स. १९२५
*हिल्ट यंग च्या अध्यक्षेसाठी आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.*
डिसेंबर इ.स. १९२५
२७.
जानेवारी इ.स.१९२७
*मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली.*
१ जानेवारी इ.स. १९२७
*भिमा कोरेगांवच्या विजय स्तंभाला भेट दिली. महार सैनिकांना वंदन केले.*
२८.
२० मार्च इ.स.१९२७
*महाड सत्याग्रह*
२९.
एप्रिल ३ इ.स.१९२७
*बहिष्कृत भारत नावाचे मराठी पाक्षिक सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली.*
३ मे इ.स. १९२७
*कल्याण जवळील बदलापुर गावांत*
३०.
ऑगस्ट ४ इ.स.१९२७
*महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.*
३१.
सप्टेंबर इ.स.१९२७
*समाज समता संघ स्थापन केला.*
३२.
ऑगस्ट इ.स.१९२८
*बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.*
३३.
३ मार्च इ.स. १९३०
*नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.*
३४.
१७ ते २१ नोव्हेंबर
इ.स.१९३०
*लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.*
३५
ऑगस्ट १४ इ.स.१९३१
*मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.*
३६.
२० ऑगस्ट इ.स.१९३२
*भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.*
३७.
२४ सप्टेंबर इ.स.१९३२
*पुणे करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली.*
३८.
इ.स.१९३४
*परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.*
३९.
मे २६ इ.स.१९३५
*रमाई यांचे निधन*
४०.
जून १ इ.स.१९३५
*डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.*
४१
ऑक्टोबर १३ इ.स.१९३५
*येवला, येथे धर्मांतराची घोषणा*
४२
ऑगस्ट इ.स.१९३६
*“स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.*
४३
मार्च १८ इ.स.१९३७
*मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या,दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.*
४४
डिसेंबर इ.स.१९४०
*थॉट्स आॅन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध*
४५
जुलै १८ इ.स.१९४२
*आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूर येथे स्थापना.*
४६
जुलै २० इ.स.१९४२
*व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडलावर मजूर खात्याच्या मंत्री म्हणून नेमणूक.*
४७
जून इ.स.१९४५
*“व्हॉट काँग्रेस ॲन्ड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन*
४८
जून २० इ.स.१९४५
*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.*
४९
ऑक्टोबर इ.स.१९४६
*“हू वेअर दी शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ.आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.*
५०
ऑगस्ट २९ इ.स.१९४७
*स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती*
५१
फेब्रुवारी इ.स.१९४८
*घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.*
५२
एप्रिल १५इ.स.१९४८
*डॉ.शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह.*
५३
नोव्हेंबर ४इ.स.१९४८
*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.*
५४
सप्टेंबर १ इ.स.१९५०
*मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली.*
५५
फेब्रुवारी ५ इ.स.१९५१
*भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले.*
५६
जुलै इ.स.१९५१
*भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना*
५७
सप्टेंबर २७ इ.स.१९५१
*मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.*
५८
जून ५ इ.स.१९५२
*कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ(एल एल डी) ही पदवी प्रदान केली.*
५९
जानेवारी १२ इ.स.१९५३
*हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर(डी.लिट) ही पदवी प्रदान केली .*
६०
डिसेंबर इ.स.१९५४
*ब्रम्हदेशातील रंगून येथे भरलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभाग.*
६१
मे इ.स.१९५६
*बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरु केले*
६२
जून इ.स.१९५६
*पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरु केले.*
६३
ऑक्टोबर १४ इ.स.१९५६
*नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा;बौद्ध धम्म स्विकार केला.*
६४
ऑक्टोबर १५ इ.स.१९५६
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली.*
६५
नोव्हेंबर इ.स.१९५६
*नेपाल येथील काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला.तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.*
६६
डिसेंबर ६ इ.स.१९५६






No comments:

Post a Comment