प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 27 November 2017

#महात्मा_ज्योतिबा_फुले

जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव: जोतिबा, ज्योतीबा.
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी नाव: सावित्रीबाई फुले
अपत्ये: यशवंत
स्वाक्षरी: 120px

महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

बालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

“ विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईट्‌स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्‍नी सावित्रीबाईंना १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

Wednesday, 22 November 2017

           *🔰गणित🔰*
*🌐घटक - संख्याज्ञान !🌐* 
=======================

1 ते 100 मध्ये ...

0 हा अंक -   11 वेळा लिहतात.
1 हा अंक - 21 वेळा लिहतात.

2 ते 9 सर्वच अंक - प्रत्येक 20 वेळा लिहतात....

अशा प्रकारे ....
1 ते 100 उजळणी लिहताना...

आपणास....
 = 11 + 21 + 160
=  192 अंक लिहावे लागतात....
=======================

1 ते 100 च्या दरम्यान ...

एकूण 25 मुळ संख्या आहेत

2, 3, 5 , 7,        -     1ते 10 पर्यंत
11, 13, 17, 19  -  11 ते 20 पर्यंत
23 , 29,            - 21 ते 30 पर्यंत
31, 37              - 31 ते 40 पर्यंत
41, 43, 47         -  41 ते 50
53, 59       -        51 ते 60
61 , 67          -     61 ते 70
71, 73 , 79         -  71 ते 80
83 , 89         -        81 ते 90
97                 -      91 ते 100

या एकूण *25* मुळ संख्या आहेत

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

*जोडमुळ संख्या -* 

    ज्या दोन क्रमागत मुळ संख्या दरम्यान एक दुसरी संख्या असते त्यांना मुळ संख्या ना जोडमुळ संख्या म्हणतात 

उदाहरणार्थ  - 3 व 5  ,  11 व 13 

1 ते 100 पर्यंत आशा जोडमुळ संख्या च्या  8 जोड्या आहेत .

3 , 5
5 , 7
11 , 13
17 , 19
29 , 31
41 , 43
59 , 61
71 , 73

या आठ जोड्या आहेत...

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

संख्या लेखन ....

          लहानात लहान    मोठ्या मोठी

1 अंकि         1                 9
2 अंकि         10               99
3 अकि         100            999
4 अंकि         1000          9999
5 अंकि         10000        99999

या प्रमाणे आपण संख्या लिहु शकतो.

यावर आधारीत स्पर्धा परीक्षा ला हमखास प्रश्न असतात....

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

वर्ग संख्या  - सर्वांना माहिती आहेत.

ञिकोणी संख्या  - 

*क्रमागत येणाऱ्या दोन संख्या च्या गुणाकाराच्या निम्मे करून मिळणाऱ्या संख्या ना ञिकोणी संख्या म्हणतात !*

उदाहरणार्थ ....
         
            4 × 5 
    =   --------------
                2

    =  10

म्हणजे 10 ही ञिकोणी संख्या आहे .

ञिकोणी संख्या पुढील प्रमाणे आहेत.

1 , 3 , 6 , 10 , 15 .....

यांना ञिकोणी संख्या का म्हणतात वरील लेखात सविस्तर सांगितले आहे.

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

अनेकांच्या वाचणात न आलेला भाग...

*परिपूर्ण संख्या !*   - 

एखाद्या संख्या च्या सर्वच विभाजक  संख्या ची बेरीज ( ती संख्या सोडून  ) त्याच संख्या इतकी येत असेल तर त्यांना परिपूर्ण संख्या म्हणतात .

उदाहरणार्थ

6 चे विभाजक -  1, 2, 3

यांची बेरीज केली तर...

    =  1 + 2 + 3 =  6  इतकी च येते

*म्हणजे 6 परिपूर्ण संख्या आहे..!*

नसलेली संख्या पाहुयात एखादी ...

10 चे विभाजक = 1 , 2 , 5 ,

  बेरीज = 1 + 2 + 5 = 8

म्हणजे 10 परिपूर्ण नाही .

*काही परिपूर्ण संख्या*

   -  6, 28 , 496 , 8128 इत्यादी

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

संख्या चढता उतरता क्रम

दिलेल्या अंकापासून संख्या लहानात लहान  व मोठयात मोठी संख्या लिहा असा प्रश्न असतो.

त्या मध्ये ही सम विषम हा भाग आहे.

थोडे काळजी पूर्वक लिहायला हवेत..

उदाहरणार्थ  - 2, 5, 7 , 4 अंक आहेत.

लहानात लहान  -  2457
                       - 2574 सम संख्या
                      -  2475 विषम

मोठ्यात मोठी    - 7542
                       - 7542 सम संख्या
                      - 7425 विषम       

*१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र*

*१) वात २) पित्त ३) कफ*
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच *निरोगी* म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
      *आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल*
----------------------------------------------
१) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.*

२) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

३) पाणी पिल्यावर पोटावर *दाब* पडतो आणि *प्रार्तविधी* करुन घ्यावा.

४) त्यानंतर *दात घासावे* त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही *स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट* वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात

५) नंतर *अंघोळ* करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना *गरम पाणी* कधीच वापरु नये.

६) सकाळी *७.३० ते ९.३०* च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) *जेवणाच्या अगोदर* *४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी  प्यावे.* जेवताना *एक ते दोन घोट* पाणी प्यायला हरकत नाही.

८) *सकाळी फळांचा ज्युस प्या*  दुपारी *दही ताक किंवा मठ्ठा प्या* आणि  *झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.*
९) नेहमी *पाणी* पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे *उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.*
( *शरीराला दररोज लाळेची गरज असते* जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी *घोट घोट* करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर *१० ते १५* मिनीटे *वज्रासनात* बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी *(२० मिनीटे झोपावे)* घ्यावी. आणि *संध्याकाळी* जेवण केल्यावर *३ तास झोपू नये* व *शतपावली* करावी.

११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावू नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

१२) भोजन करतांना नेहमी *मातीच्या* भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) *झोपताना* नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
*फिल्टर तेलच वापरा. * (रिफाईंड तेल विष आहे)*

१५) *सेंन्द्रिय गुळाचा* वापर करावा. *(साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)*

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा *गुळ* खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त *सेंधा मीठ* वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी *६ ते ७ तास झोप* आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज *एक तास प्राणायाम,* *१५ मिनीट योगासने,* व जेवढे जमेल तेवढे *सूर्यनमस्कार* करणे.

२०) *प्राणायाम* मात्र नियमित करणेच चांगले.

२१) रोज न चुकता *एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा.* तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा.

२२) *जास्त* वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील.

२३) *भारतीय* रस म्हणजे *उसाचा रस,कोकम* *सरबत,आवळा रस, लिंबू* *सरबत, फळांचा ज्युस* हेच आपल्या शरीराला *उत्तम पोषक* आहेत.

२४) भारतीय *पोशाख* घाला व तो *सैल* असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो *पांढराच* असावा.

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये *८४* प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
*लघवीला* आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, *अश्रू* बाहेर येवू द्यावेत, * *रडायला* आले तर ऱडावेच, *हसायला* आले की भरपुर हसावे, *जांभई* आली की द्यावीच, *शिंक* आली की बिनधास्त द्यावी , *अपानवायू* आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

२६) *कफ* कधीच *गिळू* नये.

*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो
🙏🏻 *मनापासून धन्यवाद* 🙏🏻

*"वा-याच्या झुळकीने मन सुखावतं,*
*झाडाच्या सावलीत मन विसावतं,*
*सुर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं."*
                 म्हणून आपण जरी त्यांचे आभार मानत नसलो तरी *त्यांच्या कृत्याची जाणीव असण महत्वाचं,धन्यवाद हे जाणीवेचं शब्दरूप असतं.म्हणूनच सर्वांना खुप खुप धन्यवाद.🙏🏻*
             दिनांक ०७/११  मला माझ्या *वाढदिवसाच्या निमित्ताने*.... *माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने* आठवणीने प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे, एस.एम.एस.,सोशल मीडिया च्या माध्यमातून *आशीर्वाद व शुभेच्छा* दिल्या  त्या बद्दल मी *सर्वांचे मनापासुन आभार* मानतो.
            आयुष्या मध्ये येऊन मी ज़र काही कमावले असेल,तर ते *तुमच्या सारखे मित्र कमावले..!*
 *हिच खरी संपत्ती मी कमावली असे मी समजतो.* *माझ्या मित्रांनो, माझा वाढदिवस हे फक्त एक निमित्त आहे.तुमच्या प्रेमळ शुभेच्छा नेहमीच माझ्या सोबत असतात... असच तुमचं प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो.*..... अशी आशा बाळगतो. आपले सर्वांचे मनापासुन आभार मानतो.
             *आजचा दिवस माझ्या साठी तुमच्या मुळे अनमोल ठरला.*
_आपण दिलेल्या शुभेच्छांचा_
_अगदी मनापासून स्विकार…_
_आपले मनःपूर्वक आभार…!_
_आपली सर्वांची साथ,सोबत_ _अशीच राहू द्या._
_मी आपण सर्वांच्या ऋणातच राहू इच्छितो.. !!_
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मला सामाजिक कार्य करण्यासाठी नवीन उर्जा , प्रेरणा मिळते. *धन्यवाद व जय महाराष्ट्र.* ..!!

            सदैव आपलाच....
           *अजित घंटेवाड*
            ९९२३५६१९४८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖



Sunday, 5 November 2017

सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यावर काय होते : तुम्ही पण थक्क व्हाल फायदा पाहून
गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर ह्याचे बाकीचे फायदे पाहून तुम्ही पण थक्क व्हाल. गरम पाणी पिताना जरी चवीला चांगलं वाटत नसेल, पण ह्याचे शरीरासाठी असलेले फायदे पाहून तुम्ही सुद्धा गरम पाणी प्यायचे सुरु कराल. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली तर शरीराच्या आजारापासून वाचू शकतात.

१. वजन कमी करतं :
जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि तुमच्या खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्या. तुम्हांला निश्चितच फरक पडेल. जर तुम्ही हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक काप गरम पाणी प्यायला सुरु करा.

२. सर्दी खोकल्यांपासून सुटका :
कोणत्याहि मोसमात तुम्हाला छातीत दुखणं आणि खोकला सारखे आजार होत असतील तर गरम पाणी ह्यावर रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे गळा पण ठीक राहतो. ह्याच्या सेवनाने आराम मिळतो.

३. पिरियड्स सोपे बनवते :
पिरियड्सचे दुखण्यामुळे महिलांना सर्वच कामांमध्ये ब्रेक लागतो. गरम पाणी ह्या दुखण्यावर आराम मिळण्याचे काम करते. ह्या दरम्यान गरम पाण्याने पोटावर सेक करण्याने सुद्धा खूप फायदा होतो.

४. शरीर डिटॉक्स करते :
गरम पाण्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. आणि हे शरीरातील सर्व अशुद्ध गोष्टी खूप सहज स्वच्छ करते. गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. ज्यामुळे घाम येतो आणि ह्याद्वारे शरीरातील सर्व अशुद्धता दूर होतात.

५. वाढते वय थांबवते :
चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या जर तुमची चिंता वाढवत असेल तर काळजी करायचे काही कारण नाही. आजपासूनच गरम पाणी प्यायला सुरुवात करा आणि काही आठवड्यातच ह्याच काम बघा. त्वचेमध्ये तरतरी येऊ लागेल आणि त्वचा चमकदार सुद्धा होईल.

६. केसांसाठी फायदेशीर :
ह्याशिवाय गरम पाणीचे सेवन केसं आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्यामुळे केसं चमकदार बनतात आणि हे केसांची वाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.

७. पोटाला ठेवते दुरुस्त :
गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली राहते आणि हे ऍसिडिटीच्या समस्यांपासून आराम देते. जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पिण्याची सवय लावा. असं करण्याने जेवण लवकर पचतं आणि पॉट हलकं ठेवतं.

८. रक्तप्रवाह (ब्लड सर्क्युलेशन) सुरळीत ठेवते :
शरीराला योग्य पद्धतीने चालण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत चालणे खूप आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.

९. शरीराची ऊर्जा वाढवते :
सॉफ्ट ड्रिंक्स च्या ऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराची एनर्जी लेव्हल वाढते आणि डायजेस्टिव्ह सिस्टम पण नीट राहते.

१०. गुडघ्याचे दुखणे दूर करते :
गरम पाणी गुडघ्याचे दुखणे कमी करते. आपल्या मांसपेशींमध्ये ८०% भाग पाण्याने बनलेले आहे आणि पाण्यानेच मांसपेशींच्या गाठी दूर होतात.