प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, 24 December 2017

🌲 *ख्रिसमस (नाताळ)* 🌲
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      _🌲 *नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. 25 डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. परंतु  काही ठिकाणी नाताळ 25 डिसेंबर ऐवजी 6, 7 किंवा 19 जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. ख्रिश्नन लोकं या सणाला फार महत्व देतात कारण जीझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे. नाताळ हा आनंद व हर्षोल्साचा सणं आहे. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे क्राइस्ट्स मास अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवी सनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि 25 डिसेंबरला आपले सूर्य नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात. 21 डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे 25 डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस 6 जानेवारी मानला जात असे.*_

      _जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस 25 डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला. त्यांनी येशूख्रिस्ताचा जन्मदिन 25 डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्या वेळेपासून हा दिवस 25 डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभराचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते._

      _या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभ कामना कार्डसची घेवाण देवाण होते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात. संपूर्ण जगभरातल्या गिरीजाघरांमध्ये येशुची जन्मगाथा झाक्यांच्या रूपात प्रदर्शित केल्या जाते. चोवीस डिसेंबरच्या रात्री पासूनच आरती व पुजा पाठास सुरूवात होते. दूस-या दिवशी सकाळीच जन्म दिनाचा सोहळा असतो._

      _ख्रिश्चन बांधव एक दूस-यांची गळाभेट घेवून शुभेच्छांचे आदान प्रदान करतात. गिरिजाघरात मंगल कामनेचे प्रतिक म्हणून ख्रिसमच - ट्रीची सजावट केली जाते. आज ‍नाताळला धार्मिकते सोबतच सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. इंग्रजी भाषीक देशामधील लोकं या दिवशी एक विशेष प्रकारची पुडिंग व केक इत्यादी बनवतात. भारताच्या नागरी भागात हा सण पश्चिमी देशांसारखाच साजरा करतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना मिठाई व भेट वस्तू देतो असे मानले जाते._

      _परंतू देशातील आदिवासी आणि खेड्या पाड्‍यांच्या लोकांच खानपान या दिवशी वेगळ असते. तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी हे यांच्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग असते. आर्थिकरित्या संपन्न नसणा-या घरात हे व्यंजन भेट म्हणून पाठविण्यात येते. दक्षिण भारतात काही भागात पायस वाटण्यात येतो. परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशु‍द्धीचे कारण असते, म्हणून रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबर पासून पंचवीस डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात._

      _*जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र 25 डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म - संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या 25 डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात 25 डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणूनही मानला जात होता.

Friday, 22 December 2017

*वेळामवस्या लातूर-उस्मानाबादचा सर्वात जिव्हाळ्याचा सण...*
        🖊सनिदेवल जाधव

    लातूर, उस्मानाबाद (पुर्वीचा संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा)आणि लगतच्या कर्नाटकातील जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातील अमवस्या ही वेळामवस्या म्हणून सर्व शेतकरी साजरी करतात. मुळात हा सण कर्नाटकातील असून त्याला वेळीअवमस्या म्हटले जाते त्याचा मराठी अपभ्रंश वेळअमवस्या, वेळामवस्या, यळवस झालेला आहे. लातूरकर कोठेही असोत या दिवशी आपल्या शेतात सहकुटुंब येतात म्हणजे येतातच. आज वेळअमवस्या हा सण साजरा केला जाणार. या काळात शेतात गहू, ज्वारी, तुर व हरभरा आलेला असतो. त्यामुळे शेतात गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याचे डहाळे, वटाण्याच्या शेंगा, ऊस, बोरे,तुरीच्या शेंगा असा रानमेवा खाण्यासाठी मुबलक असतो. तसेच हौसी लोक मोहळाचीही शिकार करतात. थंडी अधिक पडल्यास मधाचा अस्वाद विरळच. आंबीलाच्या चवीची वाटतर बारा महीने पाहीली जाते. मातीच्या बिंदगीतली आंबीलतर अमृततुल्य! आदल्या रात्री 'माय' रात्रभर जागून डालभर स्वयपाक करते. सकाळी बैलगाडी सजवून बळीचं कुटुंब शेताकडं कुच करतं. शेतकरी शेतात एक खोप (कोप) तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा करतो. या पुजेसाठी नैवाद्य ही खास असतो. त्यामध्ये , शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभार्याची ओली भाजी, ताक आणि ताक,लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजारीचे (सजगुर्याचे) उंडे याचा समावेश असतो. गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडुन तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र , आजा-नातू आदी पुऱूष पुजेभोवती प्रदिक्षणा घालतात. तसे करताना "चोर चोर चांगभला, पाऊस आला घरला पळा, हरहर महादेव, इडापिडा टळू दे बळीचं पाज्य येऊ दे" घोष केला जातो. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे यात कुठलेच पौराहीत्य, आरत्या नसतात. उंड्यावरच ज्योत पेटवली जाते. मंत्र नसतात की कोणतीच पोथी. सगळी पुजा स्वत: बळीराजा करतो. हा सण साजरा करताना त्याच्या चेहर्यावर भावाची चिंता नसते की उत्पन्नाची. दुपारच्या वेळी 'उतू दवडलं' जातं. म्हणजे शेवाया एका छोट्या बोळक्यात घालून गोवर्यांवर शिजवल्या जातात. त्याचे उतू घालवतात. ज्या दिशेला उतू जाते त्या दिशेला चांगले पिक येणार्या काळात येईल अशी भावना असते. दुपारी थोडीशी वामकुक्षी हानून सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन 'हेंडगा' खेळला जातो. पेटती पेंडी घेऊन शेताला प्रदक्षणा घातली जाते. याने पिकावर रोगांचा प्रार्दुर्भाव होत नाही अशी धारणा आहे. शेतकरी सर्वसामान्यपणे या दिवशी नातेवाईक, मित्र परिवाराला वनभोजनासाठी आग्रहाने निमंत्रीत करीत असतो. अगदी धुर्यावरून जाणार्या अनोळख्यालाही हाळी देऊन बोलावतात. जेवणाचा आग्रह धरतात. जेवण केलेले असल्यास आंबील दिले जाते. वेळामवस्येच्या पूर्वसंध्येपासूनच ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या एस.टी. बसला प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. बसचे कर्मचारीही या दिवशी आर्ध्या का होईन रजेची मागणी करतातच. काही रोडवरचे शेतकरी बस थांबवून चालक-वाहकास आंबील देतात. लातूर जिल्ह्यात या दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी घोषीत केलेली असते. आणि लातूर शहरात अघोषीत संचारबंदी असते. लातूरात ज्या दिवशी रस्त्यावर चिटपाखरू नसते त्या दिवशी वेळामवस्या आहे असे समजावे. वर्षातला कोणताही सण लातूर जिल्ह्यात एवढा ठसा उमटवू शकत नाही जेवढा वेळामवस्या उमटवते. लातूरचे साहेब जेव्हा हयात होते तेव्हा जगात कोठेही असतील तेथून वेळामवस्येला बाभळगावला यायचेच. दुसर्यादिवशी लातूरकर पेपरात त्यांच्या पुजेचा फोटा पाहून सुखावयाचे. ज्यांना शेत नाही आणि आमंत्रणही नाही ते लोक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडकर पार्क, विलासराव देशमुख पार्क, विराट हनुमान परिसरात वनभोजनाचा आनंद घेतात. दुसर्या दिवशी उरलेल्या भजीवर तावही हानला जाते. सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा असा सण लातूर-उस्मानाबादला साजरा होतो.
यळवशीच्या सर्वाना शुभेच्छा!

-सनिदेवल जाधव
मु. ढाकणी पो. निवळी
ता.जि.लातूर
9623594111


वेळ अमावस्या

अमावस्या म्हणजे भूत-प्रेतांचा दिवस (रात्र),
अशुभ-अमंगळ घडण्याची शक्यता अधिक हे शब्द कानी पडलेले असतातच पण आमचा मराठवाडा विशेषतः लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड चा भाग अमावस्येचा सन हि आनंदाने साजरा करतो. हि अमावस्या म्हणजेच “वेळ अमावस्या”.येळ-अमोश्या, एलामास असे स्थानिक अपभ्रंश झालेला हा शब्द.अतिशय आनंदाने,उत्साहाने साजरा होणारा सन.मुळातील शब्द हा ‘येळी अमावस्या’ असून त्याचे नामकरण हे ‘वेळ किंवा येळ अमावस्या’ असे झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळी अमावस्या असते.

दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्‍यांना,मित्रांना
अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात.

शेतात समृद्धी,सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय लक्ष्मीआई पुढे करीत असतात.सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी
देणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही ‘वेळ अमवस्या’ म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शुभकार्यात अमावस्या या तिथीला निषिध मानले जाते.मात्र अमावस्या ही लक्ष्मीच्या पुजेसाठी महत्वाची असते.

दिपावलीमध्ये कुबेर लक्ष्मीचे पुजन अमावस्येदिवशी होते. तिजोरीची पुजा,वहिची पुजा व्यापारी अमावस्येदिवशीच करतात तर वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते.तसेच पिकांची देखील पुजा केली जाते.पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते.

हा सण,ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते.येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते,त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे,शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात.जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो.आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका ‘बिंदग्यात’ (माठ) भरून ठेवलं जात.

आंबिल असते विशेष
आंबिल हे या सणाच खास आकर्षण असत.थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते.केवळ आंबिलावर हा बेत थांबत नाही,सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावराण पदार्थ!या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार,ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात! खरिपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते.

तूरही ऐन बहरात असते व रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. उन्हाची तीव्रता नसते.उसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते.गूळ,रस हाही आनंद उपभोगता येतो.असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो.

सध्या प्रचलित होत असलेल्या हुरडा पार्ट्या खरे तर आम्ही मराठवाडेकर या वेळ अमावसेच्या माध्यमातून अनेक वर्षां पासून साजरी करत आहोत.एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे.जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं.

वेळ अमावास्येला लातूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभर सुट्टी जाहीर केलेली असते;अपवाद असतो तो काही राष्ट्रीय कार्यालय आणि गावागावात जाणार्‍या एसटी बस महामंडळाचा. शहरातील जवळपास सर्व नागरिक कोणाच्यातरी शेतात जतातच जेणेकरून ह्या दिवशी स्थानिक शहरे अघोषित बंद असल्याप्रमाणे ओसाड पडतात.

उत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा,होलगा म्हणतात.
होलगा हा शब्द कानडी असावा,पण बहुधा सम्रुध्धी येवु
दे असा काहीसा अर्थ असावा...!!
ओळखलात का सर मला  पावसात आला कोणी..
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पुन्हा..
गंगमाई पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी ,चार भिंतित नाचली..
मोकळ्या हाती जाईल, कशी बायको मात्रा वाचली
भिंत खचली , चूल भिजली, होते नव्हते नेले..
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे  ठेवले

कारभारणीला घेऊन सांगे, सर आता लढतो आहे..
चिखल गाल काढतो आहे  ,पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात  जातच, हसत हसत उठला..
पैसे नकोत सर,  जरा एकटेपणा वाटला
मोडुं पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठीवरती हात  ठेऊन नुसते 'लढ' म्हणा🙏👍 

Thursday, 21 December 2017

💐।। सुप्रभात ।। 💐
           
            *या जगात सर्वात...*
           *मोठी संपत्ती "बुध्दी"*
      *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*
      *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
      *सर्वात चांगले औषध "हसू"*     
        *आणि आश्चर्य म्हणजे हे*
         *"सर्व विनामुल्य आहे".*
🌼🌸🌷🌼🌸🌷🌼🌸🌷
      *।। नेहमी आनंदी रहा।।*

             *|। शुभ सकाळ  ।|*
     🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
Appriciation ( *कृतज्ञता* )
            लहानपणी एक केळेवाली दारावर केळी विकायला यायची. रोज आमचे आजोबा केळी घेत. माझी लहान बहीण रोज ती केळी उचलून आत न्यायची.  आणि केळीवाली मावशी तिचा गालगुच्चा घेऊन रोज एक केळं तीला बक्षिस द्यायची. आज विचार केला तर वाटत जवळजवळ दहा टक्के बोनस रोज द्यायची ती कौतुकापोटी. ही बिझनेस स्ट्रॅटेजी नक्कीच नव्हती.
    कुठेही गेलं की भाजी आणायला जायचा छंद आहे मला! बहीण पुण्यात असताना रविवारी आम्ही दोघी जायचो भाजीला. तिची नेहमीची भाजीवाली "ताई आल्या का?" असं तोंडभर हसून म्हणत आग़्रहाने एखादी भाजी अशीच पैसे न घेता पिशवीत ठेवी.  काय हे? कसले ऋणानुबंध? सगळं काही पैशात नाही मोजता येत हेच खरं. हातावर पोट घेऊन जगतानाही किती हे माणूसपण!
     छोटसं अॅप्रिसिएशन! कसल्याही रूपात असो किती सुखावह वाटतं नाही? ते काही पैशातच किंवा भेटवस्तूरुपातच असावं असं नाही. "तू जगातली सर्वात छान आई आहेस" हे छोटुकल्याचे बोल आणि  " Aai u are the  best cook" ही एखाद्या पाककृतीला बोटं चोखत गळ्यात पडत लेकी कडून मिळालेली पावती आपल्याला खरोखर हुरूप देतात. छान ड्रेस घातल्यावर किंवा मनासारखं तयार झाल्यावर स्वतःकडेच एकदा बघा कौतुकाने. World number 1 वाटायला लागतो आपण स्वतःलाच!
जाॅब लागला म्हणून विद्यार्थ्यांनी आठवणीने दिलेला पेढा आणि recommendation letter दिल्यावर शिकायला परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी teacher's day  ला आठवणीने केलेला मेसेज हे पुरस्कारासारखं वाटून जातं.
     काल आमच्या काकूंनी घरी उमललेलं सुंदर फूल मला भेट दिलं. " ताई  तुम्ही आम्हाला खूप देता. तुम्हाला मी काय देणार? पण तुम्हाला फूलं आवडतात म्हणून पहिलं फूल तुमच्यासाठी आणलं". डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. किती सहजपणे माझी आवड आणि मनही जपलं त्यांनी ! एक नाजूक नात्याचा गोफ अगदी अलगद वीणला गेला आमच्यात.
   जातायेता केलेलं हलकं अभिवादन, मंदसं ओळखीचं स्मितहास्य, गाडीवरूनही मान तुकवून घेतलेली तुमच्या अस्तित्वाची दखल हेही एक अॅप्रिसिएशनच! एकमेकांमधलं बाॅन्डींग वाढवायला किती मदत करतात या छोट्या छोट्या गोष्टी. परदेशातल्या सारखं thank you , sorry सारखं आपल्याला जमणार नाही.  कदाचित नाटकी वाटेल सुद्धा. वेगवेगळे डेज फॅड वाटेल पण एक मनापासूनच स्मित? जमेल नक्की जमेल. तुम्ही दिलेली कौतुकाची पावती किंवा कष्टांची घेतलेली दखल तिही निव्वळ एका स्मितहास्यातून, नजरेतल्या कौतुकाने किंवा पाठीवर थाप देण्याचा प्रयत्न तरी करून बघा.  एखादीच्या कष्टांच चीज होईल, नविन उभारी देईल ते एखाद्याला.
क्रिटीसाईज काय सगळेच करतात. तुम्ही प्रत्येकाला अॅप्रिशिएट करा अगदी लहानसहान गोष्टीसाठीसुद्धा आणि आपल्या एखाद्या अर्थपूर्ण कृतीने. आणि बघा तुम्हाला सुद्धा त्याचा परतावा कसा मिळतोय ते!

Wednesday, 13 December 2017

.: तुमचा पार्टनर दुसऱ्याबरोबल व्हट्सऍप चॅट करतो का? असा लावा पत्ता..  .,

: आजकाल समाजामध्ये नवरा-बायको, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांच्यात दूरावा येण्याच्या घटस्फोट होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक ज्येष्ठ मंडळी याबाबत चिंतीत आहे. अनेकांना तर, हे असंच चालू राहिले तर, कुटूंबव्यवस्था आणि विवाहपद्धतीच टिकतील की नाही याची शंखा वाटू लागली
.: यात गंमत अशी की, आपला पार्टनर इतका वेळ कोणाशी चॅट करतोय हे जाणून घेण्यासाठी दुसरा पार्टनर नेहमीच उत्सुक असतो. म्हणूनच जाणून घ्या, तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड दुसऱ्याशी काय बोलते. पूर्वी स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा इतका विकास झाला नव्हता. त्यामुळे आपला पार्टनर आपल्याला धोका देऊन दुसऱ्यासोबत स्मार्टफोनवरून गप्पा मारतोय याचा पत्ताच लागत नव्हाता. त्यातही जर लागला तर, त्यांचे नेमके संभाषण काय होतेय हे कळणे कठीण असायचे. या गोष्टी विशेषत: व्हाट्सऍपबाबत घडायच्या. पण आता आम्ही तुम्हाला एक अशी ट्रीक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचा पार्टनर कोणाशी काय आणि कोणत्या वेळाच चॅट करतो. याची इतंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे.
 मात्र, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. ते म्हणजे पूढे दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वापरावे लागतील. *पूढे दिलेली माहिती ही तुमच्या पार्टनरबद्धल अधिक जाणून घेता यावे या उद्देशाने दिलेली आहे. त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी मुळीच नाही. हे प्रथम ध्यानात घ्यावे.*
१ सर्वात पहिले आपल्या लॅपटॉप किंवा पीसीमध्ये बेब.व्हाट्सअप. कॉंम ओपन करा. पण, ही वेबसाईट ओपन करताना ध्यानात ठेवा की, या वेळी तुम्हाला तुमच्या पार्टनरचा मोबाईलही सोबत ठेवावा लागेल. ज्याच्यावर तुम्हाला नजर ठेवायची आहे.

 ३ आता आपल्या कॉम्यूटरवर दिल्या गेलेल्या क्युआर कोडला स्कॅन करा.
४ स्कॅन करताच आपल्याला आपल्या कॉम्प्यूटरच्या स्क्रिनवर त्या व्यक्तीचे/ पार्टनरने केलेले चॅट पहायला मिळेल.

 ५ जर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या व्हाट्सएप अकांऊंटवर नेहमीच नजर ठेवायची असेल तर, ‘कीप मी लॉग्ड इन’ या ऑप्शनला सिलेक्ट करा.

Monday, 4 December 2017

🏵 *Important माहिती*🏵
*1 PAN* - पैशांच्या देवाणघेवाणीदरम्यान पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून फायदा होतो. मात्र या पॅनकार्डचा फुलफॉर्म आहे परमनंट अकाऊं नंबर(permanant account number).
*2. PDF*- अनेकांना पीड़ीएफचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मट(portable document format)
*3. HDFC -*अनेकदा हा शब्द ऐकला असेल. HDFC म्हणजे 'हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (housing development finance corporation)
*4. SIM -* या शब्दाचा वापर 90 टक्के लोक करतात. मात्र नक्कीच तुम्हाला याचा फुलफॉर्म माहीत नसेल. सिमचा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) असा आहे.
*5. ATM -* याचा वापर तर 10 पैकी 8 लोक करतात. एटीएमचा फुलफॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन(Automated Teller machine)
*6. IFSC -*याचा फुलफॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड() Indian Financial System Code) आहे.
*7. FSSAI(fssai) -* याचा फुलफॉर्म आहे 'फुल सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया' )
*8-Wi-Fi-*
याचा फुलफॉर्म आहे 'वायरलेस फिडेलिटी'(wireless fidelity)
Some Fullforms of important words  : -

1.) *GOOGLE* - Global Organization Of Oriented Group Language Of Earth.
2.) *YAHOO* - Yet Another Hierarchical Officious Oracle.
3.) *WINDOW* - Wide Interactive Network Development for Office work Solution.
4.) *COMPUTER* - Common Oriented Machine Particularly United and used under Technical and Educational Research.
5.) *VIRUS* - Vital Information Resources Under Siege.
6.) *UMTS* - Universal Mobile Telecommunicati ons System.
7.) *AMOLED* - Active-matrix organic light-emitting diode.
8.) *OLED* - Organic light-emitting diode.
9.) *IMEI* - International Mobile Equipment Identity.
10.) *ESN* - Electronic Serial Number.
11.) *UPS* - Uninterruptible power supply.
12. *HDMI* - High-Definition Multimedia Interface.
13.) *VPN* - Virtual private network.
14.) *APN* - Access Point Name.
15.) *SIM* - Subscriber Identity Module.
16.) *LED* - Light emitting diode.
17.) *DLNA* - Digital Living Network Alliance.
18.) *RAM* - Random access memory.
19.) *ROM* - Read only memory.
20.) *VGA* - Video Graphics Array.
21.) *QVGA* - Quarter Video Graphics Array.
22.) *WVGA* - Wide video graphics array.
23.) *WXGA* - Widescreen Extended Graphics Array.
24.) *USB* - Universal serial Bus.
25.) *WLAN* - Wireless Local Area Network.
26.) *PPI* - Pixels Per Inch.
27.) *LCD* - Liquid Crystal Display.
28.) *HSDPA* - High speed down-link packet access.
29.) *HSUPA* - High-Speed Uplink Packet Access.
30.) *HSPA* - High Speed Packet Access.
31.) *GPRS* - General Packet Radio Service.
32.) *EDGE* - Enhanced Data Rates for Globa Evolution.
33.) *NFC* - Near field communication.
34.) *OTG* - On-the-go.
35.) *S-LCD* - Super Liquid Crystal Display.
36.) *O.S* - Operating system.
37.) *SNS* - Social network service.
38.) *H.S* - HOTSPOT.
39.) *P.O.I* - Point of interest.
40.) *GPS* - Global Positioning System.
41.) *DVD* - Digital Video Disk.
42.) *DTP* - Desk top publishing.
43.) *DNSE* - Digital natural sound engine.
44.) *OVI* - Ohio Video Intranet.
45.) *CDMA* - Code Division Multiple Access.
46.) *WCDMA* - Wide-band Code Division Multiple Access.
47.) *GSM* - Global System for Mobile Communications.
48.) *WI-FI* - Wireless Fidelity.
49.) *DIVX* - Digital internet video access.
50.) *APK* - Authenticated public key.
51.) *J2ME* - Java 2 micro edition.
52.) *SIS* - Installation source.
53.) *DELL* - Digital electronic link library.
54.) *ACER* - Acquisition Collaboration Experimentation Reflection.
55.) *RSS* - Really simple syndication.
56.) *TFT* - Thin film transistor.
57.) *AMR*- Adaptive Multi-Rate.
58.) *MPEG* - moving pictures experts group.
59.) *IVRS* - Interactive Voice Response System.
60.) *HP* - Hewlett Packard.

Plz Share
🙏🙏

*Do we know actual full form of some words???*
*🔗News paper =*
_North East West South past and present events report._
*🔗Chess =*
_Chariot, Horse, Elephant, Soldiers._
*🔗Cold =*
_Chronic Obstructive Lung Disease._
*🔗Joke =*
_Joy of Kids Entertainment._
*🔗Aim =*
_Ambition in Mind._
🔗Date =
_Day and Time Evolution._
*🔗Eat =*
_Energy and Taste._
*🔗Tea =*
_Taste and Energy Admitted._
*🔗Pen =*
_Power Enriched in Nib._
*🔗Smile =*
_Sweet Memories in Lips Expression._

*🔗SIM =*
_Subscriber Identity Module_

*🔗etc. =*
_End of Thinking Capacity_
*🔗OK =*
_Objection Killed_

*🔗Or =*
_Orl Korec (Greek Word)_

*🔗Bye =*♥
_Be with you Everytime._

*share these meanings as majority of us don't know -*       👌👌👌👌👌👌👌👌

Friday, 1 December 2017

🎯 *"एड्स निर्मूलन दिन"*🎯
【 *_प्रतिबंध हाच उपचार_*】

🍁 *"एच्आयव्ही विषाणुची रचना"*

_एड्स म्हणजे "अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम" एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक स्थिती आहे. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होणे शक्य असते. त्यांवर इलाज करणेही अवघड होते. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते._

🍁 _एड्स वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी एक आहे. एड्सच्या संसर्गाची *तीन* मुख्य कारणे आहेत -_
1⃣ *"असुरक्षित लैंगिक संबंधातून",*
2⃣ *"बाधित रक्तातून"* तसेच
3⃣ *"बाधित आईकडून अर्भकाला."*

_नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅमआणि यूएनएड्स यांच्यानुसार भारतात ८० से ८५ टक्के संसर्ग असुरक्षित विषमलैंगिक (हेट्रोसेक्शुअल) संबंधांतून पसरत आहे. भारतात आजपर्यंत एड्‌सकडे दुर्लक्ष  झाले आहे. एच.आय.व्ही. विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते. इ.स.१९८१ मध्ये सुमारे ५ कोटी लोक एड्‌सचे बळी ठरले आहेत असा अंदाज आहे. अजूनही एड्‌सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत._

🍁 *"एड्सचा प्रसार"*

_एड्स यापैकी कोणत्याही कारणाने पसरू शकतो :-_

१】असुरक्षित लैंगिक
२】 संबंधदूषित रक्त चढवल्यानेसंसर्गित आईकडून अर्भकालाबाधित आईकडून स्तनपान करणार्‍या मुलालादूषित
३】सुईतून

🍁 *"एड्सचा प्रतिबंध*"

_एड्सवर सध्या कोणतेही औषध वा लस नाही. एच.आय.व्ही विषाणूची लागण झाली असल्याचे खूप लवकर लक्षात आले, तर काही 'अँटीरेट्रोव्हायरल' औषधे घ्यायला लागून एड्सच्या स्थितीचा वेग कमी करणे काही प्रमाणात शक्य आहे. परंतु ही औषधे अतिशय महाग असल्याने विकसनशील व अविकसित देशांतील बहुतांश लोकांना उपलब्ध नसतात. तसेच ह्या औषधांची परिणामकारकता मर्यादित असून एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून खालील प्रतिबंधात्मक गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे._

_एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा._
_लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधचा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा.तुम्हाला एड्स झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या. असुरक्षित संबंध ठेवू नका, त्यामुळे एड्स तुमचा साथीदार किंवा मुलांना होण्याची शक्यता असते.जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका.रक्त चढवण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या.इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा._

🎗 *"एड्सची लक्षणे:-"*

_एच.आय.व्ही. चा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यांत बरेच दिवस कोणतेही लक्षण दिसून येत नाही. दीर्घ काळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाहीत. एड्स झालेल्या अनेक लोकांना विषाणुजन्य ज्वर होतो पण त्यातून एड्सची निष्पत्ती होत नाही. काही लक्षणे खाली दिली आहेत._

_तापडोकेदुखीथकवामळमळ आणि भूक कमी होणेलसिकांची सूजनागीणवजन कमी होणे (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त)वारंवार तोंड येणेवारंवार जुलाबवारंवार आजारी पडणे_
_ही सर्व लक्षणे साध्या रोगांत दिसून येतात त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे संक्रमण निश्चित ओळखता येत नाही._

 🎗 *"उपचार:-"*

_एच. आय. व्ही. वर उपचार उपलब्ध असून सरकारी रुग्णालयात ए. आर. टी. मोफत मिळते._

🙏🏻साभार:-विकिपीडिया🙏🏻

       ✍🏻 *संकलन* ✍🏻
        *जयराज सोदले.*
             🇲 🇸 🇵
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*♿समावेशित शिक्षण विभाग♿*
      *BRC गट साधन केंद्र,चाकूर*
〰〰〰〰〰〰〰〰〰

      *यु -डायस २०१७ -१८ मध्ये २१ दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे . आपल्या शाळेत असणाऱ्या दिव्यांग बालकांची ओळख व्हावी म्हणून २१ प्रवर्गाविषयी माहिती देण्यात येत आहे जेणेकरून यु डायस भरताना त्याचा फायदा होईल.*


(या वर्षीच्या यू- डायस मधील नोंदीवरून पुढील वर्षीच्या विविध शैक्षणिक व सहाय्यभूत सुविधा पुरविल्या जात असतात)

*१) पूर्णतः अंध = (Blindness)*

 » दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे.
» डोळे जन्मत बंद असणे .
 » हलन चलन करताना अडचणी येतात.

*२. अंशतः अंध (Low Vision)*

» सामान्य दृष्टी पेक्षा कमी दिसणे.
»दूरचे /जवळचे कमी दिसणे .
»पुस्तकावरील पाहताना वाचताना लिहताना अडचणी येतात .
»उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे .

*३)कर्णबधीर (Hearing Imapairment)*

»कोणताही आवाज ऐकू न येणे .
कमी ऐकू येणे .
»कानाचा श्रवण ६० db किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना कर्णबधीर व्यक्ती म्हणतात .

*४) वाचा दोष (Speech and Language Disability)*

» अडखळत बोलणे स्पष्ट बोलणे.  » शब्दांची तोडफोड करणे.
 » बोलताना शब्द मागे पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच वाचा दोष असे म्हणतात .
» जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे,  तोतरे बोलणे ,
» टाळूला छिद्र असणे.
» clept palete.

*५. अस्थिव्यंग ( Locomotor Disability)*

» ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना अस्थिव्यंग मुले असे म्हणतात.
» हलन चलन क्रिया करण्यास अक्षम .
» सहज दिसणारे अपंगत्व

*६) मानसिक आजार (Mental Ellness)*

» असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन .
» खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे .
» भयानक स्वप्न पडतात .
» भ्रम आभास असतो .
» कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.

*७) अध्ययन अक्षम (Learning Disability)*

» वाचन लेखन गणितीय क्रिया अडचण .
» आकलन करण्यास अवघड जाते.
» अंक ओळखण्यात गोंधळ,  उलटे अक्षर लिहिणे ,  शब्द गाळून वाचणे.
» काही मुलांमध्ये वर्तन समस्या
 » कमी संभाषण दिसून येते .
» बुद्ध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो .
» विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात .

 *(८. मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy)*

» हालचालींवर नियंत्रण नसते .
» अवयवांमध्ये ताठरता असते .
» मेंदूला इजा झाल्याने हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण होतात .
» मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही.
» हलचल क्षमता कमी असते.

 *९) स्वमग्न (Autism)*

» स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.
» भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.
» बदल न आवडणे त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.
» खेळणी, वस्तू यासोबत अधिक लगाव असतो.
» स्वतःच्या भाव विश्वात रमून गेलेले असतात.

*१०)बहुविकलांग ( Multiple Disability)*

» एक किंवा जास्त अपंगत्व असते .
» अशा बऱ्याच मुलांना चालतानां बोलतानां , उभेराहतांनां ,  शि- शू ,  दैंनदिन  कार्य करतानां समस्या असतात. (ADL) 

*११) कुष्ठरोग (Leprosy Cured Persons)*

» हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे .
» त्वचेवर चट्टे , काळे डाग असतात .
» हात,पाय, बोटे सुन्न पडतात .

*१२) बुटकेपणा (Dwarfism)*

» सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असलेल्या मुलांना बुटकेपणा असलेले मुले म्हणतात.
» उंची फार कमी असते .

*१३) बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability)*

» बौद्धिक क्षमता( IQ) ही ७० पेक्षा  कमी असते .
» दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार, करण्यास कठीण जाते .
» तार्किक प्रश्न सोडविताना अडचणी जातात .
» नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी जातात .
» काही मुलांना वर्तन समस्या असतात .

*१४) माशपेशीय क्षरण (Mascular Disability)*

» गटागटाने मांसपेशी कमकुवत होतात .
»उभे होतानां हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.
» मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .

*१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार (chorinic Neurological Conditions)*

» मेंदूमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.

*१६) मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple sclerosis)*

» हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.
» स्नायूमध्ये स्थितीला येथे व स्नायू काम करणे कमी करतात .
» मलद्वार व मूत्राशयावर नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते .

*१७) थॅलेसिमिया (Thalassemia)*

» रक्ताची कमतरता
» वारंवार रक्त पुरवावे लागते .
» चेहरा सुखावलेला असतो .
वजन वाढत नाही .
» श्वास घेण्यात त्रास होतो .
» वारंवार आजारी पडतात .

*१८) अधिक रक्तस्त्राव (Hemophilia)*

» हा अनुवांशिक रक्तविकार आहे
रक्त वाहिन्यातील बिघाडामुळे हा रोग होतो .
» यामध्ये रक्तस्त्राव होतो .
» जखमा झाल्यास अधिक रक्तस्त्राव होतो .
» कधी कधी रक्तस्त्राव थांबत नाही.
» रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.
 
*१९) सिकल सेल (Sickle Cell Disease)*

» रक्ताचे प्रमाण कमी असणे .
» रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात .
» शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो .
» हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो .

*२०) अॅसिड अटॅक (Acid Attack Victim)*

»अॅसिड अटॅकमुळे चेहरा, हात, डोळे  यावर परिणाम होतो.
» त्वचा भाजल्यासारखी दिसते .
» चेहरा विद्रुप होतो .

*२१) कंपवात रोग (Parkinson's Disease)*

» रेणूच्या अभावामुळे रोग्याला  कंप सुटतो .
» हालचाली संथ होतात स्नायू ताठर  होतात .
» वजन कमी होत जातो .
» वयाच्या ५० ते ६० ज्या दरम्यान होतो.


              *रविराज देशमुख*
     *विशेष शिक्षक समावेशित शिक्षण*,
            *गट साधन केंद्र चाकूर*
       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Monday, 27 November 2017

#महात्मा_ज्योतिबा_फुले

जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव: जोतिबा, ज्योतीबा.
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी नाव: सावित्रीबाई फुले
अपत्ये: यशवंत
स्वाक्षरी: 120px

महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

बालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

“ विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईट्‌स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्‍नी सावित्रीबाईंना १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

Wednesday, 22 November 2017

           *🔰गणित🔰*
*🌐घटक - संख्याज्ञान !🌐* 
=======================

1 ते 100 मध्ये ...

0 हा अंक -   11 वेळा लिहतात.
1 हा अंक - 21 वेळा लिहतात.

2 ते 9 सर्वच अंक - प्रत्येक 20 वेळा लिहतात....

अशा प्रकारे ....
1 ते 100 उजळणी लिहताना...

आपणास....
 = 11 + 21 + 160
=  192 अंक लिहावे लागतात....
=======================

1 ते 100 च्या दरम्यान ...

एकूण 25 मुळ संख्या आहेत

2, 3, 5 , 7,        -     1ते 10 पर्यंत
11, 13, 17, 19  -  11 ते 20 पर्यंत
23 , 29,            - 21 ते 30 पर्यंत
31, 37              - 31 ते 40 पर्यंत
41, 43, 47         -  41 ते 50
53, 59       -        51 ते 60
61 , 67          -     61 ते 70
71, 73 , 79         -  71 ते 80
83 , 89         -        81 ते 90
97                 -      91 ते 100

या एकूण *25* मुळ संख्या आहेत

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

*जोडमुळ संख्या -* 

    ज्या दोन क्रमागत मुळ संख्या दरम्यान एक दुसरी संख्या असते त्यांना मुळ संख्या ना जोडमुळ संख्या म्हणतात 

उदाहरणार्थ  - 3 व 5  ,  11 व 13 

1 ते 100 पर्यंत आशा जोडमुळ संख्या च्या  8 जोड्या आहेत .

3 , 5
5 , 7
11 , 13
17 , 19
29 , 31
41 , 43
59 , 61
71 , 73

या आठ जोड्या आहेत...

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

संख्या लेखन ....

          लहानात लहान    मोठ्या मोठी

1 अंकि         1                 9
2 अंकि         10               99
3 अकि         100            999
4 अंकि         1000          9999
5 अंकि         10000        99999

या प्रमाणे आपण संख्या लिहु शकतो.

यावर आधारीत स्पर्धा परीक्षा ला हमखास प्रश्न असतात....

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

वर्ग संख्या  - सर्वांना माहिती आहेत.

ञिकोणी संख्या  - 

*क्रमागत येणाऱ्या दोन संख्या च्या गुणाकाराच्या निम्मे करून मिळणाऱ्या संख्या ना ञिकोणी संख्या म्हणतात !*

उदाहरणार्थ ....
         
            4 × 5 
    =   --------------
                2

    =  10

म्हणजे 10 ही ञिकोणी संख्या आहे .

ञिकोणी संख्या पुढील प्रमाणे आहेत.

1 , 3 , 6 , 10 , 15 .....

यांना ञिकोणी संख्या का म्हणतात वरील लेखात सविस्तर सांगितले आहे.

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

अनेकांच्या वाचणात न आलेला भाग...

*परिपूर्ण संख्या !*   - 

एखाद्या संख्या च्या सर्वच विभाजक  संख्या ची बेरीज ( ती संख्या सोडून  ) त्याच संख्या इतकी येत असेल तर त्यांना परिपूर्ण संख्या म्हणतात .

उदाहरणार्थ

6 चे विभाजक -  1, 2, 3

यांची बेरीज केली तर...

    =  1 + 2 + 3 =  6  इतकी च येते

*म्हणजे 6 परिपूर्ण संख्या आहे..!*

नसलेली संख्या पाहुयात एखादी ...

10 चे विभाजक = 1 , 2 , 5 ,

  बेरीज = 1 + 2 + 5 = 8

म्हणजे 10 परिपूर्ण नाही .

*काही परिपूर्ण संख्या*

   -  6, 28 , 496 , 8128 इत्यादी

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

संख्या चढता उतरता क्रम

दिलेल्या अंकापासून संख्या लहानात लहान  व मोठयात मोठी संख्या लिहा असा प्रश्न असतो.

त्या मध्ये ही सम विषम हा भाग आहे.

थोडे काळजी पूर्वक लिहायला हवेत..

उदाहरणार्थ  - 2, 5, 7 , 4 अंक आहेत.

लहानात लहान  -  2457
                       - 2574 सम संख्या
                      -  2475 विषम

मोठ्यात मोठी    - 7542
                       - 7542 सम संख्या
                      - 7425 विषम       

*१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र*

*१) वात २) पित्त ३) कफ*
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच *निरोगी* म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
      *आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल*
----------------------------------------------
१) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.*

२) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

३) पाणी पिल्यावर पोटावर *दाब* पडतो आणि *प्रार्तविधी* करुन घ्यावा.

४) त्यानंतर *दात घासावे* त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही *स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट* वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात

५) नंतर *अंघोळ* करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना *गरम पाणी* कधीच वापरु नये.

६) सकाळी *७.३० ते ९.३०* च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) *जेवणाच्या अगोदर* *४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी  प्यावे.* जेवताना *एक ते दोन घोट* पाणी प्यायला हरकत नाही.

८) *सकाळी फळांचा ज्युस प्या*  दुपारी *दही ताक किंवा मठ्ठा प्या* आणि  *झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.*
९) नेहमी *पाणी* पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे *उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.*
( *शरीराला दररोज लाळेची गरज असते* जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी *घोट घोट* करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर *१० ते १५* मिनीटे *वज्रासनात* बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी *(२० मिनीटे झोपावे)* घ्यावी. आणि *संध्याकाळी* जेवण केल्यावर *३ तास झोपू नये* व *शतपावली* करावी.

११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावू नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

१२) भोजन करतांना नेहमी *मातीच्या* भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) *झोपताना* नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
*फिल्टर तेलच वापरा. * (रिफाईंड तेल विष आहे)*

१५) *सेंन्द्रिय गुळाचा* वापर करावा. *(साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)*

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा *गुळ* खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त *सेंधा मीठ* वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी *६ ते ७ तास झोप* आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज *एक तास प्राणायाम,* *१५ मिनीट योगासने,* व जेवढे जमेल तेवढे *सूर्यनमस्कार* करणे.

२०) *प्राणायाम* मात्र नियमित करणेच चांगले.

२१) रोज न चुकता *एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा.* तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा.

२२) *जास्त* वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील.

२३) *भारतीय* रस म्हणजे *उसाचा रस,कोकम* *सरबत,आवळा रस, लिंबू* *सरबत, फळांचा ज्युस* हेच आपल्या शरीराला *उत्तम पोषक* आहेत.

२४) भारतीय *पोशाख* घाला व तो *सैल* असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो *पांढराच* असावा.

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये *८४* प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
*लघवीला* आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, *अश्रू* बाहेर येवू द्यावेत, * *रडायला* आले तर ऱडावेच, *हसायला* आले की भरपुर हसावे, *जांभई* आली की द्यावीच, *शिंक* आली की बिनधास्त द्यावी , *अपानवायू* आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

२६) *कफ* कधीच *गिळू* नये.

*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो
🙏🏻 *मनापासून धन्यवाद* 🙏🏻

*"वा-याच्या झुळकीने मन सुखावतं,*
*झाडाच्या सावलीत मन विसावतं,*
*सुर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं."*
                 म्हणून आपण जरी त्यांचे आभार मानत नसलो तरी *त्यांच्या कृत्याची जाणीव असण महत्वाचं,धन्यवाद हे जाणीवेचं शब्दरूप असतं.म्हणूनच सर्वांना खुप खुप धन्यवाद.🙏🏻*
             दिनांक ०७/११  मला माझ्या *वाढदिवसाच्या निमित्ताने*.... *माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने* आठवणीने प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे, एस.एम.एस.,सोशल मीडिया च्या माध्यमातून *आशीर्वाद व शुभेच्छा* दिल्या  त्या बद्दल मी *सर्वांचे मनापासुन आभार* मानतो.
            आयुष्या मध्ये येऊन मी ज़र काही कमावले असेल,तर ते *तुमच्या सारखे मित्र कमावले..!*
 *हिच खरी संपत्ती मी कमावली असे मी समजतो.* *माझ्या मित्रांनो, माझा वाढदिवस हे फक्त एक निमित्त आहे.तुमच्या प्रेमळ शुभेच्छा नेहमीच माझ्या सोबत असतात... असच तुमचं प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो.*..... अशी आशा बाळगतो. आपले सर्वांचे मनापासुन आभार मानतो.
             *आजचा दिवस माझ्या साठी तुमच्या मुळे अनमोल ठरला.*
_आपण दिलेल्या शुभेच्छांचा_
_अगदी मनापासून स्विकार…_
_आपले मनःपूर्वक आभार…!_
_आपली सर्वांची साथ,सोबत_ _अशीच राहू द्या._
_मी आपण सर्वांच्या ऋणातच राहू इच्छितो.. !!_
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मला सामाजिक कार्य करण्यासाठी नवीन उर्जा , प्रेरणा मिळते. *धन्यवाद व जय महाराष्ट्र.* ..!!

            सदैव आपलाच....
           *अजित घंटेवाड*
            ९९२३५६१९४८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖



Sunday, 5 November 2017

सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यावर काय होते : तुम्ही पण थक्क व्हाल फायदा पाहून
गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर ह्याचे बाकीचे फायदे पाहून तुम्ही पण थक्क व्हाल. गरम पाणी पिताना जरी चवीला चांगलं वाटत नसेल, पण ह्याचे शरीरासाठी असलेले फायदे पाहून तुम्ही सुद्धा गरम पाणी प्यायचे सुरु कराल. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली तर शरीराच्या आजारापासून वाचू शकतात.

१. वजन कमी करतं :
जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि तुमच्या खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्या. तुम्हांला निश्चितच फरक पडेल. जर तुम्ही हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक काप गरम पाणी प्यायला सुरु करा.

२. सर्दी खोकल्यांपासून सुटका :
कोणत्याहि मोसमात तुम्हाला छातीत दुखणं आणि खोकला सारखे आजार होत असतील तर गरम पाणी ह्यावर रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे गळा पण ठीक राहतो. ह्याच्या सेवनाने आराम मिळतो.

३. पिरियड्स सोपे बनवते :
पिरियड्सचे दुखण्यामुळे महिलांना सर्वच कामांमध्ये ब्रेक लागतो. गरम पाणी ह्या दुखण्यावर आराम मिळण्याचे काम करते. ह्या दरम्यान गरम पाण्याने पोटावर सेक करण्याने सुद्धा खूप फायदा होतो.

४. शरीर डिटॉक्स करते :
गरम पाण्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. आणि हे शरीरातील सर्व अशुद्ध गोष्टी खूप सहज स्वच्छ करते. गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. ज्यामुळे घाम येतो आणि ह्याद्वारे शरीरातील सर्व अशुद्धता दूर होतात.

५. वाढते वय थांबवते :
चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या जर तुमची चिंता वाढवत असेल तर काळजी करायचे काही कारण नाही. आजपासूनच गरम पाणी प्यायला सुरुवात करा आणि काही आठवड्यातच ह्याच काम बघा. त्वचेमध्ये तरतरी येऊ लागेल आणि त्वचा चमकदार सुद्धा होईल.

६. केसांसाठी फायदेशीर :
ह्याशिवाय गरम पाणीचे सेवन केसं आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्यामुळे केसं चमकदार बनतात आणि हे केसांची वाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.

७. पोटाला ठेवते दुरुस्त :
गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली राहते आणि हे ऍसिडिटीच्या समस्यांपासून आराम देते. जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पिण्याची सवय लावा. असं करण्याने जेवण लवकर पचतं आणि पॉट हलकं ठेवतं.

८. रक्तप्रवाह (ब्लड सर्क्युलेशन) सुरळीत ठेवते :
शरीराला योग्य पद्धतीने चालण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत चालणे खूप आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.

९. शरीराची ऊर्जा वाढवते :
सॉफ्ट ड्रिंक्स च्या ऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराची एनर्जी लेव्हल वाढते आणि डायजेस्टिव्ह सिस्टम पण नीट राहते.

१०. गुडघ्याचे दुखणे दूर करते :
गरम पाणी गुडघ्याचे दुखणे कमी करते. आपल्या मांसपेशींमध्ये ८०% भाग पाण्याने बनलेले आहे आणि पाण्यानेच मांसपेशींच्या गाठी दूर होतात.

Tuesday, 31 October 2017

*एका आठवड्यात मिळवा पासपोर्ट...जाणून घ्या*
मुंबई : सर्वात पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. पॉवरफुल पासपोर्टमुळे सिंगापूरमधील नागरिकांना सर्वाधिक देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करता येतो. या यादीत भारत ७५व्या स्थानी आहे. देशात दरवर्षी हजारो नागरिक आपला पासपोर्ट काढतात. तुम्ही अजूनही पासपोर्ट काढला नाहीये तर आता काही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने तुम्ही सात दिवसांत पासपोर्ट काढू शकता.
*परराष्ट्र मंत्रालयाने सोपे केले नियम*
२०१६मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्यासाठीचे नियम सोपे केलेत. ऑनलाईन अर्जासह तुम्ही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने एका आठवड्यात पासपोर्ट बनवू शकता.
*ही कागदपत्रे आवश्यक*
ऑनलाईन अर्ज करताना
आधार कार्ड,
मतदान ओळखपत्र,
 पॅनकार्ड आणि
आपल्यावर कोणताही क्रिमिनिल गुन्हा नाही हे सिद्ध करणारे अऍफेडव्हिट सादर करणे गरेजेचे असते.
अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला पुढील तीन दिवसांत अपॉईंटनमेंट मिळेल.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळेल.
नंतर होईल पोलीस व्हेरिफिकेशन
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मते परराष्ट्र मंत्रालयाने अशी व्यवस्था केलीये ज्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळेल. पासपोर्टसाठी सर्वाधिक वेळ हा पोलीस व्हेरिफिकेशनसाठी जातो. मात्र सात दिवसांत तुम्हाला पासपोर्ट मिळेल त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होईल.
ऑनलाईन कसा बनवाल पासपोर्ट
*स्टेप १ : पासपोर्ट सेवा पोर्टलवर स्वत: रजिस्टर करा*
सर्वात आधी
http://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink या लिंकवर जाऊन पेजवर register now क्लिक करा. यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर लॉगिन आयडी मिळेल.
*स्पेट २ : लॉग इन करा*
तुमच्या ई-मेल आयडीवर लिंक क्लिक करुन अकाऊंट अॅक्टिव्हेट करा. त्यात युझर आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टवर क्लिक करा. यात दोन ऑप्शन आहेत. ऑनलाईन पासपोर्ट अर्जासाठी दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करा.
*स्टेप ३ : ऑप्शन निवडा*
पहिल्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करताना अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टवर क्लिक करा. अप्लाय केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्यातील माहिती भरा. लक्षात ठेवा, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. कारण एकदा पासपोर्ट प्रक्रिया रिजेक्ट झाली तर दुसऱ्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करताना वेळ लागतो.
*स्टेप ४ -* प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट अॅप्लिकेशन रिसीटवर क्लिक करा आणि अॅप्लिकेशन प्रिंट घ्या. यात तुम्हाला अॅप्लिकेशन रेफरंस नंबर आणि अपॉईंटमेंट नंबर असतो.
*स्टेप ५ -* अपॉईंटमेंट बुक झाल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रात जाताना खरी कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे असते. केंद्रात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घरी सात दिवसांत पासपोर्ट येईल. 

Thursday, 26 October 2017

वडिलांच्या श्राद्धाऐवजी शाळेला दिली देणगी

ओक्टोबर 26, 2017

रुढी-परंपरांच्या नावाखाली वारेमाप खर्च करणं, ही भारतात राहणाऱ्या माणसासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. व्यक्तीच्या जन्माआधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही सोहळे साजरे करण्याची आपली रीत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली धार्मिक कृत्यांसाठी खर्च करण्याऐवजी त्याला विधायक आकारही देता येऊ शकतो. असेच एक आदर्श उदाहरण म्हणजे लातूर तालुक्यातील मांजरीची जिल्हा परिषद शाळा. या शाळेसाठी तिथे कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकाने सुमारे दोन लाख रुपयांची कामं आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ करुन दिली आहेत. आज ही शाळा लातूरमधली सर्वांगसुंदर आयएसओ जि.प. शाळा म्हणून ओळखली जाते. या शिक्षकाचे नाव आहे रावसाहेब भामरे.

विद्यार्थ्यांना शिकविण्यात रमलेले रावसाहेब भामरे सर


भामरे सर सध्या लातूरमधील मुरुडच्या डीआयईसीपीडीत तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण काही वर्षांपूर्वी ते मांजरीच्या जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे काम करीत होते. या स्वागर्ताह पायंड्याविषयी विचारले असता सरांनी सांगितले, “माझे दिवंगत वडील स्वर्गीय माणिकराव भामरे यांच्या निधनानंतर वर्षभराने वर्षश्राद्ध वगैरे धार्मिक कृत्ये करण्याऐवजी मी शाळेसाठी काही चांगले काम करण्याला पसंती दिली. आमचे दिवंगत वडीलही देवभोळे नव्हते, रुढी-परंपरांसाठी पैसा खर्चण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा सामाजिक कार्याला देणगी देण्याला त्यांचे प्राधान्य असायचे. त्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर असणाऱ्या आमच्या वडिलांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मला हाच मार्ग योग्य वाटला.”

2015 च्या नोव्हेंबर महिन्यात मांजरी शाळेच्या कायापालटाचे सुरु झालेले काम मार्च 2016 मध्ये संपले. यात भामरे सरांनी दिलेल्या 1 लाख 89 हजारातून शाळेची रंगरंगोटी, इमारत दुरुस्तीची काही कामे आणि गणितपेटीसारखे रचनावादी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र शाळेला परिपूर्ण करण्यासाठी इतरही अनेक कामे करणे गरजेचे होते. त्यासाठीचा वाटा शाळेतील इतर सहकारी शिक्षकांनी आणि मांजरी ग्रामपंचायतीने उचलला. शाळेतील सात शिक्षकांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी उभारला तर मांजरी ग्रामपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतून एक लाख रुपयांची देणगी शाळेला जाहीर केली. शाळेच्या शिक्षकांची सुरु असलेली धडपड पाहून ग्रामपंचायतीने स्वेच्छेने ही देणगी दिली.

लातूरमधील अंतर्बाह्य सुंदर अशी मांजरी जिल्हा परिषद शाळा

अशा प्रकारे जमा झालेल्या सुमारे चार लाख रुपयांतून मांजरी जिल्हा परिषद शाळेचा कायापालटच घडला. या शाळेत ज्ञानरचनावादी तळफळे चांगल्या दर्जाच्या ऑईलपेंटने रंगवून घेतलेले आहेत, मुलांना बसायला दर्जेदार बेंचेस, डिजिटल वर्गखोली आणि उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय केलेली आहे. शाळेला आयएसओ नामांकन मिळण्यासाठीचा खर्च तत्कालीन केंद्रप्रमुख गायकवाड आणि विस्ताराधिकारी अलमले सर यांनी उचलला. त्याविषयी बोलताना भामरे सर सांगतात, “शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षक झटत असताना अधिकाऱ्यांनीही आनंदाने आपल्या खिशाला कात्री लावण्याचे कदाचित हे पहिलेच उदाहरण असेल. अधिकारी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहिल्यानेच काम करायला आणखी उत्साह आला.”

लातूरच्या शिक्षकांना प्रशासकीय मदतीसाठी ‘स्टेप’ अॅप


मांजरी शाळेचा कायापालट झाल्यानंतर भामरे सर आता तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ‘एज्युटेक लातूर’ नावाचे यू ट्यूब चॅनेल ते चालवतात. त्यात तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग कसा करुन घ्यावा, याचे छोटे-छोटे मार्गदर्शन पर व्हिडिओ आहेत. याशिवाय स्टेप आणि इ-कॅलेंडर ही दोन नवी अॅप त्यांनी 2017 साली लॉन्च केलेली आहेत. लातूरच्या गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे यांच्या संकल्पनेतून ही अॅप्स विकसित करण्यात आली आहेत.

‘Solutions on Teachers Enquiries & Problem’ नावाचे हे अॅप भन्नाट आहे.
शिक्षकांना प्रशासकीय कामांसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेत यावे लागू नये हा या अॅपचा उद्देश आहे. ‘स्टेप’ या अपअंतर्गत शिक्षकांनी आपले काम/ तक्रार/ शंका या अपवर नोंदवायची. त्याचा इमेल लातूरचे सीईओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती आणि संबंधित विभागाकडे जातो. त्यांच्यामार्फत त्या प्रश्नाचे उत्तर तात्काळ दिले जाते. उत्तर न दिल्यास त्याचे रिमाइंडर पाठवले जाते. शिवाय संबंधित शिक्षकांना त्यांच्या कामाचे काय झाले, याचे अपडेटही वेळोवेळी दिले जाते. काम झाल्यानंतर त्याचे कागदपत्र देणे आवश्यक असेल तर शिक्षकाच्या नोकरीच्या गावच्या पंचायत समितीत ते पाठवले जाते. “या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा वेळ वाचतो आणि प्रशासकीय कामांवर तो वेळ घालवण्यापेक्षा त्याने अध्यापनावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे असा आमचा उद्देश आहे”, भामरे सर सांगत होते.

भामरे सरांनी विकसित केलेले ‘इ- कॅलेंडर’ अॅप


दुसरे अॅप आहे ते इ-कॅलेंडर. लातूर तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीतच केले जाते. गटशिक्षणाधिकारी अंधारे मॅडम आणि सबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचे कॅलेंडर तयार केले जाते आणि ते या ‘इ कॅलेंडर’च्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यात पालकसभा, माता-पालक मेळावे, कन्या सुरक्षा मंचाचे कार्यक्रम, शिक्षकांच्या बैठका, फिल्म क्लबमध्ये दाखवायचे चित्रपट असे तारीखवार नियोजन असते.

ही दोन्ही अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरुन लातूरचे शिक्षक मोफत डाऊनलोड करुन घेऊ शकतात. अशा प्रकारे लातूरचा शिक्षण विभाग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवनवे प्रयोग करतोय.
              साभार:-
ब्लॉग: स्नेहल बनसोडे-शेलुडकर.
छायाचित्रे: रावसाहेब भामरे
                संकलन
जयराज नवनाथराव सोदले
जि.प.प्रा.शाळा, बोथी
ता.चाकूर जि.लातूर

=====================================https://www.blogger.com/blogger.g?blogID=1566480817626881410#editor/target=post;postID=3014676983888124824

Sunday, 15 October 2017

🎇 *"My School,My Activity"* 🎇

    🚸जि.प.प्रा.शाळा,बोथी🚸
           ता.चाकूर जि.लातूर
*[प्रोजेक्टर सॉफ्टवेअरसह-ई लर्निंग]*

        *"आम्ही प्रकाशबीजे*
                   *रूजवीत चाललो,*
          *वाटा नव्या युगाच्या*
                   *रूळवीत चाललो।"*

🚩 *"साधना" बालकुमार दिवाळी अंकाचे विद्यार्थ्यांना मोफत वितरण.*

🚩 *"दिवाळी खाऊ" उपक्रमांतर्गत "माझी सुट्टी-माझा अभ्यास" 1 ली ते 7 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला.*

🚩 *प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा व 1,87,000 ₹ बचतीचा संकल्प करण्यात आला.*

🚩 *म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.*

🚩 *डॉ. ए.पि.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिन"म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*

🚩 *"आम्ही हे करणारच" जिल्हा परिषद लातूरच्या "स्वच्छ भारत मिशन"अंतर्गत उपक्रमाचे वाचन,लेखन व अंमलबजावणी करण्यात आली.*

🚩 *"हाथ धुवा दिन"साजरा करण्यात आला.*

🚩 *अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती तर्फे एक ट्रि गार्ड,एक झाड व फोटो शाळेस भेट.*

🚩 *वाल्मिकी गणेश मंडळातर्फे एक ट्रि गार्ड, एक झाड,दोन फोटो, स्पर्धा परीक्षेचे आयोजन व बक्षीस वितरण करण्यात आले.*

🚩 *कै.कृष्णा गायकवाड यांच्या स्मरणार्थ एक ट्रि गार्ड, फणसाचे झाड व फोटो शाळेस भेट देण्यात आला.*
[देणगीदारांचे शाळेतर्फे मनःपुर्वक आभार🙏🏻]

       🏵  *-:आमचे मार्गदर्शक:-*
मा.डॉ.माणिक गुरसळ,मा.चौरे बळीराम,मा.शेख नजरूद्दीन,मा.संजयजी पंचगल्ले,मा.तृप्ती अंधारे,मा.रविंद्र सोनटक्के,मा.रामराव चव्हाण,मा.हरिश्चंद्र घटकार,मा.इस्माईल पठाण,मा.चंद्रकांत भोजने,मा.प्रमोद हुडगे,मा.रणजित घुमे,मा.प्रकाश भालके,मा.रविराज देशमुख.

      *"ज्ञानज्योतीने ज्योत पेटवु या*
       *बनवु या एक मशाल,*
       *पेटतील सारे ध्यासाने अन्*
       *गुणवत्ता प्रकाश पसरेल विशाल।"*

🎉"बोथी टिम तर्फे दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!"🎉

             *-:बोथी टिम:-⤵*
🌼गणपती जमादार सर
🌸धनाजी दंडीमे सर
🌼गोपाळ जोशी सर
🌸मंगल स्वामी ताई
🌼सुचिता सुर्यवंशी ताई
🌸जगन्नाथ वागलगावे सर
🌼जयराज सोदले सर

           ✍🏻 *शब्दांकन* ✍🏻
         सोदले जयराज नवनाथराव
         स.शि.जि.प.प्रा.शाळा,बोथी    www.jayrajsodle.blogspot.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖










Friday, 13 October 2017

संगणक, कीबोर्ड आणि माउस यांचं अतूट असं नातं आहे. माउस जर बंद पडलं तर आपण परेशान होतो अशावेळी किबोर्डचा वापर फक्त टायपिंगसाठी न करता त्यातील काही शॉर्टकट वापरुन आपण आपला वेळ वाचवू शकतो.

*Alt + Tab :* आपण जर एकाचवेळी अनेक साईट, सॉफ्टवेअर्स वापरत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन आपण एका साईट किंवा सॉफ्टवेअरवरुन दुसरे बॅकग्राऊंडला सुरू असणारी साईट किंवा सॉफ्टवेअर उघडू शकता.

*Ctrl + Shift + Esc :* संगणक हँग झाल्यावर या शॉर्टकटचा वापर करुन आपण टास्क मॅनेजर थेट उघडू शकतो. टास्क मॅनेजरमधून कोणता प्रोग्राम चालत नाही याची माहिती घेऊन तो बंद करु शकतो.

*Shift + Delete :* आपणला जर कोणतीही फाईल कायमची डिलीट कराची असेल तर आपण या शॉर्टकटचा वापर करुन ती कायमची डिलीट करु शकतो.

*Windows logo key + L :* या शॉर्टकटद्वारे आपण संगणक लॉक करु शकतो. जेणेकरुन आपल्या अनुपस्थितीत त्याचा कोणी गैरवापर करणार नाही.

*Ctrl + F4 :* एकाच सॅफ्टवेअरच्या अनेक फाईल ओपन असतील तर त्या बंद करण्यासाठी या शॉर्टकटचा वापर करता येतो.

*Ctrl + Y :* जसे आपण Ctrl + Z याचा वापर करुन Undo करु शकतो तसेच  Ctrl + Y करुन आपण Redo करू शकतो.

*Ctrl + Shift with an arrow key :* संगणकावर लिखीत माहिती वाचण्यासाठी या शॉर्टकचा वापर करता येतो. यामुळे पेज सरकवणे सोपे जाते.

*Windows logo key + D :* या शॉर्टकटचा वापर करुन आपण सगळ्या विंडो एकाचवेळी मिनीमाईज करु शकतो. यामुळे आपला प्रत्येक विंडो मिनीमाईज करण्याचा वेळ वाचतो.

*Windows logo key + I :* या शॉर्टकटचा वापर करुन आपण थेट संगणकाच्या सेटींगमध्ये जातो. यामुळे संगणकाचे सेटिंग कुठे आहे हे शोधत बसावे लागत नाही.

*Windows logo key + number :* जर तुम्ही ॲप पिन करत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन तुम्ही ते ॲप लगेच उघडू शकता. जसे तुम्ही कॅलक्युलेटर चौथ्या क्रमांकावर पिन केले असेल तर विंडो + 4 हा शॉर्टकट वापरल्यास ते ॲप लगेच उघडते.



Thursday, 12 October 2017

प्रगती पत्रक नोंदी यादी

विशेष प्रगती ➡

1 शालेय शिस्त आत्मसात करतो
2 दररोज शाळेत उपस्थित राहतो
3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो
8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9 ऐतिहासिक माहिती मिळवतो
10 चित्रकलेत विशेष प्रगती
11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
12 गणितातील क्रिया अचूक करतो
13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
17 खेळ उत्तम प्रकारे खेळते
18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22 चित्रे छान काढतो व रंगवतो
23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
27 शाळेत नियमित उपस्थित राहतो 
28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
32 वाचन स्पष्ट व अचूक करतो
33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
34 नियमित शुद्धलेखन करते
35 शालेय उपक्रमात सहभाग घेते
36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो
38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42 हिंदीतून पत्र लिहितो
43 परिपाठात सहभाग घेते
44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
47 प्रयोगाची कृती अचूक करते
48 आकृत्या सुबक काढते
49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
53 व्यवहार ज्ञान चांगले आहे
54 अभ्यासात सातत्य आहे
55 वर्गात क्रियाशील असते
56 अभ्यासात नियमितता आहे
57 वर्गात लक्ष देवून ऐकतो
58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
60 अभ्यासात सातत्य आहे
61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63 वर्गात नियमित हजर असतो 
64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
65 खेळण्यात विशेष प्रगती
66 Activity मध्ये सहभाग घेतो
67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
68 विविध प्रकारची चित्रे काढते
69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा

आवड /छंद➡

1 चित्रे काढतो
2 गोष्ट सांगतो
3 गाणी -कविता म्हणतो
4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5 खेळात सहभागी होतो
6 अवांतर वाचन करणे
7 गणिती आकडेमोड करतो
8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
11 वाचन करणे
12 लेखन करणे
13 खेळणे
14 पोहणे
15 सायकल खेळणे
16 चित्रे काढणे
17 गीत गायन
18 संग्रह करणे
19 उपक्रम तयार करणे
20 प्रतिकृती बनवणे
21 प्रयोग करणे
22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23 खो खो खेळणे
24 क्रिकेट खेळणे
25  संगणक हाताळणे
26 गोष्टी ऐकणे
27 गोष्टी वाचणे
28 वाचन करणे
29 रांगोळीकाढणे
30 प्रवास करणे
31 नक्षिकाम
32 व्यायाम करणे
33 संगणक
34 नृत्य
35  संगीत ऐकणे

सुधारणा आवश्यक ➡

1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31 शालेय परिपाठात सहभाग असावा
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे 51शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे .
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा
वरील नोंदी महत्वपुर्ण आहेत संग्रहीत ठेवाव्यात

Monday, 9 October 2017






*वाचन प्रेरणा दिनासाठी घोषवाक्ये*

👉 वाचाल तर वाचाल,
       शिकाल तर टिकाल
👉 जिथे जिथे दिसते पुस्तक,
       तिथे व्हावे नतमस्तक
👉 जिथे पुस्तकांचा साठा,
       समृद्धीचा नाही तोटा
👉 वाचन करता मिळते ज्ञान,
       उंचावते जीवनमान
👉 पुस्तकांशी करता मैत्री,
       ज्ञानाची मिळते खात्री
👉 वाचनाने समृद्ध होते मती,
       मिळते आमच्या विकासाला गती
👉 ग्रंथ हे आपले गुरु,
       वाचनासाठी हाती धरू
👉 वाचन करा वाचन करा,
       हाच खरा ज्ञानाचा झरा
👉 वाचनालयाला देऊ आकार,
       कलामांचे स्वप्न करू साकार
👉 एक एक वाचू पुस्तक,
       गर्वोन्नत होईल मस्तक
👉 वाचनसंस्कृती घरोघरी,
       तिथे फुले ज्ञानपंढरी
👉 वाचनाचा जपा नाद,
       ज्ञानाचा नको उन्माद
👉 वाचता वाचता मिळते ज्ञान,
      अनुभव हाच गुरु महान
👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
      ज्ञानासह समाजाचे भान

🙏🏽
   📚 *वाचन प्रेरणा दिवस*📚

      *१५ आक्टोंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. तो दिवस शासनाने "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून घोषित केला आहे. तरी या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच मुख्य उद्देश असुन तशी आवड निर्माण करण्यासाठी आपण त्या दिवसाचे  महत्त्व पुढीलप्रमाणे सांगू शकतो ...*

       *महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट म्हणजे थॉमस पेन यांनी लिहीलेलं राईटस् अॉफ मॕन नावाचे पुस्तक ....या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली ...*

      *डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न झाले याचे मुळ हे केळुसकर गुरुजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र हे पुस्तक आहे.*

       *बाबासाहेबांनी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते.त्यात हजारो पुस्तके होती.*

    *भगतसिंग यांनी तुरुंगात असतांना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करुन उपोषण केले होते.*

       *महात्मा गांधीच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती रस्किन या लेखकाच्या अन टू द लास्ट या पुस्तकामुळे त्यातुनच सत्याग्रहाची प्रेरणा त्यांना मिळाली.*

       *नेपोलियन बोनापार्ट यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी आजही पॕरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.*

      *शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी गांधीजींची अनेक पुस्तके वाचली होती.*

         *खास वाचन प्रेरणा दिनानिमित्तानं तुमच्या माहीतीसाठी सादर!*

     *वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा !!!*
      🙏🙏🌹🌹👍🏽👍🏽

*ए.पी.जे. अब्दुल कलाम*


भारताचे एकमेव अद्वितीय व्यक्ती, भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती
डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.


पूर्ण नाव अमीर पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलाम

जन्म :१५ ऑक्टोबर, १९३१
रामेश्वर

मृत्यू :२७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँग

नागरिकत्व :भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय

धर्म :इस्लाम

कार्यसंस्था: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
प्रशिक्षण मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ख्याती: शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपति
पुरस्कार : पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्‍न
वडील जैनुलाबदिन अब्दुल


*शिक्षण*

 त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

*कार्य*

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत

होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..

*कारकिर्द*
डॉ. कलामांची कारकीर्द

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

पुस्तके

कलामांनी लिहिलेली पुस्तके

अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया - माय-ड्रीम
उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक खूप छान आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण त्याला मत देऊ शकतो हे त्यातून समजते.

कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

१९८१ : पद्मभूषण
१९९० : पद्मविभूषण
१९९७ : भारतरत्‍न
१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
२००० : रामानुजन पुरस्कार
२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनार्‍याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
                     
                      निधन

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.