प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, 26 August 2018

*‼प्रकृतीचे तीन कडक नियम जे सत्य आहे.‼*

*1 प्रकृतिचा  पहिला  नियम*

सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी बुद्धीत *सकारात्मक* विचार  भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात.

*2 प्रकृतिचा दूसरा  नियम*

*ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.*

सुखी *सुख* वाटतो.
दुःखी *दुःख* वाटतो.
ज्ञानी *ज्ञान* वाटतो.
भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.
घाबरणारा *भय* वाटतो.

 *3 प्रकृतिचा तिसरा नियम*

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण

*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात.
*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो.
*बातचित* पचली नाही तर  *चुगली* वाढते.
*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो.
*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते.
*गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो.
*दुःख* पचले नाहीतर  *निराशा* वाढते.
आणि *सुख* पचले नाही तर  *पाप* वाढते.

Saturday, 25 August 2018

पंचायत राज समिती,PRC

_पंचायत राज समिती प्राथम्याच्या पार्श्वभूमीवर_ *लातूर तालुक्यातील मुख्याध्यापकांची पूर्वनियोजनासाठीची बैठक संपन्न*
_गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वाढवले मुख्याध्यापकांचे मनोबल_

🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

*लातूर :* (दि. २५ ऑगस्ट , २०१८)
               पुढील महिन्याच्या १० ते १२ तारखेदरम्यान लातूर जिल्ह्यात येऊ घातलेल्या पंचायत राज समितीला सामोरे जाताना करावयाच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता कशी करावी किंवा काय केली याचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापकांची एक दिवशीय कार्यशाळा येथील कॉक्सीट कॉलेजमध्ये संपन्न झाली. *गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे व शिक्षण विस्तार अधिकारी मा. शिवाजीराव  पन्हाळे* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत खालील बाबींची सखोल चर्चा झाली.

📌पंचायत राज समितीचा लातूर जिल्हा दौरा *१० ,११ , १२ सप्टेंबर २०१८*

📌१० सप्टेंबर जिल्हा परिषद स्तरावर साक्षनोंद

📌 *११ सप्टेंबर प्रत्यक्ष क्षेत्र भेटी ( शाळांसह ).* सायंकाळी विभागप्रमुखांची बैठक

📌१२ सप्टेंबर पुन्हा खातेप्रमुखांची बैठक ( जिल्हास्तर )

*शाळास्तरावर करावयाच्या बाबी ...*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🔮शालेय परिसर स्वच्छता

🔮शालेय रंगरंगोटी , वर्गातील तळफळे रंगवणे , फरशीवरील रंगकाम , शाळेचे नाव दर्शनी भागावर स्पष्ट असावे. नसल्यास  तात्काळ रंगवून घेणे.

🔮सर्व प्रकारची अनुदाने खर्चाच्या विवरणासह दर्शनी भागावर लावावे

🔮शाळा अनुदान , दुरुस्ती अनुदान , शिक्षक अनुदान यांचा विनियोगा बाबतचे सर्व रेकॉर्ड तयार ठेवावेत.

🔮शा. पो. आ. , 4% सादिल व SSA  चे पासबुक , चिकटबुक , कीर्द अद्ययावत ठेवावे.

🔮सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्यांचे रेकॉर्ड तयार ठेवावे.

🔮शा.पो.आ. आठवड्याचा मेन्यू चार्ट शाळेच्या दर्शनी भागावर लावावा. डिजिटल असल्यास उत्तम

🔮हॅण्ड वॉश स्टेशन सुरू असणे अत्यंत महत्त्वाचे. नसल्यास तात्काळ दुरुस्ती करावी. हात धुण्यासाठी लिक्विड , साबण ठेवावे. हात पुसण्यासाठी नॅपकिन ठेवावेत.

🔮पिण्याचे पाणी मेडिक्लोअरसह टाकीमध्ये भरून असावे. ग्लास , ओगराळे स्वच्छ असावे. मिनरल वॉटरचे जार सर्व मुलांसाठी ठेवता आले तर उत्तम

🔮स्वच्छता गृह चालू स्थितीत असावे. कुलूपबंद नसावे. नियमित वापर करावा. आवश्यकता असल्यास किरकोळ दुरुस्ती करावी. ( २७,२८,२९ ऑगस्ट संपूर्ण तालुकाभर शौचालय दुरुस्ती मोहीम)

🔮विद्युत जोडणी व मांडणी सुस्थितीत असावी.

🔮RTE 2009 चे निकष पूर्ण करावेत.

🔮मुख्याध्यापक कक्ष , वर्गखोल्या , किचन शेड , स्वच्छता गृह , पिण्याचे पाणी , ग्रंथालय आदी अद्ययावत स्थितीत असावे.

🔮सर्व समित्या अद्ययावत करून डिजिटल कराव्यात. दर्शनी भागात लावाव्यात.

🔮तंबाखूमुक्त शाळा संचिका तयार ठेवावी. तंबाखूमुक्तीचे बॅनरही लावावे.

🔮मुख्याध्यापकांनी शिक्षकनिहाय लॉग बुक भरावे. शिक्षकांच्या वैयक्तिक संचिकाही तयार ठेवाव्यात.

🔮शिक्षक दैनंदिनी , टाचण वही १५ जून पासून अद्ययावत करावी. आतील सर्व नोंदी कराव्यात.

🔮वर्गशिक्षकांनी विद्यार्थी संचिका , संचयी नोंदपत्र सुस्थितीत ठेवावेत.

🔮वयानुरूप प्रवेशाची मुले असल्यास त्यांचा सर्व दस्तऐवज तयार ठेवावे.

🔮प्रवेशपात्र विद्यार्थी यादी , प्रत्यक्ष झालेले प्रवेश , आलेल्या टी.सी. , गेलेल्या टी.सी. आदींचे रेकॉर्ड तयार ठेवावे.

🔮 प्रत्येक वर्गात आरसा , कंगवा , सुगंधित प्रसाधने , नखाळी (नेल कटर) , नॅपकिन ठेवावे.

🔮शा.पो.आ.चे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे. पूरक पोषण आहार कोणत्याही परिस्थितीत द्यावाच. आहार शिजवताना शासन स्तरावरून निर्धारित प्रमाणानुसार भाजीपाला वापरावा. नमुना दुसऱ्या दिवसाच्या दुपारपर्यंत ठेवावा.

🔮 जिल्हा धूरमुक्त करण्यासाठी १४व्या वित्त आयोगातून शाळेसाठी तात्काळ LPG गॅस कनेक्शन घ्या. ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करा. ग्रामसेवक / सरपंच प्रतिसाद देत नसतील तर गशिअ कार्यालयाशी संपर्क साधा.

🔮 परिपाठ वैविध्यपूर्ण करण्यावर भर द्यावा. *सोम-मंगळ English* , _बुध-गुरू हिंदी_ आणि *शुक्र-शनी मराठी* प्रार्थना , गाणी घ्यावेत.

🔮परिपाठात हात धुण्याच्या सहा पायऱ्या घेण्यात याव्यात.

🔮ड्रेस कोड : - *शिक्षक* -पांढरा शर्ट व काळी पॅन्ट आणि *शिक्षिका* - लाल काठाची पांढरी साडी.(PRC चे तीन दिवस हाच गणवेश परिधान करावा.)

🔮 विद्यार्थी वाचनालयाचे देवघेव रजिस्टर अद्ययावत असावे. विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकांची नोंद त्यात असावी. साठा रजिस्टरही अद्ययावत असावे. उपलब्ध जागेनुसार वाचन बाग , वाचन कुटी , वाचन कट्टा , वाचन दोरी कार्यान्वित करावी.

🔮रचनावादी कृतींचा भरपूर सराव घ्यावा. पारंपरिक पद्धतीने अध्यापन करू नये.

🔮सर्वांनी मुख्यालयी राहात असलेबाबतचे स्वयंघोषणापत्र द्यावे.

🔮प्र. शै. महाराष्ट्र संबंधाने आवश्यक त्या सर्व शासन निर्णयांची माहिती ठेवा.

🔮 विद्यार्थ्यांना दिलेली वृक्षसंवर्धन कार्डे भरून आवश्यक त्या नोंदीसह तयार ठेवावीत.

🔮प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेतलेल्या सर्व चाचण्यांचे पेपर , उत्तरपत्रिका व नोंदवह्या एकत्रित करून ठेवाव्यात.

🔮मोफत पाठ्यपुतके वाटपाच्या सर्व नोंदी ठेवाव्यात. पुस्तकांचे समायोजन तात्काळ केंद्रात द्यावे.  एकही पुस्तक शिल्लक नाही याचे हमीपत्र केंद्रात द्यावे.

🔮शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा यांचे निकाल , शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या संकलित स्वरूपात ठेवावी.
             शा.पो.आहार अधीक्षक वर्ग २ मा. शिंगडे साहेबांनी शालेय पोषण आहार योजनेबाबतच्या अत्यावश्यक बाबींची माहिती दिली. पंचायत राज समितीला सामोरे जाताना काय तयारी करावी याचेही सुंदर विवेचन केले.
              *पंचायत राज समितीचा दौरा आपल्यासाठी आपले काम दाखवण्याची सुवर्णसंधी असल्याचा  सकारात्मक विचार करून सर्व मुख्याध्यापकांनी वरील सर्व बाबींची शाळास्तरावर पूर्तता करून लातूर तालुक्याच्या शैक्षणिक लौकिकाबरोबर नेटक्या कार्यालयीन कामकाजाचाही लातूर पॅटर्न बनवावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे यांनी केले.*
              दरम्यान *काRवां* ग्रुपच्या वतीने सीड बॉल बनवण्याचे प्रात्यक्षिक घेतले गेले. शिक्षक व अधिकारी यांनी प्रत्यक्ष सीड बॉल निर्मितीचा आनंदही घेतला. ही मोहीम आपल्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
               याच कार्यक्रमात *जि.प.प्रा.शा. पारूनगर मुरुडचे कल्पक मुख्याध्यापक दिलीपराव जाधव* संपादित *पंख नवे गगन नवे* हा विद्यार्थ्यांच्या साहित्याविष्काराचा पुस्तकरूपी ठेवा तालुक्यातील सर्व शाळांना सस्नेह भेट देण्यात आला.
          या बैठकीच्या यशस्वीतेसाठी *मा. शिवाजीराव पन्हाळे , मा. पोतदार साहेब , मा. डी. सी. गायकवाड , मा. जी. आर. घाडगे , मा. बालाजी कोळी , मा. मेनगुले साहेब , सर्व विषय साधन व्यक्ती , विशेष शिक्षक व शिक्षण विभागातील कर्मचारी* आदींनी मेहनत घेतली.

_*सारांश ,*_
       _*पंचायत राज समितीच्या अनामिक दडपणाखाली असलेल्या मुख्याध्यापकांसाठी आजची बैठक नवचेतना देणारी ठरली.....*_

                 
                               ✒             
               *- विद्यासागर काळे*

Tuesday, 21 August 2018



💥🇮🇳 *"भाई-भाई ग्रुप,चाकूर" तर्फे जिल्हा परिषद,बोथी शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊचे वाटप.* 🇮🇳 💥

_बोथी:-७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सकाळी  गावातून प्रभातफेरी काढण्यात आली व मुख्याध्यापक श्री.जमादार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमास विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,केशवराव पाटील विद्यालय संपूर्ण स्टाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता १ ली ते ७ वी च्या ५३ विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण स्पर्धेत सहभाग नोंदवला.यावेळी तंबाखुमुक्तिची शपथ घेण्यात आली.SMC अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली तर भाई भाई ग्रुप, चाकूर तर्फे अंगणवाडी क्रमांक १ व २ चे विद्यार्थी व जि.प.बोथी शाळेतील सर्व विद्यार्थी अशा एकूण २३५ विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी भाई भाई ग्रुप चाकूर चे अध्यक्ष शेख आसिफ, उपाध्यक्ष कुरेशी दाऊत,सचिव समाधान गायकवाड, किशोर भालेराव, प्रासाद कसबे,देवा कसबे,विजय मस्के,नय्युम कुरेशी, शेख सादिक,आलिम कुरेशी, एजाज कुरेशी,कृष्णा कांबळे इ.पदाधिकारी उपस्थित होते.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी Happy Clap ने सर्व मान्यवरांचे व भाई-भाई ग्रुपचे आभार मानले._

🤝🏻 *बोथी टिम:-*

🔸श्री.जमादार गणपती
🔹श्री.भोसले अविनाश
🔸श्री.जोशी  गोपाळ
🔹श्री.रायफळे बस्वराज
🔸श्री.मुंढे साधु
🔹श्रीमती स्वामी मंगल
🔸श्री.सोदले जयराज

🚸🎈🚸🎈🚸🎈🚸🎈🚸🎈🚸

*विषय - विद्यार्थ्यामधे वाचन लेखन कौशल्यांचा विकास कसा घडुन आणावा? यासाठी कोणते नाविन्यपुर्ण उपक्रम राबविता येईल?*


          *♦चर्चा वृतांत ♦*

*♦१) विद्यार्थी अप्रगत राहण्याची कारणे कोणती आहेत?*

👉 1) विद्यार्थ्याची अनियमितता
2) पालकाचे उदर निर्वाह साठी स्थलातर मुलाला एकटे पणा जाणवतो

👉अर्थिक परिस्थिती, सामाजिक  व परिवारातील अनुभव, भाषेचा अडसर, व्यंगाचे निदान न होणे.

👉 पालक उदासीनता व विद्यार्थी मानसिकता, घरी अभ्यास करत नाही, सततचे आजारीपण व अतिलाड

*♦२) अप्रगत मुलांमध्ये वाचन लेखन कौशल्यांचा विकास कसा घडुन आणावा?*

👉 प्रथम विद्यार्थी शाळेत टिकून राहण्यासाठी त्याच्या मनातील शाळेची भीती दूर करावी लागेल त्यासाठी शिक्षकाला विद्यार्थ्यांचा मित्र बनावे लागेल जिव्हाळा निर्माण करावा लागेल

👉 जास्तीत जास्त सरावावर भर, शैक्षणिक साहित्याचा वापर वाढविणे गरजेचे

👉 काही मुले शाळेत येतात पण वर्गात न बसता भांवडासोबत दुसऱ्या वर्गात रमतात
आपल्याला अशी मुले अगोदर प्रवाहात आणण्यासाठी शक्य तो ई लर्निग तास उपयोगी

👉 To make groups of student.and gives extra exercises. Teacher gives personally attention to the such a student.

👉 मुळाक्षरे शिकवण्यासाठी प्रथम आकर्षक साहित्याचा उपयोग घ्यावा लागेल की जेने करुण स्वत: विद्यार्थी हाताळतील आनन्द मनोरंजनात्मक पध्द्दतीने शिकतिल

👉 गटागटानै बसवुन चुरस निर्माण करावी

👉 भाषिक खेळ घ्यावेत.. खेळाविषयी मुलांना आकर्षण असतेच

👉जी मुले वाचत नाहीत त्यांचा एक वेगळा गट करावा किंवा वर्ग करून त्यांना मार्गदर्शन करावा.

👉 एक मात्र सर्वांनी हे लक्षात घ्यावे की मुळाक्षरे शिकवतान्ना आधीचि शिकवलेली अक्षरेही नविन अक्षर शिकवतांना सरावात घ्यावी अन्यथा होते काय की पुढे पाठ मागे सपाट

👉 मुलांना बोलण्याची आणि ऐकण्याची मुबलक संधी वर्गात मिळायला हवी. वाचन-शिक्षणाचा पाया त्यातून घातला जातो.

*♦३) तिसरा मुद्दा - श्रवण विकसित करण्यासाठी काय करता येईल? कोणते उपक्रम राबविता येईल?*

👉 चांगल्या आवाजातील ध्वनिफीती ऐकवणे

👉 वाचन शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच मुलाला श्रवणाचेही भरपूर अनुभव मिळायला हवेत. ऐकलेल्या आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता त्यातून विकसित होते. उदाहरणार्थ – चाक-चाके, पाट-पाठ, काठ-खाठ, वास-पास यातील नेमका फरक ऐकण्याची क्षमता.

👉 गाणी कृतीसह व ppt बनवले पाहिजे

👉 यमक जुळणारी वाक्ये असणार्‍या गोष्टी मुलांना ऐकायला मिळायला हव्यात. उदाहरणार्थ – एक होता मासा. त्याला दिसला ससा. तो सशाला म्हणाला, “तू आज इकडे कसा?”

👉 मुलाना गोष्टी खूप आवडतात नंतर प्रश्न विचारावे

👉 ज्यांचा शेवट सारखा ऐकू येतो. असे शब्द मुलांना शोधायला सांगावे. उदा- पाणी-गाणी-राणी-नाणी;  किंवा पान-मान-छान-लहान-कान.

*♦४) चौथा मुद्दा - संभाषण कौशल्य विकसित कसे करता येईल? त्या साठी तुमच्या अभिनव कल्पना कोणत्या?*

👉 मुलांना बोलके करणे गरजेचे, त्यामुळे ते बोलतात...

👉 One picture is equal to thousands of words.. चिञ वर्णन खुप महत्वपूर्ण

👉 बोललेला शब्द आणि लिखित शब्द यात अंतर असते. मूल जर प्रमाणभाषा बोलत नसेल, एखादी बोली बोलत असेल, तर हे अंतर आणखी वाढते, आणि वाचन शिकणे आणखी अवघड होते. अशा परिस्थितीत मुलानेच सांगितलेला मजकूर लिपिबद्ध करण्याने या अडचणीचे प्रमाण कमी होते कारण बोललेल्याचा लिहिलेल्याशी संबंध जोडला जातो. आपणच बोलते ते कागदावर उतरलेले मुलांना दिसते.

👉 🌷संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी

नाट्यगीत, नाट्टीकरण यावर भर द्यावा

क्षेत्र भेटीद्वारे औपचारिक संभाषण विकसित करण्यात हातभार लागेल
जसे बॅक, पोष्ट आॅफिस

👉संभाषण कौशल्य साठी विविध सण वार तुम्ही कसे साजरे करता ते सांगण्यास सांगणे
तुम्हाला कोणत्या ghosti आवडतात ते सांगन्यास सांगने
कविता म्हणणं
तुम्ही t v  काय बघता ते सांगने

👉 नंदी या शब्दातील न या अनुस्वार लिहताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो.मूळ शब्दापेक्षा शब्दाचा अर्थ वेगळा होतो.

👉 विविध व्यवसाय करणाऱ्या चा नकला करुन घेणे

👉 🌷मुलाना गोष्टी सांगण्याची संधी
द्यावी
🌷बालसभा घ्यावा

वेळेवर विषय देऊन बोलण्यास सांगावे


*♦५) पाचवा मुद्दा - वाचन कौशल्य कसे विकसित करता येईल? अप्रगत किंवा नविन शिकणार्या मुलांमध्ये वाचन कौशल्य कसे विकसित करता येईल?*

👉 वाचनपूर्वतयारीच्या टप्प्यावरच्या कृती साधारणपणे या प्रकारे कठीण होत जायला हव्यात :

-चित्र-जोड्या

-आकार-जोड्या

-अक्षराशी साम्य असलेल्या आकारांच्या जोड्या

-शब्दजोड्या

👉 शिक्षकाचे स्वतःचे वाचन शुध्द  असणे गरजेचे

👉 मुलांची घरची भाषा कोणती याचा पण विचार करावा

👉 वाक्यांमधील शब्द पत्त्यांवर लिहून त्यांची वाक्य बनवायला मुलांना प्रोत्साहन द्यायल हवे. उदाहरणार्थ –

बाबा  काल  आले.

मामा  आज  आले.

शब्दपत्त्यांमधून वाक्ये बनवणे हे वाचन-लेखन दोन्ही क्षमतांच्या विकासासाठी महत्त्वाचे.

👉 बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे नेण्याचे नियोजन असायला हवे.

👉 आशय जरी क्रमिक पुस्तकांमधला असता, तरी त्यातील शब्द गाभ्याशी मानून, मुलांनी ते स्वतःच्या वाक्यांत वापरावे यासाठी शिक्षकाने प्रोत्साहन द्यायला हवे. शब्दांशी खेळत वेगवेगळी वाक्ये मुलांनी बनवली आणि वाचली तर वाचन शिकण्याच्या प्रक्रियेला मदत होते.

👉 वाचन दोषांचा अभ्यास  शिक्षकाला  करायला हवा.

👉 वाचन दोष सुधारण्यासाठी ध्वनीमुद्रणाचा वापर करता येईल

👉 कपाटात हजार पुस्तक असली तरी काय कामाचे? वाचन कोपरा मध्ये २५ भारी

👉 वाचताना अर्थपूर्ण वाचन गरजेचे आहेच वेगवेगळ्या शब्दावर जोर दिला तर अर्थही बदलतो .
वाचनकोपऱ्याचा खुप उपयोग होतो

👉 बोली भाषेतून अध्यापन करावे तसेच प्रमाण भाषेतील पर्यायी शब्द त्याच वेळेस लक्षात आणून द्यावेत। प्रमाण भाषा व् बोलीभाषेतिल शब्द जोड्या लावणे खेळ घेता येईल

👉 एक शब्द देऊन त्याला अनुसरून इतर शब्द.
उदा. आकाश- निळे, चांदण्या, ढग, स्वच्छ,इ. संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी.

👉 Reading should be interesting or the way of introducing reading.if it is traditional boring method pupils became harassed by it

👉 त्याने बोललेले आपण फळ्यावर लिहावे.. सहज च वाचन शिकते मुल

👉 वाचन घेत असताना जर शब्दात एक लिंकता असेल तर वाचनात मुलांना रुची येते

👉 इंग्लिश साठी 👉बाजारातुन विकत घेतलेले सामनाचे बॉक्सेस जमा करुण शाळेत भिंतीवर चिटकावन जसे colgate. fair & lovely निच्चित शब्द वाढ होइल

👉 विचारपूर्वक निवडलेली, मांडलेली, रंगीत चित्रे असलेली पुस्तके शाळेत असायला हवीत. ती कुलूपबंद नसायला हवीत

👉 शब्दाने सुरुवात करुन घेऊन पाहिलं.
पण पालक घरी अक्षरेच घेतात.
आणि तसाच आग्रह करतात.
पण शब्द आणि मग  अक्षर ही पद्धतच योग्य

👉 वाचनासा ठी भाषिक खेळाची आपल्याला खुप मदत होऊ शकते

👉 शब्दाने सुरुवात करुन घेऊन पाहिलं.
पण पालक घरी अक्षरेच घेतात.
आणि तसाच आग्रह करतात.
पण शब्द आणि मग अक्षर ही पद्धतच योग्य

*♦६) लेखन कौशल्याची पायाभरणी कमकुवत का राहते?*

👉 लेखन  कौशल्यात विद्यार्थी  अनेक  चुका  करतात. त्यासाठी  येणाऱ्या  अडचणींचा  आपण शोध  घेतला  पाहिजे असे  मला  वाटते सरजी.
विद्यार्थी  जिवनात सुंदर  हस्ताक्षराचे महत्त्व  अनन्य  साधारण  आहे. परिक्षा  व  विद्यार्थी  याचा अखंड  संबंध  सुरू  असतो. परिक्षेत  सुयश  प्राप्त  करण्यासाठी  सुंदर  हस्ताक्षर  प्रभावी  माध्यम  आहे.
वि.ना अभ्यासात  आवड  निर्माण  करण्यासाठी  वि.ची आकलन क्षमता  विकसीत  करण्यासाठी  लेखन  हे अविभाज्य  घटक  आहे.

👉 श्रवण आणि वाचन कौशल्ये विकसित नसल्यामुळे.. लेखन करण्याचा कंटाळा निर्माण होतो

👉 वि.अक्षरा-अक्षरात व  शब्दा मंध्ये तूटकपणा ठेवत  नाही.
काही  मुले  अक्षर  वळणदार  काढतात  पण -हस्व दिर्घ  वेलांटी  उच्चार  1ली वेलांटी की  2 री वेलांटी हे त्याच्या  लक्षातच  येत  नाहि.
वाक्य  लिहीतांना अक्षरांत  व  शब्दात  सारखा आकार  दिसत  नाही.

*♦७) लेखन कौशल्याचा विकाघडुनआणण्यासाठी कोणते उपक्रम राबविता येईल?*

👉 सुंदर  हस्ताक्षरातूनही वि.चे लेखन  कौशल्य  विकसित  करता येते.
यातीलच त्याच्या  चूका , अडचणीत  कारणे व त्यावर उपाययोजना  करणे  आवश्यक आहे. सुंदर  हस्ताक्षरातील या  चूचूकडे लक्ष  दिले  नाही  तर त्या  वाढतच जाऊन  मराठी भाषेचे  गांभिर्य लक्षात  येणार नाही.
त्यासाठी  सर्व  मुळाक्षरांचा  सराव करून  मग  शब्द  वाक्य  सुविचार  म्हणी  छोटे छोटे  बोधवाक्य  क्रमिक  पाठय़पुस्तकातील परिच्छेद  फळ्यावर लिहून  वि.कडून लेखन  करू  शकतो.

👉 अक्षरांचा आकार काढायला मुलांना त्रास वाटतो. फलकलेखन नियमित केल्यामुळे विद्यार्थी आवडीने लेखन करतात.द्वितीय सत्रात १ ली ची मुले व्यवस्थित लेखन करू लागतात.

👉 लेखनात अचूकता आणण्यासाठी उच्चारण करुन लिहिण्यास सांगावे

👉 मुलांना सहज प्रवृत्ति ने लिहायला सांगावे

👉 दररोज मोजका सराव करुन घेणे जेणेकरुन चुका कमी होतील

👉 शिक्षकांनी आदर्श लेखन करून दाखवावे

👉 मुलांना स्वतः विषयी लिहायला सांगावे

👉 चुका आणि शिका या उक्तिप्रमाने मार्गक्रमन असावे

👉 एकाच वहिवर जर नियमित सराव घेतला तर लेखनासोबत वाचन व हस्ताक्षर सुध्दा सुधारते

👉 शुद्ध लेखन तपासले जात नाही.. ही वास्तविकता आहे... मुलांच्या बारीक बारीक चुकाकडे आवर्जुन लक्ष देणे आवश्यक..

👉  त्यासाठी ग्रुप करावेत.. गटप्रमुखाचे आपण स्वतः चेक करावे नंतर गटातील इतरांचे तपासण्यास सांगावे. वेळ वाचतो.

👉 लेखन कौशल्याचा विकास करण्यासाठी कित्ता वही

👉 सुविचार तक्ते कींवा चार्ट तयार करायला सांगावे
नंतर उत्तम नमुने वर्गात चिटकवून प्रोत्साहन देणे

👉 श्रुतलेखनाचा खूप फायदा होतो

*♦८)शेवटचा मुद्दा - अप्रगत मुलांमध्ये सुधारणा करण्यासाठी è learning  चा वापर कसा करावा?*

👉 è learning चा वापर अप्रगत मुलांचे श्रवण, संभाषण, वाचन, लेखन या साठी ...
वि.ना संगणकाची ओळख करून देणे.
संगणकाच्या  मदतीने  अवघड  वाटणारा  विषयांश समजून  देणे.
वि.ना  संगणक  चालू  करणे
प्रोग्राम  सुरू  करणे.
संगणक  किबोर्ड हाताळणे  अभ्यास  क्रमाचा भाग श्रवण  करून  चित्र  बघून आशय  वाचून  ज्ञान समृध्द  बनवू  शकतो.

👉 ई लर्निग १००%प्रभावी
छोटे व्हिडीओ दाखवले व वाचन
चित्र ,शब्द व उच्चार पक्का होतो
मी हेच वापरून अध्यापन
करतो ,परिणाम चांगला
वर्षात एकटाच असताना ई लर्निग मुळेच कंट्रोल व टिचींग

👉 यामुळे  कठीण  संकल्पना  मुलांच्या  डोक्यात  उतरून  अध्ययन अध्यापन  प्रक्रिया  मनोरंजक  व आनंददायी  होऊ  शकते.
कमी  श्रमात  जास्त  फळ  मिळेल.
100 % उद्दिष्टे  साध्य  होण्यास  मदतच  होईल.

👉 ई लर्निग मुळे  मुलं  + - 1 1 2  1 2 3 ....अंकज्ञान चढता  उतरता  क्रम  इ.गणिती क्रिया  पर्यावरणाची माहिती  कि  बोर्डाच्या  मदतीने  संगणकावर  नाव लिहणे   अक्षरांचा आकार  वळण  .सि.डी. टाकून  अभ्यास  करू  शकतो  व  त्यामुळे  नाविन्य  येईल.

👉 मुलांचे संभाषण, वाचन याचे व्हीडीओ बनवावे व मुलांना दाखवावे.. आनंदी आनंद गडे.. मुलांना खुप आनंद होतो... सहज शिकतील..