प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, 27 July 2018







*बोथी:- जि.प.प्रा.शाळा,बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे गुरूपोर्णिमेनिम्मित:-*

*१] कुंडीतील रोपे लावण्यात आली.* 🌱🌱

*२] विद्यार्थ्यांनी सर्व गुरूजनांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.* 💐💐

*३] शालेय पोषण आहार अंतर्गत शेंगदाणा गुळचिक्की वाटप करण्यात आली.* 🍫🍫

💥 *बोथी टिम:-*

*_जमादार सर,भोसले सर,जोशी सर,मुंढे सर,रायफळे सर,स्वामी मॅडम,सोदले सर._*

💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠

Wednesday, 25 July 2018

🙏 🌺 *पंढरपूरचा महिमा*🌼🌸


🌰 *चंद्रभागा.....*

वारकरी  संप्रदायात  चंद्रभागेला  खूप  महत्व  आहे.  आधी स्नान  चंद्रभागेचे  मग  भगवंत  कथा  त्यानंतर  विठ्ठलाचे  दर्शन..  एक  वेळेस  विठ्ठलाचे  दर्शन  नाही  झाले  तरी।   चालेल  पण  चंद्रभागेचे  स्नान  झाले  पाहिजे.  एवढे  श्रेष्ठत्व  चंद्रभागा  नदीचे  आहे. देवांनी  तुकाराम  महाराजांना  विचारले,  काय  पाहिजे  तुम्हाला?  जे  पाहिजे  ते  मागा...  त्यावर  तुकोबा  म्हणाले,  देवा  मला  काहीही  नको.  चंद्रभागेचे   स्नान  घडू  दे... एवढे वारकरी  संप्रदाय  आणि  चंद्रभागेचे  जवळचे  नाते  आहे.  भगवान  शंकर  ऋषींना सांगतात कि  या  भूतलावावरील  सर्व  तीर्थे  रात्री  बारा  वाजता  भक्त  पुंडलिकासमोर  स्नान  करून  पवित्र  होऊन जातात.  सर्व  तीर्थांना  पवित्र  करणारे  तीर्थ  कोणते  असेल  तर  ती  चंद्रभागा. नुसती  चंद्रभागा  नदी पहिली  तरी  भूतलावरील सर्व  तीर्थांचे  स्नान  केल्याचे  पुण्य मिळते. सर्व  दोष  घालवण्याची  शक्ती  चंद्रभागा  दर्शनात  आहे.  यामुळे  सर्वोत्कृष्ट  क्षेत्र  आणि  तीर्थ  म्हणजे  चंद्रभागा  आहे.


🌰 *भक्त पुंडलिक....*

वारकरी संप्रदायात  भक्त पुंडलिकाला आद्य स्थान  आहे. भक्त  पुंडलिकाचे  दर्शन  केल्याशिवाय  विठोबाचे   दर्शन  रुजू होत  नाही  अशी  वारकरी  संप्रदायाची  धारणा आहे.  त्यामुळे  भाविक  मोठ्या  श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे  दर्शन  घेतात. पुंडलिक मंदिरासमोर  लोहदंड  तीर्थ  आहे कि त्यामध्ये  दगडी नाव पाण्यावर  तरंगते. त्याविषयी  अशी  आख्यायिका  सांगितली  जाते  कि  गौतम  ऋषींनी  इंद्राला  शाप  दिला  तेव्हा इंद्राला भग पडली. त्यातून  मुक्त होण्याचा  मार्गहि  ऋषींनी  सांगितला  भूतलावार  ज्या तीर्थामध्ये  लोहरूपी  पाषाण  तरंगेल त्या तीर्था मध्ये स्नान  केल्यानंतर  मुक्ती  मिळेल . तेव्हा  फिरत  फिरत  इंद्रदेव  दंडक  अरण्यात आले असता पाषाण लोह्दंड तीर्थामध्ये  तरंगला . इंद्राने   त्यामध्ये  स्नान  केले. देव  भगातून  मुक्त झाला.  तो  पाषाण  म्हणजे  दगडी नाव. ती पाहण्यासाठी  भाविकांबरोबर  देश  विदेशातून  अभ्यासकही  येतात.


🌰 *गोपाळपूर येथील कृष्ण मंदिर....*

पंढरपूर  पासून  दोन किलो मीटर  आंतरवर  असण्याऱ्या गोपाळपूर  येथील  कृष्ण मंदिराला  खूप  महत्व  आहे  कारण  श्रीकृष्ण  येथे  सवंगड्या  सोबत  खेळला  त्याने  गोपाळ काला केला  यामुळेच  पौर्णिमे दिवशी  संतांच्या  पालख्या  इथे  येतात  गोपाल  काला  करतात  आणि  आषाढी  यात्रेच्या   नेत्रदीपक  सोहळ्याची  सांगता  होते  याच  ठिकाणी  पांडुरंग  संत  जनाबाईला   जात्यावर  दळण  दळू  लागला  इथेच  जनाबाईची  संसार  पाहायला  मिळतो  या  कारणांमुळे  भाविक  न चुकता  कृष्ण  मंदिराला  भेट  देतात  जनाबाईची  संसार  पाहतात आणि  आनंदानी  गावी  परत  जातात


🌰 *लखुबाई....*

माता  रुक्मिणी  श्रीकृष्णावर  रुसून  पंढरपूरला  आली  आणि  दिंडीर   वनात  लपून  बसली .   लपून  बसली  ती  लखुबाई  असे  सांगितले  जाते.  लखुबाई  दर्शनला  भाविक  आवर्जून  येतात, विशेषतः  महिला.  त्यामागे  अशी  धारणा  आहे  कि  दिंडीर  वनातील  लखुबाईचे  अर्थात  लपून  बसलेल्या  माता  रुक्मिणीचे  दर्शन  घेतल्याने  पतीला  दीर्घायुष  लाभते,  संसार  सुखाचा  होतो. त्यामुळे  महिला  भाविक  मोठ्या  संख्येने  दर्शनाला  येतात.


🌰 *नामदेव पायरी...*

 वारकरी  संप्रदायाच्या  प्रसार  आणि  प्रचाराचे  कार्य  पूर्ण  झाले तेव्हा  संत  नामदेव  महाराजांनी   विठ्ठलापाशी  संजीवन  समाधी  घेण्याची  इच्छा  प्रकट  केली. जेव्हा  ही  गोष्ट  त्यांच्या  परिवाराला  समजली, तेव्हा  आई , वडील,  मुले आणि  सुना  यांनी  त्यांच्यासमवेत  समाधी  घेण्याचे ठरविले. शके  १२७२ आषाढ  वद्य त्रयोदशी दिवशी  संत नामदेव  महाराजांसह त्यांच्या परिवारातील  चौदाजणांनी  संजीवन  समाधी  घेतली.   संत  नामदेवांनी  पायरीची  जागा  का  निवडली  तर  विठ्ठल  दर्शनासाठी  जाणाऱ्या  संतांची  चरण  धूळ  आपल्या  अंगावर  पडावी  ही त्यामागील  शुद्ध  भावना होती  म्हणून  त्यांनी  मंदिरा  बाहेरील  पायरीपाशी  संजीवन  समाधी  घेतली  कि  जी  आज  नामदेव  पायरी म्हणून  प्रसिद्ध  आहे  भाविक  प्रथम  नामदेव पायरीचे दर्शन  घेतात  आणि  मग  विठ्ठल  दर्शनला  मंदिरात  जातात .


 🌰 *विठ्ठल मूर्ती...*

वारकरी   संप्रदायाच्या  श्रद्धेनुसार   विठ्ठलाची  मूर्ती  ना  बसवली  आहे,  ना  घडवली  आहे  तर  ती  स्वयंभू  आहे.  मात्र  मूर्ती  विज्ञान  अभ्यासक  ग. ह. खरे  यांच्या  मते  मूर्ती  पाचव्या  शतकातील  असावी.  त्याबाबत  एकमत  नाही. आक्रमणाच्या  वेळी  ही मूर्ती  काढून  सुरक्षित  ठिकाणी  ठेऊन  बडव्यांनी  पुन्हा  बसवली  आहे . मूर्ती  समचरण  आहे  देवाने  कमरेवर  दोन  हात  ठेवले  आहेत  कारण  हा  संसाररूपी  भवसागर  भक्तांसाठी  कमरे  एवढा  आहे  हे  सांगण्यासाठी  देवाने  कमरेवर  हात  ठेवले  आहेत अशी  कल्पना  शंकराचार्य  यांनी  केली  आहे.  कंठहार, मस्यकुंडले,  डोक्यावर  किरीट  आहे आणि जो  महादेवाच्या पिंडीसारखा  आहे अशी  आख्यायिका  सांगितली जाते  कि  भगवान शंकर  विठ्ठलाच्या  दर्शनासाठी  आले  तेव्हा  मस्तकावर  विराजमान झाले  हातात  कमळ  आहे  कारण  कृष्ण अवतारात  दैत्यांचा  संहार  केल्यानंतर कृष्णाने  शस्त्रे  खाली  ठेवली  कृष्णाचा  दुसरा  अवतार  म्हणजे  पांडुरंग  त्यामुळे  कृष्णाने  भक्तांच्या  स्वागतासाठी  कमळ    हातात  घेतले  आहे  पांडुरंगाची मूर्ती  सुंदर आहे म्हणून देवाला  मदनाचा  पुतळा  म्हंटले  जाते


🌰 *विष्णुपद*

पंढरपूर  पासून  दोन  किलोमीटर  अंतरावर चंद्रभागा नदी पात्रात  विष्णुपद  मंदिर  आहे  अशी  आख्यायिका  सांगितली  जाते  कि  पंढरपूर  अस्तित्वात  येण्याआधी  इथे  गयासुर  नावाचा  राक्षस  राहत  होता  जो तपस्वी  होता  त्याच्या  दर्शनाने  अबाल  वृद्ध महापातकी  यांचा  उद्धार व्हायचा त्यामुळे  यमलोकी  कोणी  जात  नसे  यावर  यमाने  देवाकडे  याचना  केली कि अस होत  राहिले  तर  यमलोकी  कोणीही  येणार  नाही  त्यावर  ब्रह्मदेवाने  विष्णूच्या  मदतीने  गयासुराला  पाताळात गाढले  त्यामुळे  जिते  विष्णू चरणाचा  स्पर्श झाला  ते  विष्णुपद  तसेच  इथे कृष्णचरण  आहेत  माता  रुक्मिणी  रुसून  पंढरपुरा  आली  तेव्हा  तिला  शोधात  आलेल्या  कृष्णानी  इथे  गोपाळकाल  केला  बासरी  वाजवली  म्हणून  कृष्णचरण  पाहायला  मिळतात  ज्ञानोबा माउलीने  संजीवन  समाधी  घेतली तेव्हा  व्यथित  होऊन  भगवान  पांडुरंग  मार्गशीर्ष  महिन्यात  विष्णुपदाला  वास्तव्यासाठी  आले  त्यामुळे  आजही  मार्गशीर्ष  महिन्यात  देवाचे  वास्तव्य  विष्णुपदाला  असते  असे  मानले  जाते  मंदिरातील  सर्व  नित्योपचार  मार्गशीर्ष  महिन्यात  विष्णुपदावर केले जातात  या  सर्व कारणांमुळे  भाविक  भक्तांच्या  दृष्टीने  विष्णुपदाचे  अनन्य साधारण  महत्व  आहे  म्हणूनच भाविक  दर्शनाकरित  न  चुकता  विष्णुपदला  येतात.


🙏🌾🙏🍀🙏🌾🙏🍀🙏🌾
कसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट PDF स्वरूपात ?

मचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) चं  प्रगतीपुस्तक गहाळ झालाय काय? तुमच्या सर्टिफ़िकेटवर डाग पडलेत का? सं असेल तर आता बोर्डाने तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आणली आहे एक खास सुविधा ई-मार्क्सशीटची. तुम्ही तुमच्या मार्कशीटचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तपासू शकता आणि एक प्रत PDF स्वरूपात साठवून ठेवू शकता.

यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स…
१. http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp  ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा.

२. या साईटवर नाव, फोन नंबर, इमेल आय डी, पासवर्ड टाकून तुमचे खाते बनवा.

३. तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून तुमचे मार्कशीट मिळवु शकता.

१९९० सालापासूनच्या मार्कशीट्स या साईटवर उपलब्ध आहेत. आपल्या बोर्डाने ही एक चांगली सोय आपल्यासाठी केलेली आहे.

Saturday, 21 July 2018

*सात कोड्यांना आई ने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे*



*१. या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??*
  *मुले म्हणाली , तलवार...*
   
*आईने सांगितले.. जीभ..*
    कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो,  दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो.


          💝💝
*२. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??*

    एकजण म्हणाला, *सूर्य, चंद्र, आकाशगंगा...*
   
आई म्हणाली... *भूतकाळ.*

   माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.


             💝💝
    *३. या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???*

     दुसर्याने सांगितले की, *पृथ्वी, पर्वत, सूर्य.*

    आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.. *हाव*
     लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.


         💝💝
 *४. पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???*

    तिसर्या ने उत्तर दिलं... *पोलाद, लोखंड, हत्ती.*

    आई म्हणाली,  सगळ्यात कठिण वस्तू... *वचन.*

    *वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.*


           💝💝
    *५. पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??*

    चौथा म्हणाला .. *कापूस, हवा, धूळ, पाने.*
 
आई म्हणाली, *सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.*
     
पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.


           💝💝
    *६. पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???*

    पाचव्याने सांगितले, *आई, वडिल, मित्र, नातेवाईक.*

    आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे *'मृत्यू'.*

    कारण *कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.*


         💝💝
    *७. शेवटचा प्रश्न..*
    *या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??*

     मुले म्हणाली *खाणे, झोपणे, फिरायला जाणे.*

     आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, *आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*
         💝💝
    *वेळ काढून नक्की वाचा*
*पसायदान....*

 *मनाला थक्क करणारी निस्पृह विश्वप्रार्थना...*

ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर.  तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.

आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण लता मंगेशकरांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे.

मी जेव्हा याचा अर्थ वाचला तेव्हा खरे तर थक्क झालो. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू...

*आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥*

- या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या ) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान दयावे.

*जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥*

- मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.

- भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे.

*दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥*

- जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.

- इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, बौध्ह इत्यादी धर्म नव्हेत तर "माणुसकी" हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.

*वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥*

- या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या "नश्वर" गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धन संपत्तीलाच "सुख" मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत.

*चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥*

-ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतानारूपी चिंतामणी रुपी गाव आहेत, त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ.

- माउलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे.

*चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥*

- जो मनुष्य, चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे (अंधारामध्ये सुद्धा दुसर्याला साथ देणारा) आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा  सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात.

*किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥*

- विश्वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माउली करतात.

*आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥*

- आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे.

- जीवन सुखी करणे हे काही Rocket Science  नाहीये. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेटतो. ग्रंथांना जीवन माना आणि जीवनच बदलून टाका.

*येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥*

- हे विश्वेशराया... हे जगाच्या मायबापा बापा... तू जेव्हा म्हणशील ना कि हे दान दिले.....तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल...

तर असा आहे या विश्व प्रार्थनेचा गुढार्त... ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ९००० ओव्यांचे हे सार आहे... एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न या जगद्माउली ने ८०० वर्षापूर्वी पाहिले. आज तागायत अखंड आषाढी वारी सुरु आहे, लाखो लोक या भक्तीसागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहे.. ते करता करता आपण आजच्या सगळ्यात जलद माध्यमाचा म्हणजेच Internet चा वापर सत्कार्यासाठी करूया.

🙏🏻🌹.....विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🏻

Friday, 20 July 2018

#Im_becoz_We_Are.

लातूर गटशिक्षणाधिकारी म्हणून आज तीन वर्ष बघता बघता पूर्ण झाली. लातूरच्या मातीने आणि माणसांनी लावलेला असीम जीव..! कधी इथल्या चराचराशी एकरूप-एकरंग झाले कळलेही नाही.
          लातूरच्या शैक्षणिक पटलावर मी जे काही थोडेफार चांगले काम करू शकलेय ते तुम्हा सर्वांची उत्कट आणि तितकीच सक्षम साथ मला होती म्हणून..!

कोणत्याही स्वार्थाविना केवळ लेकरांच्या हितास्तव तुम्ही सगळ्यांनी अहोरात्र धडपड केली म्हणून लातूर हे नाव ठळकपणे महाराष्ट्रभर पोहचले.त्यात मी फक्त निमीत्तमात्र..!

लातूरची माझी सर्व टिम जी अत्यंत तडफेने या सर्व कामात माझ्या सोबत आहे.माझे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व साधनवक्ती माझा सर्व कार्यालयीन स्टाफ तुम्ही सगळे या तीन वर्षात माझी खरी ताकत वाढवलीत. आणि प्रत्येक काम मनस्वीपणे पूर्ण केलेत.

माझा हा तीन वर्षाचा कार्यकाळ अधिक समृध्द करणारे माझे सर्व वरिष्ठ अधिकारी सीईओ मा.दिनकर जगदाळे सर, मा.माणिक गुरसळ सर,डॉ.विपीन सर, मा. नजिरूद्दीन शेख सर, ज्ञानेश्वर मोरे सर,माझे सहकारी अधिकारी आपण सर्वानी नेहमीच माझ्या कामाची योग्य दखल घेवून नेहमी कौतुक केलंत,अनेक प्रसंगात माझ्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभे राहून मला प्रचंड बळ दिलंत..विश्वास दिलात.तुम्हां सर्वांच्या मी कायम ऋणात आहे.

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनीधींनी या तीन वर्षात  माझ्या सर्व कामात प्रचंड विश्वास दाखवून मला सदैव मोलाचे सहकार्य करून सदैव प्रेरणा दिली आहे.या सर्वांची मी मनस्वी कृतज्ञ आहे.

या तीन वर्षात ख-या अर्थानी ज्यांनी रंग भरले ते शाळांशाळांतील माझी सर्व लेकरं..! कित्ती जीव लावलाय..निस्वार्थ..निर्मळ आणि तितकेच निरागस प्रेम या सा-या लेकरांनी दिले.यांच्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही..  तुम्हा सर्व लेकरांचे निखळ प्रेम माझ्या कामामागची सर्वात मोठी प्रेरणा आहे.

अतिशय उर्जादायी हा तीन वर्षाचा कार्यकाळ..खूप खूप समृध्द होता आलं. कौतुक..संघर्ष..यश-अपयश हे सारेच रंग या तीन वर्षात मनमुराद अनुभवले.

आपल्या सर्वांचे  खूप खूप आभार माझ्या या तीन वर्षाचे साथीदार झाल्याबद्दल, हे तीन वर्ष अधिक संस्मरणीय केल्याबद्दल, या तीन वर्षात माझ्या बरोबरीने अपार मेहनत घेवून शै.गुणवत्तेचं चिरंतन काम करत असलेबाबत तुम्हा सर्वांचे आभार..!

        ज़िन्दगी की असली उड़ान अभी बाकी है
              ज़िन्दगी के कई इम्तेहान अभी बाकी है,
               अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीं हमने,
                    अभी तो सारा आसमान बाकी है..!

Thursday, 19 July 2018

*नमस्कार......!!!*
                   *BCPT ने इ.1 ली ते 4 थीच्या पाठ्यक्रमावर आधारित व्हिडिओज तयार केली आहेत .  विशेष म्हणजे BCPT ने हा अध्ययन संच महाराष्ट्रातील सर्व शाळांना नि:शुल्क उपलब्ध करून दिला आहे. आता सदर डाटा आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकता.आपणास ज्या इयत्तेच्या हवा आहे त्यासाठी पुढील लिंक वरून Download करा.*
इयत्ता -- 1 ली साठी

https://diecpditpanvel.blogspot.com/p/class-1.html?m=1

इयत्ता -- 2 री साठी

https://diecpditpanvel.blogspot.com/p/c.html?m=1

इयत्ता -- 3 री साठी

https://diecpditpanvel.blogspot.com/p/class-3.html?m=1

इयत्ता -- 4 साठी

https://diecpditpanvel.blogspot.com/p/class-4.html?m=1

*धन्यवाद.....!!!*

*DIECPD-Panvel-Raigad*

Sunday, 15 July 2018


🎈 *My School,My Activity* 🎈
 🚸 *जि.प.प्रा.शाळा, बोथी* 🚸
        *ता.चाकूर जि.लातूर*

  🌴🌱 *वृक्षारोपण/वृक्षभेट* 🌱🌴

*बोथी:-आज दिनांक १६/०७/२०१८ वार  सोमवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती बोथी तर्फे शाळेस पिंपळाचे झाड🌱,ट्रिगार्ड व बाबासाहेब यांची प्रतिमा शाळेस भेट देण्यात आली. यावेळी माने शिवमुर्ती,गायकवाड किशन,संदिप माने,देविदास महालिंगे, नवनाथाप्पा आवाळे,मधुकर कोईलवाड, विकास भोसले, निता माने,सरोजा कांबळे, सुलोचना गिरी उपस्थित होत्या.शाळेच्या वतीने ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.*🙏🏻🙏🏻

_"नव्या युगाचे आभाळगाणे,_
 _आता तुला गायचे आहे...._
_माझ्या चिमुकल्या रोपा,_
_तुला आता झाड व्हायचे आहे.."_

💥 *टिम बोथी:-*
🔸श्री.जमादार गणपती
🔹श्री.भोसले अविनाश
🔸श्री.जोशी  गोपाळ
🔹श्री.रायफळे बस्वराज
🔸श्री.मुंढे साधु
🔹श्रीमती स्वामी मंगल
🔸श्री.सोदले जयराज

🌱🚸🌱🚸🌱🚸🌱🚸🌱🚸🌱

Tuesday, 10 July 2018

🎈  *My School,My Activity* 🎈
   🚸  *जि.प.प्रा.शाळा, बोथी* 🚸
          *ता.चाकूर जि.लातूर*

🌱🌴 *वृक्षारोपण* 🌴🌱
📒📗  *कार्डवाटप* 📕📘

जि.प.प्रा.शाळा, बोथी ता.चाकूर जि.लातूर येथे दिनांक ०९ व १० जुलै २०१८ वार मंगळवार रोजी ७० झाडाचे वृक्षारोपण शाळा परीसर व रस्त्याच्याकडेने करण्यात आले व प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी झाडे जगवण्याचा संकल्प विद्यार्थी व शिक्षकांनी केला. तसेच जिल्हा परिषद, लातूर मार्फत देण्यात आलेले माझे वृक्ष माझे संवर्धन कार्ड १७३ विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वाटप करण्यात आले.

*_"झाडे लावू ठाई ठाई,_*
*_मिटून जाईल पाणी टंचाई।"_*

*_"नव्या युगाचे आभाळगाणे,_*
*_आता तुला गायचे आहे....._*
*_माझ्या चिमुकल्या रोपा ,_*
*_तुला आता झाड व्हायचे आहे..."_*

💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠





Saturday, 7 July 2018



💠 *My School,My Activity* 💠
    🚸 जि.प.प्रा. शाळा, बोथी 🚸
        ता.चाकूर जि.लातूर

🎈 *विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी साजरा केला मुख्याध्यापकांचा वाढदिवस* 🎈

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
             त्याचाच एक भाग म्हणून *आज दिनांक ०७ जुलै शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार जी.जी.यांचा वाढदिवस* मोठ्या उत्साहात शाळेत विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी साजरा केला व सरांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली.सरांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते *विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप* केले.यावेळी *नवनाथाप्पा आवाळे,कोंडीबा शेवाळे, मधुकर कोईलवाड, शेषराव कांबळे, निता माने,सरोजा कांबळे* उपस्थित होत्या.
            यावेळी *सर्व विद्यार्थी, अविनाश भोसले, साधुभाऊ मुंढे,बस्वराज रायफळे, गोपाळ जोशी ,मंगल स्वामी, जयराज सोदले* यांनी *जमादार सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.*

_"तुमचा मनमोकळा स्वभाव_
_आणि सगळ्यांशी अगदी_
_नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत.._
_या दोन्ही गोष्टींमुळे,_
_तुमचा सहवास नेहमीच_
_हवाहवासा वाटतो!_
_कुणाशीही, अगदी विचारांचे_
_मतभेद असणाऱ्या माणसांशीही,_
_तुमची अगदी जिवलग मैत्री असते.._
_म्हणून तर, लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही_
_सगळ्यांचेच लाडके असता.._
_परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं…_
_हेच त्याच्याकडे मागणं!"_
                    _-जयराज सोदले._


🎈🎂🎈🎂🎈🎂🎈🎂🎈🎂🎈