प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 30 April 2018


⛳⛳ *महाराष्ट्र दिन* ⛳⛳

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.

🦋 *"महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!"* 🦋
          *~ जयराज सोदले.*
      jayrajsodle.blogspot.com

⛳ *महाराष्ट्र दिनाचा इतिहास* ⤵

_२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले._

_त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले._

_या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली._

🇮🇳 *हुतात्म्यांची नावे* ➡

_२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर ३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद ३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे ४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार ५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२] मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहित_

💪🏻 *आंतरराष्ट्रीय कामगार दिन* 💪🏻

हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मेरोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो

☄ *कामगार दिन कसा सुरू झाला?* ⤵

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव घेतला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.

🇮🇳 *भारतातील पहिला कामगार दिन* ➡

 तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Monday, 9 April 2018

🔮 *My School, My Activity* 🔮
      🚸 जि.प.प्रा.शाळा, बोथी 🚸
             ता.चाकूर जि.लातूर

   💥 *मोफत दंत चिकित्सा शिबिर* 💥

🎈 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी येथे ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त पाटील डेंटल  क्लिनिक, चाकूर च्या वतीने मोफत दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले.*

 🎈 *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोथी च्या सरपंच लताताई राठोड ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी रामराव चव्हाण, केंद्रिय मुख्याध्यापक इस्माईल पठाण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ आवाळे,मुख्याध्यापक गणपती जमादार,बालाजी तोटे,साधनव्यक्ती प्रकाश भालके,रवीराज देशमुख,व्यंकट जाधव,तलाठी एम.के.पाटील,अमोल तत्तापुरे हे होते.*

🎈 *शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.*
   
🎈 *डेन्टल सर्जन डॉ. केदार पाटील यांनी पहिली ते सातवीच्या १८० विद्यार्थ्यांची तपासणी करून सर्व विद्यार्थ्यांना एक टुथब्रश,एक पेस्ट व एक ग्लास दुध दिले.सर्व विद्यार्थ्यांना ब्रश कसा करावा याचे मार्गदर्शन करणारा व्हिडीओ दाखवून दाताची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.*

🎈 *यावेळी डॉ. केदार पाटील, रामराव चव्हाण, नवनाथ आवाळे,बालाजी तोटे,प्रकाश भालके यांनी शिबीराविषयी व शाळेविषयी मनोगत व्यक्त केले.*

🎈 *मोफत दंत चिकित्सा शिबीर जि.प. बोथी शाळेत घेतल्याबद्दल शाळेतर्फे डेन्टल सर्जन डॉ. केदार पाटील यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचे मनस्वी आभार.*

🎈 *तालुकास्तरीय आदर्श शिक्षक मिळाल्याबद्दल शाळेचे माजी विद्यार्थी बालाजी तोटे सर यांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला.*

🎈 *विद्यार्थ्यांपैकी  कु.सोनाली हाके,कु.अंकिता आवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.*

🎈 *कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयराज सोदले सर यांनी तर आभार इयत्ता सातवीची विद्यार्थीनी कु.रूपाली तिकटे हिने मानले.*

            💠 आमचे मार्गदर्शक 💠
          *श्री.संजयजी पंचगल्ले साहेब*
           [गटशिक्षणाधिकारी, चाकूर]
   
🌸 *बोथी टिम:-* ⤵⤵
श्री.गणपती जमादार
श्री.धनाजी दंडीमे
श्री.गोपाळ जोशी
श्री.जगन्नाथ वागलगावे
श्रीमती. सुचिता सुर्यवंशी
श्रीमती. मंगल स्वामी
श्री.जयराज सोदले

               ✍🏻 शब्दांकन ✍🏻
       *श्री.जयराज नवनाथराव सोदले*
           जि.प.प्रा.शाळा, बोथी
     jayrajsodle.blogspot.in