💎 🕉 *श्री महात्मा बसवेश्वर* 🕉 💎
🦋 *"विश्वगुरु महामानव थोर समाजसुधारक श्री महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन"* 🦋
*-जयराज सोदले*
_स.शि.जि.प.प्रा.शाळा,बोथी_
_ता.चाकूर जि.लातूर_
[साभार:-विकीपिडीया]
🌷 *अन्य नावे:* बसवा, बसवण्णा,
🌷 *कन्नड:* ಬಸವೇಶ್ವರ
🌷 *आई:* मादलांबिका
🌷 *वडील:* मादीराज
🌷 *जन्म :२५/०४/ ११०५
🌷 *जन्मगाव:* कम्मेकुळ,तालुका बागेवाडी,जिल्हा विजापूर,कर्नाटक
🌷 *मृत्यू :११६७
🌷 *समाधी:* _कुडलसंगम जिल्हा बागलकोट,कर्नाटक_
_हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ किंवा वीरशैव धर्म किंवा शिवाद्वैत या नावांनी ओळखले जाते._
_इसवी सनाच्या बाराव्या शतकात अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्वधर्मसमानता, यासारखे क्रांतिकारक विचार मांडले. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीला आणि त्यातून जन्मलेल्या जाती पद्धतीला त्यांनी कायम विरोध केला. *"कायकवे कैलास" म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे* हा विचार त्यांनी मांडला. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किँवा कनिष्ठ नाही असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यानी लिँगायत धर्माची स्थापना केली._
🌹 *महात्मा बसवेश्वर :-* ➡
_समाजसुधारक.बसवण्णा यांचा जन्म म्हैसूर (आजचा कर्नाटक) राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडी या तालुक्यात कम्मेकुळ या गावात, वैशाख शुद्ध तृतीया इ.स. ११०५ रोजी झाला. त्यांचे वडील मादीराज आणि माता मादलांबिका._
_बसवण्णांनी कुडलसंगम येथे वास्तव्य केले. कुडलसंगम हे *मलप्रभा व कृष्णा नदीच्या* संगमावर बसलेले विजापुर जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. बसवण्णांनी समाजातील वाईट चालीरीतींना शह देण्याचा सम्यक विचार केला आणि येथूनच त्यांच्या सामाजिक आंदोलनास सुरुवात झाली. पुढे कामाच्या शोधार्थ बसवण्णा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आले. मंगळवेढा येथे बसवण्णांनी सामाजिक चळवळ आरंभ केली. ही चळवळ धार्मिक कर्म कांडाविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध होती. त्यांच्या परिवर्तनवादी विचारसरणीने बसवण्णा समाजात लोकप्रिय झाले. वैदिक धर्म नाकारून बसवण्णांनी लिंगायत पंथ स्थापन केला._
🌹 *जगातील पहिल्या लोकशाही संसदेची स्थापना :-* ➡
_बसवण्णांनी मंगळवेढा येथे "जगातील पहिली लोकशाही संसद म्हणजेच ' *अनुभव मंटपाची*' स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली._
🌹 *लिंगायत धर्म संस्थापक युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर* ➡
_वेदशास्त्र, होम-हवन, मूर्तिपूजा नाकारून बसवण्णांनी ' *लिंगायत धर्म'* स्थापन केला. आपण सर्व एकच आहोत हे सांगताना बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात (वचन कन्नड भाषेत) : -_
_"इवनारव, इवनारव, इवनारवनेंदनिसदिरयया इस नम्मव,
इव नम्मव, नम्मवनेंदनिसयया, कुडलसंगमदेवा, निम्म मनेय मगनैदानिय्या."_
वरील वचन मराठीत :-
हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे नच म्हणवावे;
हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा ऐसेचि वदवावे.
कुडलसंगमदेवा, तुमचा घरचा पुत्र म्हणवावे.
*'वेद शास्त्र धर्म जे काही सांगतील मी त्यांना मानणार नाही.*' आपल्या वचनात बसवण्णा म्हणतात,
"वेदक्के ओरेय कट्टवे,शास्त्रक्के निगळवनिक्कु वे,
तर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा,
महादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या."
वचन मराठीत :-
वेदावर खडग प्रहार करेन
शास्त्राला बेड्या लावीन
तर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढेन
आगमशास्त्राचे नाक कापेन
मातंग चेन्नयाचा प्रिय आहे मी,
कुडलसंगमदेवा.
_*मंदिर म्हणजे बहुजनाचे अंधश्रद्धा व भोळी मनोवृत्तीचे केंद्र आहे. म्हणून बसवण्णांनी आपल्या अनुयायांना मंदिर न बांधण्याचा आदेश दिला आहे. आपल्या देहालाच देवालय माना. देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ आहे.अशी शुद्ध विचारसरणी बसवण्णांची होती.*_
🌹 *चातुर्वर्ण्य* ➡
_वर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात,_
_चांभार उत्तम तो दुर्वास_
_कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी_
_तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती_
_जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार._
भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,
*दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे।*
*पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची।*
*पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे।*
*साधन पूजेचे काय सांगा ?*
दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ? अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत. वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे.
बसवण्णा एका वचनात म्हणतात : -
दगडाचा देव देव नव्हे।
मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे।
सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा।
देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी।
हे कुडलसंगमदेवा।।
_आज परिस्थिति अशी आहे की लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णांची शिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही. लिंगातत हे पूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. लिंगायत राशीभविष्य पाहतात तेही ब्राह्मणाकडून; लग्नाचे मुहूर्त ब्राह्मणाकडून काढून घेतात; त्यांचे लग्न व अन्य धार्मिक संस्कार ब्राह्मणच करतात. लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे.. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले. लिंगायत हे कर्मकांड, देव, व्रतवैकल्य, भविष्यवाणी, यज्ञ, अंधश्रद्धा, आत्मा अशा चाकोरीत गुंतलेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटते की ते ब्राह्मण आहेत. असाच प्रचार व प्रसार करून ब्राह्मणवादी लोक यशस्वी झाले आणि लिंगायतांना ब्राह्मणी धर्माच्या अधीन बनवले. संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य ही थोतांडे नाकारली आणि *7⃣7⃣0⃣* परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली._
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⛳ *लिंगायत धर्म* ⛳
लिंगायत किंवा वीरशैव हा हिंदू धर्मातील १२व्या शतकात *बसवेश्वर* यांनी स्थापित केलेला एक *शैव पंथ* आहे. या पंथातील काही तत्त्वे मूळ हिंदू धर्माच्या तत्त्वांपेक्षा वेगळी आहेत. या पंथाचे लोक *शिव हा एकाच देव मानतात,* आणि *लिंगस्वरूपात त्याची पूजा करतात*. वेद मानीत नाहीत. त्यांच्यांत कर्म आणि पुनर्जन्म या कल्पना नाहीत.
लिंगायत पंथ हा भारतातील *तिसरा* मोठा पंथ आहे. या धर्माचे अधिकतम उपासक कर्नाटक राज्यात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. केरळ आणि तमिळनाडूत या पंथाचे बरेच लोक आहेत.
हा एकेश्वरवादी धर्म है. तमिळमध्ये या पंथाला शिवाद्वैत धर्म अथवा वीरशैव धर्म म्हणतात.
♻ *मुख्य सिद्धान्त* ➡
लिंगायत धर्म, षटस्थल सिद्धान्त मानतो. न्त है जिसे सभी लिंगायत को मानना ज़रूरी है । ये तो एक अध्यात्म साधन का मार्ग है । बसवादि शरण साम्प्रदाय.
🔰 *इष्टलिंग* ➡
"वीरशैव (लिंगायत) पंथाचे लोक गळ्यात शिवलिंग धारण करतात; या लिंगाला इष्टलिंग म्हणतात."
🔰 *अष्टावर्ण* ➡
☄ *गुरु :* लिंगायतपंथीय तत्त्वतः फक्त शिवालाच गुरू मानतात. (प्रत्यक्षात त्या धर्माचे अनेक गुरू आहेत.)
☄ *लिंग :* लिंग ही शिवाची प्रतिमा असल्याने लिंगायत फक्त त्याचीच पूजा करतात. लिंगाचे तीन प्रकार आहेत, १) इष्टलिंग २) चरलिंग ३) स्थावरलिंग.
☄ *जंगम :* लिंगायत पंथामध्ये जंगमांना खास मान असतो. हे जंगम हिंदू धर्माचा प्रचार, लोककल्याण, धर्मं पौरोहित्य, वेदाभ्यास, अध्ययन, अध्यापन करतात. जंगम हे प्राचीन काळातले शैव ब्राह्मण आहेत. त्यांना लिंगायत पंथाचे अध्यात्मिक और सामाजिक गुरू समजतात.
☄ *पादोदक :* म्हणजे गुरुचरणाचे तीर्थ
☄ *प्रसाद :* शिवलिंगाला अर्पिलेला नैवेद्य
☄ *विभूती :* कपाळाला लावायची त्रिपुंड-तीन रेघा असलेले भस्म
☄ *रुद्राक्ष :* शेंडी, मस्तक, कर्ण, कंठ आदी ठिकाणी धारण करायची वस्तू
🕉 *मंत्र :*
*"ओम नमः शिवाय"* हाच एक पंचाक्षरी जप
☄ *षटस्थल*
१ भक्तस्थल २ महेशस्थल ३ प्राणस्थल ४ लिंगस्थल ५ ऐक्यस्थल ६ शरणस्थल
☄ *पंचाचार*
१ भर्त्याचार, २ लिंगाचार, ३ सदाचार, ४ गणचार, ५ शिवाचार
☄ *धर्मग्रंथ :*
वचन साहित्य
✔ *शाकाहार* ➡
सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे.मद्य, मांस, परस्त्रीगमन निषिद्ध आहे.
🌷 *स्मृती, इतिहास, वगैरे* ➡
वर्षभेंद्र विजय, प्रभुलिंगलीला, पेरीय पुराण, वचनसंग्रह, शैव काव्य, वगैरे
🌹 *विचार अवतार* ➡
आत्मा · जंगम · धर्म · कर्म · मोक्ष · पंचाचार · शिव · लिंग· · संसार · तत्त्व · अष्टावर्ण· कृतार्थ · गुरु - दर्श
🌷 *परंपरा* ➡
ज्योतिष · आयुर्वेद · आरती · भजन · दर्शन · दीक्षा · मन्त्र · पूजा · सत्संग · स्तोत्र · विवाह · लिंगधारण · जंगमदान
🌷 *लिंगायत संस्कार* ➡
इष्टलिंग दीक्षा संस्कार
🌷 *गुरू आणि संत* ➡
1⃣ _बसवेश्वर : आद्य संस्थापक_
2⃣ _अक्का महादेवी_
3⃣ _अल्लमप्रभु_
4⃣ _उरिलिंग पेद्दी_
5⃣ _वीरशैव कक्कय्या महाराज_
6⃣ _किन्नरी बोमैय्या_
7⃣ _डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य_
8⃣ _चन्नबसव_
9⃣ _दासिमैय्या_
1⃣0⃣ _कवी नागनाथ मरळसिद्ध_
1⃣1⃣ _पेद्दम्मा_
1⃣2⃣ _कवी मन्मथ शिवलिंग स्वामी_
1⃣3⃣ _कवी लक्ष्मण महाराज_
1⃣4⃣ _शिवकुमार स्वामी_
1⃣5⃣ _उमापति शिवाचार्य_
1⃣6⃣ _वागीश पंडिताराध्य शिवाचार्य_
1⃣7⃣ _सिद्धरामय्या_
1⃣8⃣ _शिवलिंग शिवाचार्य महाराज : राष्ट्रसंत_
⛳ *लिंगायत क्षेत्र :* ➡
कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), श्रीशैल(आंध्र प्रदेश), बाळेहळ्ळी (रंभापुरी-कर्नाटक),
✍🏻 संकलन ✍🏻
*जयराज सोदले*
jayrajsodle.blogspot.com
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment