प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, 18 September 2018

Saturday, 15 September 2018

🍁🍁 इंग्रजी परिपाठ कसा  घ्यावा.... सूचना🍁🍁

🌷1-attention ,at ease
🌷2-ready for the national athem.start the national anthem. (राष्ट्रगीत)
🌷3-Ready for the preamble.start the preamble. ( संविधान )
🌷4-Ready for the pleadge.start the pleadge.( प्रतिज्ञा )
🌷5-Ready for the hymn.start the hymn. ( श्लोक )
🌷6-Ready for the prayer.start the prayer ( प्रार्थना)
🌷7-Good morning friends.i am..(student name) now i request my friend..... (stu.name)to tell about todays day special.
🌷8-I am ...(stu.name)I am here to tell about todays day special,.........
🌷9- वरीलप्रमाणे सूचना देणारा मुलगा दुसऱ्याला invite करेल.
.....good thought,opposite words, todays news,general knowledge questions, moral story.
🌷10-Ready for the chorus song.start the chorus song. (समूहगीत )
🌷11-Ready for the Pasaydan.start the pasaydan( पसायदान)
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

Thursday, 13 September 2018


वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

आरत्या -
...................................................
*श्री गणपतीची आरती*

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची | सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची | जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ || रत्नखचित फार तुज गौरीकुमरा | चान्दांची उटी कुंकुमकेशरा | हिरेजडीत मुगुट शोभती बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || २ || लंबोदर पितांबर फणीवरबंधना | सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना | दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना | जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ ||
...................................................

*श्री गणपतीची आरती*

नाना परिमल दुर्वा शेंदूर शमीपत्रे | लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे | ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे | अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे || १ || जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती || जय || धृ || तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती | त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती | वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती | सर्वही पावुनी अंती भवसागर तरती || जयदेव || २ || शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी | कीर्ती तयांची राहे जोवरी शशि - तरणी | त्रेलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी | गोसावीनंदन रात नाम स्मरणी | जयदेव जय || ३ ||
...................................................

*श्री गणपतीची आरती*

शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको | दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको | हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको | महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ || जय जय जी गणराज विद्यासुखदाता | धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ || अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी | विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी | कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी | गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || जय || २ || भावभगतसे कोई शरणागत आवे | संतत संपत सबही भरपूर पावे | ऐसे तुम महाराज मोको अति भावे | गोसावीवंदन निशिदिन गुण गावे | जय जय जी गणराज विद्यासुखदाता || धन्य || ३ ||
...................................................

*श्री शंकराची आरती*

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा | लावण्यसुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ || जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ || कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा | विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || २ || देवी दैत्यी सागर मंथन पै केले | त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले | तें त्वां असुरपणे प्राशन केलें | नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ३ || व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी | शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ४ ||
...................................................

*श्री देवीची आरती*

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी | वारी वारी जन्ममरणाते वारी | हरी पडलो आता संकट निवारी || १ || जय देवी जय देवी महिषसूरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ || त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही | साही विवाद करिता पडिले प्रवाही | तें तू भक्तालागी पावसी लवलाही || जय || २ || प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा | क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा | जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक || ३ ||
...................................................

*श्री दत्ताची आरती*

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा | नेति नेति शब्द नये अनुमाना | सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना || १ || जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ || सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासी कैची कळेल हे मात | पराही परतली तेथे कैचा हा हेत | जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || २ || दत्त येउनिया उभा ठाकला भावे सांष्टागेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || ३ || दत्त दत्त ऐसे लागले ध्यान | हारपले मन झाले उन्मन | मी तू झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान || जय देव || ४ ||
...................................................

*श्री विठोबाची आरती*

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ || जय देव जय देव जय पांडुरंगा || रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव || धृ || तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी | देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय || २ || धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळा | राई रखुमाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सावळा || जय || ३ || ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया देती | दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय || ४ || आषाढी कार्तिकी भक्तजन येती | चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती | दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती | केशवासी नामदेव भावे ओवाळिती || जय देव जय देव जय || ५ ||
...................................................

*श्री विष्णूची आरती*

आवडी गंगाजळे देवा न्हाणीले | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले | अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे | जंव जंव धूप जळे | तंव तंव देवा आवडे | रमावल्लमदासे अहं धूप जाळिला | एकारतीचा मग प्रारंभ केला | सोहं हा दीप ओवाळू गोविंदा | समाधी लागली पाहतां मुखारविंदा | हरीख हरीख हातो मुख पाहतां | चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था | सदभवालागी बहु हा देव भुकेला | रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला | फल तांबूल दक्षिणा अर्पीली | तयाउपरी नीरांजने मांडिली || आरती आरती करू गोपाळा | मी तू पण सांडोनी वेळोवेळा || धृ || पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली | दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी | आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें | सुरवर सकळीक तटस्थ ठेले | देवभक्तपण न दिसे कांही | ऐशापरी दास रमावल्लभ पायीं || आरती ||
...................................................

*नवरात्राची आरती*

आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो | प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो | मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो | ब्रम्हा विष्णू आईचे पूजन करिती हो || १ || उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो | उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो | सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो | कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो | उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | उदो || तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो | मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो | कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो | अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो | उदो || ३ || चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो | उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो | पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो | भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो | उदो || ४ || पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो | अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो | रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो | आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो | उदो || ५ || षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो | घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो | कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो | जोगवा मांगता प्रसन्न झाली भक्तकुळा हो | उदो || ६ || सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो | तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो | जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो | भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो | उदो || ७ || अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो | सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो | मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो | स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो | उदो || ८ || नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे हो | सप्तशतीजप होमहवने सदभक्तीकरुनी हो | षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो | आचार्य ब्राम्हणा तृप्त केलें कृपेकरुनी हो | उदो || ९ || दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लघनी हो | सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो | शुंभनिशुभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो | विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो | उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो || १० ||
...................................................

*मारुतीची आरती*

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी || कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ || जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ || दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानिला खेद | कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद | रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||
...................................................

*श्री कृष्णाची आरती*

ओवाळू आरती मदनगोपाळा | श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ || चरणकमल ज्याचे अति सुकुमार | ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ || नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू || २ || मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी | वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू || ३ || जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू || ३ || एका जनार्दनी देखियले रूप | रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू || ५ ||
...................................................

*श्री ज्ञानदेवाची आरती*

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ || लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ || कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो || साम गायन
    करी || २ || प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||
...................................................

*श्री एकनाथाची आरती*

आरती एकनाथा | महाराजा समर्था | त्रिभुवनी तूंचि थोर | जगदगुरू जगन्नाथा || धृ || एकनाथ नाम सार | वेदशास्त्रांचे गूज | संसारदु:ख नाम | महामंत्राचे बीज | आरती || १ || एकनाथ नाम घेतां | सुख वाटले चित्ता | अनंत गोपाळदासा | धणी न पुरे गातां | आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||
...................................................
*श्री तुकारामाची आरती*

आरती तुकारामा | स्वामी सदगुरूधामा | सच्चिदानंदमूर्ती | पाय दाखवी आम्हा || आरती || धृ || राघवे सागरांत | पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले || आरती || १ || तुकिता तुलनेसी | ब्रम्ह तुकासि आलें | म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले || आरती तुकारामा || २ ||
...................................................

*श्री रामदासाची आरती*

आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ || साक्षात शंकराचा | अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ || वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ || ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे | कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती रामदासा ||
...................................................

*श्री पांडुरंगाची आरती*

जय देव जय देव जय पांडुरंगा | आरती ओवाळू भावे जिवलगा || धृ || पंढरीक्षेत्रासी तू अवतरलासी | जगदुद्धारासाठी राया तू फिरसी | भक्तवत्सल खरा तू एक होसी | म्हणुनी शरण आलो तुझे चरणांसी || १ || त्रिगुण परब्रम्ह तुझा अवतार || त्याची काय वर्णू लीला पामर | शेषादिक शिणले त्यां न लागे पार | तेथे कैसा मूढ मी करू विस्तार || २ || देवाधिदेवा तू पंढरीराया | निर्जर मुनिजन घ्याती भावें तंव पायां | तुजसी अर्पण केली आपुली मी काया | शरणागता तारी तू देवराया || ३ || अघटीत लीला करुनी जड मूढ उद्धरिले | कीर्ती ऐकुनी क नी चरणी मी लोळे | चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले | तुझ्या भक्तां न लागे चरणांवेगळे | जय देव जय देव जय पांडुरंगा | आरती || ४ ||
...................................................

*आरती जय जय जगदीश हरे*

ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे | भक्त जनो कें संकट क्षण में दूर करे || ओSम || जो घ्यावे फल पावे दु:ख विनशे मनका | सुख संपती घर आवे कष्ट मिटे तनका || ओSम || मात पिता तुम मेरे शरण गहू किसकी | तुम बिन और न दूजा आस करू किसकी || ओsम || तुम हो पुरण परमात्मा तुम अंतरयामी | पार ब्रम्ह परमेश्वर तुम सबके स्वामी || ओSम || तुम करुणा कें सागर तुम पालन कर्ता | मैं मुरख खल कामी कृपा करि भरता || ओSम || तुम हो एक अगोचर सबके प्राणपती | स्वामी किस विधी मिलू दयामय तुमको मैं कुमति || ॐ || दिन बंधू दुखहर्ता तुम रक्षक मेरे अपने हाथ उठाओ शरण पडा तेरे || ॐ || विषय विकार मिटाओ पापा हरे देवा | श्रद्धा भक्ति बधाओ संतन की देवा || ॐ ||

*जय जय श्री शनिदेवाची आरती*

जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिरी ठेवा | आरती ओवाळिती | मनोभावे करुनी सेवा || धृ || सूर्यसुता शनीमूर्ती || तुझी अगाध कीर्ती | एक मुखे काय वर्णू | शेषा न चले स्फूर्ती || जय || नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा | ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ || विक्रमासारीखा हो शककर्ता पुण्यराशी | गर्व धरितां शिक्षा केली | बहु छळियले त्यासी || जय || ३ || शंकराच्या वरदाने | गर्व रावणे केला | साडेसाती येतां त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ || प्रत्यक्ष गुरुनाथा | चमत्कार दावियेला | नेऊनि शूलापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ || ऐसे गुण किती गाऊ | धनी न पुरे गातां || कृपा करी दीनावरी | महाराजा समर्था || जय || ६ || दोन्ही कर जोडूनिया रखमां लीन सदा पायीं | प्रसाद हाची मागे | उदयकाळ सौख्य दावी | जय जय श्री शनिदेवा | पद्मकर शिरी ठेवा || ७ ||
...................................................

*श्री संतोषीमातेची प्रासादिक आरती*

जय देवी श्रीदेवी संतोषी माते | वंदन भावे माझे तंव पद कमलाते || धृ || श्रीलक्ष्मीदेवी तू श्रीविष्णुपत्नी || पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी || जननी विश्वाची तू जीवन चितशक्ती | शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती || १ || भृगुवारी श्रद्धेने उपास तंव करिती | आंबट कोणी कांही अन्न न सेविती || गूळचण्याचा साधा प्रसाद भक्षिती | मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती || २ || जें कोणी नरनारी व्रत तंव आचरिती | अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थिती || त्यांच्या हाकेला तू धावूनिया येसी | संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी || ३ || विश्र्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे | भवभय हरुनी आम्हा सदैव रक्षावे || मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी | म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी || ४ ||
...................................................

*आरती महालक्ष्मीची*

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता | प्रसन्न होऊनिया वर देई आता || धृ || विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता | धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता || १ | विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही | धावसी आम्हालागी पावसी लवलाही || २ || त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभो  सुखशांती  | सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती || ३ || वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे | देसी दान वरदे सदैव सौख्याचे || ४ || यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी | प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ||

🚩 *सर्व गणेश भक्तानां गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा* 🚩

Wednesday, 5 September 2018























🚸 *शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त केला बोथींच्या गुरूजींचा सत्कार.* 🚸

*बोथी:- आज दिनांक 05 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.*
        *यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कोंडीबा शेवाळे होते तर प्रमुख पाहणे श्री.मधुकर कोईलवाड, सदस्य नवनाथाप्पा आवाळे, कैलास गिरी, ज्ञानोबा गायकवाड, अभंग हाके,बंडोपंत महात्मे, वसंत शेवाळे, पद्माकर गायकवाड, हणमंत कांबळे, पिंटू डिगोळे होते.*
      *मान्यवरांच्या व विद्यार्थी यांच्या शुभहस्ते मु.अ.गणपती जमादार, अविनाश भोसले, गोपाळ जोशी, मुंढे साधू,बस्वराज रायफळे, मंगल स्वामी व जयराज सोदले यांचा *शाल,श्रीफळ, पुष्पहार, पेन व सन्मानपत्र* *देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.*
          *यावेळी संध्या आवाळे,अर्पिता धायगुडे, दिक्षा गायकवाड, साक्षी पाटील, ओमकार बोथीकर,पुजा डिगोळे, विठ्ठल केंद्रे,राजश्री तुडमे,या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणे केली.*
      *तसेच प्रमुख पाहुणे नवनाथाप्पा आवाळे यांनी शिक्षकांचे गुणगौरव गाईले.*
       *या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुंढे साधू यांनी केले तर सोदले जयराज यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.*

*सर्व विद्यार्थी व बोथी ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.* 🙏🏻🙏🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tuesday, 4 September 2018

वारांची नावे





** वारांची मराठी व इंग्रजी नावे **
1.       रविवार             (SUNDAY)
2.       सोमवार            (MONDAY)
3.       मंगळवार         (TUESDAY)
4.       बुधवार             (WEDNESDAY)
5.       गुरुवार             (THURSDAY)
6.       शुक्रवार            (FRIDAY)
7.       शनिवार            (SATURDAY)
*जीआर हवेत?*🌐
खालील जीआर तारखेनुसार शोधण्यास आणि डाऊनलोड करण्यासाठी मदत होणार आहे
www.maharashtra.gov.in
*Gr reference*
👉🏻1) शाळा बाह्य विद्यार्थी -20-5-2015
👉🏻2) Adhar card-21.4.2015
👉🏻3) नाविण्यपूर्ण उपक्रम-21.4.2015
👉🏻4) महीला त. निवारण-14.1.2015
👉🏻5) Kp Jobchaet-14.11.1994
👉🏻6) मुले टिकवून ठेवणे-28.3.2014
👉🏻7) संविधान वाचन-4.2.2013
👉🏻8) SARAL-3.7.2015
👉🏻9) PSM-22.6.2015
👉🏻10) Yogdin-9.6.2015
👉🏻11) गुणवत्ता कक्ष-21.11.2015
👉🏻12) शाळासिध्दी-30.3.2016
👉🏻13) समायोजन-12/18.5.2011
👉🏻14) बदली-15.5.2014
👉🏻15) संचमान्यता-28.8.15 & 8.1.16
👉🏻16) CCE -20.8.2010
👉🏻17) अतिथी नीदेशक-7.10.2015
👉🏻18) SMC-17.6.2010
👉🏻19) पालक संघ-24.8.2010
👉🏻20) SSA जबाबदारी -4.9.2013
👉🏻21) समायोजन अंपग-28.8.2012(प)
👉🏻22) Beo jobchart-5.11.84 (P)
👉🏻23) O. S. Jobchart-16.5.2014
                                   2.6.2914(P)
👉🏻24)महाराष्ट्र दर्शन Gr -10.6.2015
👉🏻25) साधन व्यक्ती -
         jobchart-6.6.15   (Scert)
👉🏻26) BrcLekha section jobchart
              4.2.2005 (MPSP)
👉🏻27) शै.गुणवत्ता ता.समिती-23.12.05
👉🏻28) साक्षर भारत.समिती-29.10.10
👉🏻29) मित्र उपक्रम-27.1.2012 (P)
👉🏻30) Self finance act-2012
         राजपत्र-19.1.2013
👉🏻31) RTI2005-वै.माहीती-17.10.14
👉🏻32) स्वच्छ वि.स्वच्छ MH -7.10.15
👉🏻33) 25%प्रवेश-23.7.2015
👉🏻34) Minorities gr-18.6.2014
👉🏻35) RTE-09अधिसुचना-11.10.11
👉🏻36) मुलभुत सुविधा निकष-29.6.13
👉🏻37) मानव विकास-19.7.2011
👉🏻38) प्रेरक नीवड-16.9.2011
👉🏻39) मत्ता & दायित्व-   20.4.2015
                             Dt-02.6.2014
👉🏻40) NOC CBSE-20.6.2012
👉🏻41) उशिराने उपस्थिती -31.8.2006
                         सा.प्र.परीपत्रक .
👉🏻42) पटपडताळणी-13.10.2014
👉🏻43) C-1,2-शिस्तभंग-7.3.2015
👉🏻44) स्वयसांक्षाकंन-9.3.2015
👉🏻45) बिंदू नामावली-24.7.2014
👉🏻46) गणेश उत्सव अभियान-2016.
       27.7.2016 व 3.9.2016
👉🏻47)खाजगी शाळा RTI-09
       dt-18.1.06 Dir pri letter .
👉🏻48)PHP CA-2.8.2014
👉🏻49) वै.प्रतीपूर्ती-16.11.2011
👉🏻50) खाजगी शाळा अनुदान-  निकष-15.11.2011
👉🏻51) CR -17.12.2011
👉🏻52) शिक्षण सेवक Scale-14.10.10
👉🏻53) खोटी तक्रार-25.2.2015 (सा)
👉🏻54) RTI(05)-31.5.2012(एक अर्ज)
👉🏻55) आश्वासीत प्रगती योजना-1.7.11
👉🏻56) Kithchan shade-28.2.2014
👉🏻57) राजीव.गा.अ.वि.यो.1.10.2013
👉🏻58)शै.शु.Act-2011-16.4.2014(P)
👉🏻59) Dist फिरते.पथक-18.4.2013
👉🏻60)शा.मान्यता रद्द-18.4.2013
👉🏻61) तक्रार निवारण समीती (GRM)
                        dt-21.4.2014
👉🏻62) पटपडाताळणी करवाही-2.5.12 
👉🏻63) MS-CIT-5.5.2007
👉🏻64) आम आदमी यो.-12.6.2013
👉🏻65) RMSA-30.6.2010
👉🏻66)  स्था.प्रा.जबाबदारी -31.12.13
👉🏻67)बदली अधिनियम-30.10.2006
👉🏻68)शाळा मान्यता बाबत-29.6.2013
👉🏻69) RTE-2009-1.4.2010
👉🏻70) समृद्ध शाळा-23.3.2016
👉🏻71) शाळासिध्दी-30.3.2016
👉🏻72) RYS-2015-dt-04.1.2016
👉🏻73) तंबाखू मुक्त शाळा-7.7.2015 gr
👉🏻74) ता.क्रीडा समिती-29.2.2016
👉🏻75)दिव्यांग सवलती-8.1.2016
👉🏻76) PSM निकष-23.3.2016 (प)
👉🏻77) शाळा प्रवेश उत्सव-22.6.15+
                                   dt-9.6.2015
👉🏻78) वृक्षलागवड-10.5.2016
👉🏻79) केंद्रस्तर शिक्षण परीषद-1.9.16
👉🏻80) दप्तराचे ओझे-21.7.15/28.4.16
👉🏻82) ATL-1.7.2016
       83) पुढील जी आर अपडेट करून ही पोस्ट राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व इतर सर्व शिक्षण खात्यातील अधिकारी वर्गांच्या whatsapp ग्रुपवर फॉर्वड करता येईल
आज पंचायत समिती निलंगाचे सुविध्य गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री रविंद्र सोनटक्के साहेबांनी पी आर सी दौऱ्याच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व मुअ ची आढावा बैठक आयोजित केली होती.                 बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे -
* श्री स्वामी साहेब (शिविअ) -
१)सर्व मुअ नी ७६पानांचे बुकलेट व ३८मुद्दयांचे आवलोकन करावे त्याची पूर्तता करावी.
२)सरलची कामे पूर्ण करुन घ्यावीत.
३)मुअनी स्वत:कडे 'student catlog 'ठेवावे.
४)शाव्यस ची दरमहा किमान एक    बैठक घ्यावी, इतिवृत्त ठेवावे.
५)शाळा वेळापत्रक दर्शनी भागावर लावावे.
६)परिपाठ नियोजनानुसार घ्यावा.
७)विद्यार्थी हजेरी सकाळ - दुपार स्वतंत्र नोंदवावी.
८)मुअ सहित सर्व शिक्षकांचे दै. टाचण अद्यावत असावे.
९)मुअ नी शिक्षकांचे Logbook किमान प्रतिमाह एक वेळ तरी भरावे.
१०)शाव्यस बैठक सूचना किमान ३दिवस अगोदर काढावी.
११)स्वयंअध्ययन कार्ड sorting करुन व्यवस्थित ठेवावेत व दै. अध्ययन अध्ययनात वापर करावा.
१२)स्तर निश्चिती चाचणी व पायाभूत चाचणी पेपर काळजीपूर्वक तपासुन गुणांकन करावे.
१३)PSM  चे सर्व GR शाळेत ठेवावेत.
१४)शाळा श्रेणी दर्शनी भागावर लावावी.
१५)शाळा तंबाखूमुक्त असल्याचे भीत्तीपत्रक /बॅनर दर्शनी भागावर लावावे.
१५)शाळेच्या आवारात किमान दोन खेळाच्या मैदानाची आखणी करावी.
१६)शाळेचा ८अ चाउतारा घेऊन ठेवावा.
१७)शिक्षकांनी हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करुनच स्थलांतर करावे.
१८)विद्यार्थी संचयी नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात.
१९)जनरल रजिस्टरवर ३०एप्रिल नंतर त्या त्या वर्षात झालेल्या प्रवेशाचा आढावा घेऊन त्यावर केंद्रप्रमुखांची स्वाक्षरी घ्यावी.
२०)३२,३३रजिस्टरवरील निकामी साहित्य निर्लेखीत करावे.
२१)शालेय अनुदानातून घेतलेल्या टिकाऊ साहित्याची नोंद जंगम मालमत्ता रजिस्टरवर घेतल्याचा उल्लेख चिकटबुकातील पावतीमागे करावा.
२२)मूल्यमापन नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात.
* मा. श्री सोनटक्के साहेब(गशिअ)-
१)PRC कालावधीत परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये.
२)शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा.
३)स्वच्छतागृह सुस्थितीत असावे.(पाणी,Napkin ठेवावे) .
४)पिण्याचे पाणी टाकिमध्ये ठेवावे, त्यात टाकण्यासाठी  mediclor चा वापर करावा.
५)कीचनशेड स्वछ व टापटिप असावे.
६)मुलांना रांगेत बसवून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून वाढून घ्यावे.
७)जेवणापूर्वी अर्धा तास चव घ्यावी.
८)आहार नमुना दुसर्‍या दिवसापर्यंत मुअनी आपल्या ताब्यात ठेवावा.
९)लोकसहभागातून प्राप्त साहित्याची नोंद ठेवावी.
१०)१४व्या वित्त आयोगातून gas जोडणी, वीज देयके, digital classroom आदीसाठी निधी प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा.
११)लोकसहभागातून, जुने TV संच वापरून शाळा DIGITALकराव्यात.
१२)digital classroom, e-learning वापराची नोंद नोंदवहीमध्ये करावी.
१३)१००टक्के शाळांनी सेमी इंग्लिशचा अभ्यासक्रम राबवावा. इ. १ली च्या वर्गाला सेमी माध्यमाची गणिताची पुस्तके मुअनी विकत घेऊन द्यावीत(सेमी नसलेल्या शाळांनी)
१४)शिष्यवृत्ती प्रस्ताव योग्य त्या लाभार्थ्यांचाच पाठवावा.
१५)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आतापासूनच सुरू करावे.
१६)शा. शिक्षणाच्या तासिकेत विद्यार्थ्यांचे खेळ घ्या.
१७)TC book नमुना अद्यावत ठेवावा,त्यावर व्याकरणद्रुष्टया शुद्ध नावे लिहावित.
एकंदरीत निलंगा तालुक्यातील गशिअ नी घेतलेली मुअ ची व तब्बल पाच तास चललेली ही पहिलीच बैठक असावी.
कार्यतत्पर असणारे गशिअ व त्यांच्या जोडीला तसेच सक्षम विस्तार अधिकारी जणू क्रुष्णार्जूनाची जोडीच भासत होते. उभय द्वयांनी आपल्या खुमासदार वओघवत्या शैलीत अत्यंत तळमळीने ,आपल्या अनुभवाच्या आधारे सर्व मुअना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व या क्षेत्रातील बारकावही समजावून सांगितले.
मा. सोनटक्के साहेबांच्या कार्याची  पावती तर तेथेच उपस्थित सेवानिवृत्त शिक्षिका तथा जि प सदस्या मॅडमनी आपल्या मनोगतातून दिली. त्या म्हणाल्या असे अधिकारी आमच्या तालुक्याला लाभावेत हे माझे स्वप्न होते, ते आता साकार झाले आहे. त्यांच्या अनुभवाचा पुरेपुर फायदा घेऊन तालुक्याचा नावलौकिक वाढवू या.
आतापर्यंत जिल्ह्यात त्रुप्ती अंधारे मॅडमच्या कार्यीची ख्याती ऐकूण होतो. परंतु तसेच कार्य करुन घेण्याची हातोटी असलेले अधिकारी जिल्ह्यात दुसरेही आहेत याची प्रचिती आज आली.
खरोखरच निलंगा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडणार आहे हे निश्चित!
शब्दांकन:श्री टेकले विवेक किशनराव (मुअ कन्या प्रा शाळा निटूर)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...         
💎💎💎💎💎💎💎💎

     🌷इ.२री साठी 🌷

💎  २५ ते ३०   -    अ               
💎  १९ ते २४    -   ब
💎  १३ ते १८    -   क
💎   ०  ते १२      -  ड
                         
        श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎

🌷इ.३री ४थी 🌷

🎯३३ ते ४०     -  अ
🎯२५ ते ३२      -  ब
🎯१७ ते २४     -    क
🎯० ते १६        -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷५ वी ६ वी साठी 🌷

🚩   ४१ ते ५०    -    अ
🚩   ३१ ते ४०   -     ब
🚩   २१ ते ३०    -   क
🚩   ० ते २०     -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷७ वी ८ वी साठी🌷

🎯  ४९ ते ६०     -  अ
🎯  ३७ ते ४८   -    ब
🎯  २५ ते ३६     -  क
🎯  ०० ते २४   -   ड

💎💎💎💎💎💎💎

Monday, 3 September 2018

स्वच्छतेचे 6 संदेश

       स्वच्छतेचे सहा संदेश

१. स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे .
२. पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवावे .
३. पिण्याचे पाणी घेण्यासाठी स्वच्छ ओगराळ्याचा वापर करावा .
४. पिण्याचे पाणी (माठ ,पिंप ,हंडा )तिवईवर अगर स्टंडवर ठेवावे .
५. बाळाची शी धुतल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत  .
६. शौचास(संडास )जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावावेत.