*"Give Blood,Save Life."*
🅰🅱🆎🅾
*"रक्ताची निर्मिती कोणत्याही प्रयोगशाळेत शक्य नाही तर ते फक्त जिवंत माणसाच्या शरीरात तयार होऊ शकते.म्हणजे एखाद्या रुग्णास रक्ताची गरज भासली तर ते मनुष्यच पुरवठा करू शकतो.मग चला तर आपण रक्तदान करुया आणि अनेकांना जीवनदान देऊया.रक्तदानाचा हा कार्यक्रम 25 मे 2018 वार शुक्रवार स्टेट बँक ऑफ इंडिया चाकूर च्या समोर सकाळी 10.00 वा. आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या रक्तदात्यांना तथा नागरिकांना रक्तदान करावयाचे आहे त्यांनी संपर्कासाठी शिक्षक काँग्रेस चाकूर तालुकाध्यक्ष जयराज सोदले(9421969373) यांच्याशी संपर्क साधावा. युवक युवती तथा समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी या हेतुने नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन विधानसभा युवक काँग्रेस चाकूर-अहमदपूर अध्यक्ष निलेश देशमुख यांनी पत्रकान्वये केले आहे."*
☄ *रक्तदान:-*
एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्या स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते.
तसेच थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. अन्यथा त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे असते.
स्वस्थ व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते.
🛡 *रक्तदान कोण करु शकतो:-*
◦ ज्यांचे वय 18 ते 65 वर्षा पर्यंत आहे अशा व्यक्ती रक्तदान करु शकतात,
◦ वजन 48 किलो पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्ती,
◦ ज्यांनी मागील तीन महिन्यापासून रक्तदान केले नाही अशा व्यक्ती,
◦ क्षयरोग (TB), फिरंग, हिपाटायटिस, मलेरिया, मधुमेह आणि एड्स ह्या विकारांनी पीडित नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करु शकतात.
तर गर्भावस्था आणि स्तनपानकाळ सुरु असणाऱ्या स्त्रियांमधील रक्तदान घेतले जात नाही. प्रसुतीनंतर सहा महिन्यानंतर स्त्रिया रक्तदान करु शकतात.
🔰 *किती रक्त घेतले जाते:-*
दररोज आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होत असते. रक्तदानासाठी एकावेळी 350 ml रक्त घेतले जाते. तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पुर्ति करत असते.
💉 *रक्त दिल्यानंतर केले जाणारे परिक्षण:-* –
रक्त घेतल्यानंतर ब्लड बँकेमध्ये देण्यापुर्वी रक्ताच्या प्रत्येक युनिटचे परिक्षण करुन ते मलेरिया, सिफलिस, हिपेटाइटिस आणि एड्स (HIV) पासून संक्रमित नसल्याची खात्री केली जाते.
कारण सुरक्षीत रक्तचं रुग्णास मिळाले पाहिजे ह्यासाठी हे परिक्षण केले जाते.
ब्लड बँक रेफ्रिजरेटर मध्ये रक्त 4 ते 5 आठवड्यापर्यंत रक्त सुरक्षीत ठेवले जाते.
🌷 *रक्तदानावेळी कोणता त्रास होतो का:-*
नाही, रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही.
◦ रक्तदान करण्यासाठी 5 ते 10 मिनिटांपर्यंत वेळ लागतो.
◦ रक्तदान केल्यानंतर आपण आपली दररोजची कार्ये अगदी दररोज प्रमाणेच करु शकता.
◦ रक्तदाताच्या सामान्य आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम रक्तदानाने होत नाही.
🔖 *रक्तदाता कार्ड:-*
स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तिंना रक्तदान केल्यानंतर लगेच रक्तदाता प्रमाणपत्र दिले जाते.
यामुळे रक्तदान केल्यानंतर 12 महिन्यापर्यंत रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास ब्लड बँकेतर्फे एक युनिट रक्त दिले जाते.
🏵 *"Donate Blood to Save Lives."*
🌸 *स्थळ* 🌸
*दिनांक:- 25 मे 2018 वार:- शुक्रवार*
*वेळ सकाळी 10.00 वाजता*
*स्टेट बँक ऑफ इंडिया समोर चाकूर*
🙏🏻 *आपले विनित* 🙏🏻
💥 *विधानसभा युवक काँग्रेस चाकूर-अहमदपूर* 💥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖