प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, 30 April 2017


⛳⛳ *महाराष्ट्र दिन* ⛳⛳

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.

🦋 *"महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!"* 🦋
          *~ जयराज सोदले.*
      jayrajsodle.blogspot.com

⛳ *महाराष्ट्र दिनाचा इतिहास* ⤵

_२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले._

_त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले._

_या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली._

🇮🇳 *हुतात्म्यांची नावे* ➡

_२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर ३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद ३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे ४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार ५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२] मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहित_

💪🏻 *आंतरराष्ट्रीय कामगार दिन* 💪🏻

हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मेरोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो

☄ *कामगार दिन कसा सुरू झाला?* ⤵

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव घेतला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.


🇮🇳 *भारतातील पहिला कामगार दिन* ➡

 तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Saturday, 29 April 2017

💎 *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* 💎

🌷 *मूळ नाव:-*माणिक बंडोजी इंगळे
🌷 *जन्म:-*एप्रिल 30, १९०९
यावली, जि. अमरावती
🌷 *निर्वाण:-*ऑक्टोबर ३१, १९६८
🌷 *गुरू:-*आडकोजी महाराज
🌷 *भाषा:-*मराठी,
🌷 *हिंदीसाहित्यरचना:-* ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
🌷 *कार्य:-* अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
🌷 *वडील:-*बंडोजी
🌷 *आई:-*मंजुळाबाई

🦋 *" ग्रामविकासातूनच राष्ट्र विकास होईल हे लक्षात घेऊन ग्रामगीतेसारखी महान काव्यरचना करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन."* 🦋
              *-जयराज सोदले.*
       jayrajsodle.blogspot.com


🌹 *तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला*. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. *तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.* खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. *आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू.* विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन *ग्रामविकास* झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

*अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे,* त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते *तुकड्यादास* म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

*सर्वधर्मसमभाव* हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी *खंजिरी भजनाच्या* माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

*महिलोन्नती* हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

*देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला.*

ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

*तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम *अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा* द्वारे केले जाते.

*ग्रामगीता*हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे.

🖊 *साहित्य संंमेलने* ➡

तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि
 (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.

📚 *पुस्तके* ➡

ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Friday, 28 April 2017

 आजची वृत्तपत्रे वाचण्यासाठी खालील पेपर वर क्लिक करा 


      दैनिक  लोकमत                                        दैनिक पुण्य नगरी
      
       दैनिक सकाळ                                          दैनिक  पुढारी 
       
       सामना                                                    तरुण भारत 
  
       वेब दुनिया                                               ABP माझा 

      दैनिक लोकसत्ता                                    महाराष्ट्र टाईमस 

 शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रशिक्षणासाठी व्हिडीओ .....

             

http://deshmukhravi.blogspot.in/2016/03/blog-post_18.html

रविराज भगवान देशमुख 
(विशेष शिक्षक,चाकूर जिल्हा लातूर )

जि.प.प्रा.शाळा ढोलेवस्ती ता पंढरपुर

❗श्री. दिपक जाधव  
सारोळा कासार अ नगर

संजय पुलकुटे

❗श्री. ज्ञानदेव नवसरे
प्राथ शिक्षक जि प नाशिक

❗श्री. गजानन सोळंके

❗श्री. उमेश खोसे 

❗श्री. सुनिल आलूरकर 

 श्री काशिद ए.एस.
गोठोस नं.१,कुडाळ,सिंधुदुर्ग 

❗श्री. गजानन बोढे बोढे,सहशिक्षक,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती ता.सिल्लोड जि.औरंगाबाद.

❗श्री. सुहास श्रीरंग कोळेकर 
जि प शाळा ,कायरे 
ता पेठ,जि नाशिक

❗श्री. राजकिरण चव्हाण 

❗श्री. राजेंद्र मोरकर

❗श्री. भरत पाटील
माळीनगर ता.मालेगाव

❗श्री. नागेश (नागजी) टोणगे,
जि.प.हायस्कुल मस्सा (खं.) ,
ता. कळंब जि. उस्मानाबाद. 


❗श्री. राम राघोजी माळी

जि. प. केंद्रशाळा मुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.


❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला

❗Mr.Sachin vitthalrao shelke

❗श्री. शंकर जाधव

❗श्री. सचिन कडलग, जालना

❗श्री. अशोक निवृत्ती तळेकर 
प्रा.शिक्षक ता.डहाणू  जि.पालघर 
                                http://ashoktalekar.blogspot.in/                                                                                                          
❗श्री. संतोष दहिवळ

❗Shri. Mundhe d d

❗Shri. Govardhan Khambait
Blog address

❗Shri. Rajendra pandit

❗श्री. रविंद्र नादरकर
http://ezpschool.blogspot.in/             
❗Shri. Shankar. JADHAV

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला

❗Shri. Pathan  Aadam Khan 
Asst.Teacher
Zp devgad
Dist sindhudurg

❗ श्री. लक्ष्मण सावंत

❗ श्री. संतोष थोरात
z.p.pri.school, bondarmal
tal-peth, dist-nashik

❗ श्री. शशिकांत फारणे

❗ Shri. Ganesh Satimeshram

❗श्री. खंडागळे सर

❗श्री. लक्ष्मण वाठोरे

❗श्री. रोहोकले सर

❗श्री. तानाजी सोमवंशी

❗श्री. हिरोज तडवी

❗श्री. सोमनाथ वाळके

❗श्री. विक्रम अडसुळ

❗श्री. मंगेश मोरे

❗श्री. रमेश वाघ

❗श्री. महेश शहाजी लोखंडे
ता.कराड जि.सातारा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) कराड
पंचायत समिती कराड

❗श्री. निलेश इंगळे 
जि प शाळा पारवा
ता. पुसद  जि .यवतमाळ 

❗श्री. अशोक फुंदे
शाळा -जि प.प्रा शाळा उभिधोंड.    ता पेठ जि नाशिक zpschoolubhidhond.blogspot.in

❗ श्री. संतोष बोडखे: zppschangdevnagar.blogspot.com
काम सुरू आहे.

❗श्री. निकाळजे घनश्याम अर्जून , 
जि.प.केंद्रशाळा जोगमोडी, ता.पेठ, जि. नाशिक

❗श्री. हरीदास भांगरे

❗श्री. समाधान शिकेतोड

❗श्री.दिपक बेलवले .

❗श्री. उमेश कोटलवार

❗श्री. बालाजी मुंडलोड

❗श्री. अरुण सेवलकर

❗श्री. बालाजी केंद्रे 
जि प शाळा सोजडबार ता अक्कलकुवा जि नंदुरबार 
मुळ गाव लातूर

❗श्री. प्रविण डाकरे 

❗ श्री. राजेश्वर पिल्लेवार

❗ श्री. रंगनाथ कैले

❗ श्री. रोशन फलके shikshanmarathi.blogspot.com/
आनंदी शिक्षण

❗ श्री. रविंद्र राऊत 
जि प प्राथ शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगर 

❗ श्री . रवि कोळी सर 
जि.प.प्राथमिक शाळा जळू
ता.एरंडोल जि.जळगाव 

❗ श्री. राजु खाडे

❗ श्री. बालाजी जाधव

❗ श्री. रविंद्र भापकर

❗ श्री. समीर लोणकर

❗श्री.रामेश्वर गायकवाड       प्रा.शा.गणेशवाडी ता.भोकरदन जि.जालना www.zppsganeshwadi.blogspot.com
❗ Shri. Subhash ingle
                                                                    ❗Shri. Anand Anemwad

❗श्री. शाम गिरी

❗श्री. नागोराव येवतीकर 

❗Shri. Syed asif iqbal 
HM zp kharepatan tal.kankavli dist.sindhudurg

❗श्री. तानाजी सोमवंशी

❗श्री. भिमा अंदूरे सर. ..
जि.प.प्रा.शा.चिकणगाव 
ता.अंबड जि.जालना

❗श्री. रमेश वाघ 
मुक्तचिंतन

❗श्री. गजानन सोळंके

❗श्री. शफी सर,ढाणकी

❗श्री. सतिश भोसले सर,बीड

❗ श्री. इब्राहिम चौधरी , 
उमरगा ,उस्मानाबाद 

❗श्री. विशाल घोलप, बीड

❗श्री. राम सालगुडे

🌹: श्री.संदीप वाघमोरे 

💻श्री  निलेश ग्यानोबा इंगळे 
जि प शाळा  पारवागाव 
ता पुसद जि यवतमाळ 

💻  आसिफ मौला शेख
मूळ गाव:मु.पो.सिद्धापूर ता:मंगळवेढा
जिल्हा:सोलापूर
शाळा:ज्ञान प्रबोधन विद्यालय,सोलापूर.
तसेच QR CODE तयार केलेला आहे .

💻 श्री प्रसादराजे सर,अकोला

📝श्री डाकरे जयदिप दत्तात्रय      
जि.प.प्राथमिक शाळा सडादाढोली
  ता.पाटण जि.सातारा       jaydipdakare.blogspot.com

🆕 श्री प्रमोद महामुनि
जि प प्रा शाळा,हिवरा,ता.भूम,जि.उस्मानाबा 

💻 श्री सुरज शिकलगर
Z.p. school Khandobachiwadi Tal -Palus , Dist ~Sangli

💻 श्री हेमंत भास्कर मोरे
मूळ गांव - पारोळा
शाळा- प्राथमिक आश्रमशाळा राजदेहरे,ता.चाळीसगाव

🎉 श्रीमती शुभांगी पोहरे 

🚦श्री  मनोज पटने 
जी प प्रा शाळा थड़ी पिम्पलगाव 
ता. सोनपेठ जी. परभणी

💾 श्री धम्मानंद बागडे,जळगाव

🛃 श्री सुदाम साळुंके , 
शाळा पेमदरा (आणे)ता.जुन्नर जि.पुणे salunkeguruji.blogspot.in

🔱 श्री प्रदिप कुंभार,सातारा

💥 श्री जाधव अशोक शिवराम  ता.उमरगा

🌹 श्री विजय गव्हाणकर

🆕 श्री निळकंठ काळे

🌞 श्री विजागत  ज्ञानेश्वर 
जि.प.प्रा.शाळा ढोलेवस्ती ता पंढरपुर